पोस्ट्स

Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

लेखक रॉबिन शर्मा|रॉबिन शर्मा पुस्तके|सन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली|पुस्तक परिक्षण|Robin sharma author

इमेज
 संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली.... रॉबिन शर्मा       रॉबिन शर्मा यांनी लिहिलेल्या "The Monk Who Sold His Ferrari" या पुस्तकाचे हे मराठी भाषेत प्रकाशित झालेले अप्रतिम पुस्तक. प्रत्येक शब्द प्रेरणादायी. तुम्ही हे पुस्तक वाचून काय मिळवाल? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे... समाधान, आत्मविश्वास आणि चैतन्यपूर्ण जीवन. हे पुस्तक म्हणजे आनंदाने जगण्यासाठीची चावी म्हणता येईल. प्राचीन संस्कृतीच्या जीवनशैलीतील दैनंदिन जगण्याचे पाठ शोधून काढण्याचा यशस्वी प्रयत्न यातून दिसून येतो. वेळ आणि आपले नातेसंबंध यांची जपणूक करणे या सोबतच अनेक गोष्टी या पुस्तकात शिकायला मिळतात. पुस्तकाचे नाव.... संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली लेखक... रॉबिन शर्मा प्रकाशन... जयको पब्लिशिंग हाऊस भाषांतर..... मालती प्रमोद जोशी मूल्य.... ₹ २२५ लेखक परिचय... नाव... रॉबिन शर्मा जन्म.... 18 मार्च 1965 व्यवसाय.... लेखक, व्यक्तिमत्व विकास व्याख्याते       रॉबिन शर्मा यांचा जन्म कनडा येथे वास्तव्यास असलेल्या पारंपारिक भारतीय मूल्य जपणाऱ्या परिवारात झाला. त्यांनी ल मध्ये मास्तर एक मिळवली आहे. यावरून त...

शिवलीलामृत| पारायणाचे फायदे|संतकवी श्रीधरस्वामी नाझरे|पुस्तक परिक्षण

इमेज
 शिवलीलामृत परायण विधी,शिवलीलामृत पारायण फायदे ..... महिती...          भगवान शंकराची आराधना करणाऱ्या अनेक भक्तांसाठी  शिवलीलामृत पारायण म्हणजे एक अमृत पर्वणी. शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण आपण अनेक वेळा केले असेल. पण हा ग्रंथ कोणी रचला? या ग्रंथाचे लेखक कोण? याची आपल्याला फारशी माहिती नसते. शिवलीलामृत हा ग्रंथ आपण  वाचतो खरा... पण त्याचे काय फायदे आहेत हेही आपल्याला माहीत नसते. मनाची शांती, समाधान   हाच याचा  उत्तम फायदा म्हणता येईल. याच सोबत  अनेक भक्तांना या पारायणाचे वेगवेगळे लाभ झालेले आहेत.  * शिवलीलामृत परायण विधी* शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन  सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात तसेच इच्छित फळ मिळावे यासाठी उपयुक्त आहे. या ग्रंथाचे संपूर्ण पारायण एका सप्ताहात पूर्ण करावे. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शिव मंदिरात जाऊन बेलाची अकरा त्रिदले पिंडीवर वहावीत व शंकराचे दर्शन घ्यावे. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपण जर हे पारायण करत असू तर त्या गोष्टीचा उच्चार करावा आणि सात दिवसात रोज अंशतः ...

नरेंद्र चपळगावकर|96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष| Nyaymurti Narendr Chapalagawkar|मनातली माणसं

इमेज
  प्रस्तावना:-    वैचारिक लेखक म्हणून साहित्य विश्वात ज्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं ते नाव म्हणजे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली आहे. नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे न्यायमूर्ती म्हणून तर प्रसिद्ध आहेतच पण त्यांच्या अलौकिक आणि अभ्यासपूर्ण लेखनातून ते वाचकांच्या आणि सर्वसामान्यांच्या अधिक जवळ पोहोचले. अखिल भारतीय मराठी  साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली ती त्यांच्या अद्भुत लेखन कार्यामुळे आणि पात्रतेमुळेच.                 नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पिठाचे निवृत्त न्यायाधीश असून त्यांचे वैचारिक लेखन अधिक आहे. संवेदनशील व सत्वशील मराठी लेखक म्हणूनही ते ओळखले जातात. न्यायाधीश होण्यापूर्वी ते 1961 - 62 साली लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. 2003 पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी  निदेशक आहेत...

रणजित देसाई|शेकरा मराठी कादंबरी|रणजित देसाई कादंबरी

इमेज
  प्रस्तावना :-                  रणजित देसाई यांचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या भराभर येऊ लागतात. "शेकरा" माञ यास अपवाद म्हणता येईल. वेगळा आणि तेवढाच उत्सुकतेचा विषय वाटल्याने वाचण्यास घेतले. एक ते दोन बैठकीत शेकरा ही मराठी कादंबरी संपण्याजोगी आहे. असे असले तरीही हे पुस्तक खूप काही शिकवून जाते. पुस्तक:- शेकरा प्रकाशन:- मेहता पब्लिशिंग हाऊस लेखक:- रणजित देसाई प्रकार:- कथा/कादंबरी लेखक परिचय--      रणजीत रामचंद्र देसाई.यांचा यांचा जन्म ८ एप्रिल १९२८ साली झाला. प्रसिद्ध मराठी ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत. कादंबरी,नाटक,ललित,कथा कथा या साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. " पद्मश्री" या पुरस्काराने ते सन्मानित आहेत. ६ मार्च १९९२ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. रणजित देसाई यांचे प्रसिद्ध साहित्य:- संचित -(ललित) समिधा -(कादंबरी) सावली उन्हाची-(नाटक) स्नेहधारा संगीत सम्राट तानसेन स्वामी-(कादंबरी) स्वामी-(नाटक) हे बंध रेशमाचे पावनखिंड राधेय संकेत शेकरा   :-   ...

पत्र लेखन| व पु. काळे यांना स्व लिखित पत्र|

प्रति, व. पु. यांना साष्टांग नमस्कार!    तु मच्या साहित्यावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्या साहित्यातून"गुलमोहरा"प्रमाणे तुमचे विचार अलगद टिपून ते आचरण्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारी  मी एक साहित्य रसिक. 25 मार्च. तुमचा जन्मदिवस. आठवण येणे सहाजिकच होते. तसे तुम्ही, तुमचे विचार पुस्तकरूपाने आमच्या समोर नेहमीच असतात, पण तरीही 25 मार्च आला की तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते.   वाचनाची सवय लहानपणी लागली. कळतं वय झालं तसं त्यातील अर्थ समजू लागला आणि गोडी वाढत गेली. वाचत असताना अनेक विचार मनात"रंगपंचमी"खेळू लागले. तुमच्या साहित्यातील शब्दांच्या उधळणीने मनात"काहूर"माजले.त्यास शांत करणे, समाधान करणे गरजेचे होते. आशा वेळी मदतीचा हात देण्यास"सखी"आली. ती समजून घेत असतानाच "ठिकरी"ची सोना भेटली. सोना ही पुरुषप्रधान संस्कृतीतील माणसाच्या वासनेची शिकार झालेली नायिका. स्वतः ठिकरी झालेली असताना जमेल तसे इतर ठिकाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते. त्यांना मदतीचा हात देते. यातच तिला कृतार्थता वाटते. कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली घेते तशीच ही सोना आपल्या पं...

एपीजे अब्दुल कलाम|अग्निपंख मराठी बुक|APJ Death, Biography|Agnipankh

इमेज
  प्रस्तावना :-            जगविख्यात अनुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, हाडाचे शिक्षक, वृक्षप्रेमी आणि बालप्रेमी डॉक्टर अब्दुल कलाम. प्रत्येक भारतीयांच्या मनात ज्यांनी आपल्या कार्याने कष्टाने कर्तुत्वाने वेगळे स्थान निर्माण केले असे हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न असे महान पुरस्कार ज्यांच्या नावावर आहेत, ज्याने आपले संपूर्ण जीवन भारतभूमीच्या उज्वल भविष्यासाठी वेचली अशा भारतीय भूमिपुत्राबद्दल काय आणि किती वर्णन करावे??  जगभरात झालेल्या कीर्तीतुन च त्यांच्या कार्याची सिद्धता होते. अब्दुल कलाम भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ तर होतेच पण त्याचबरोबर 2002 ते 2007 या काळात त्यांनी भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम केले. चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे ही त्यांनी काम केले. वर्तमानपत्र वाटणारा एक मध्यमवर्गीय मुलगा ते  देशाच्या  राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा, सहज नक्कीच नव्हता.         ...

स्वप्ना जरग|अधिकारिणी-Adhikarini|swapna jarag|Imp Book for MPSC UPSC|Motivated Book

 अधिकारिणी:-            महाराष्ट्र प्रशासनाचा कार्यभार सांभाळून अनेक अडचणींना तोंड देत आपली तडफदार कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचे प्रेरणादायी अनुभव अधोरेखित करणारे हे पुस्तक. प्रशासनात अनेक लोक येतात आणि जातातही. आपापली कर्तव्य ते पार पाडत असतात. विशेषता या क्षेत्रात महिलांना फार अडचणींना सामोरे जावे लागते घर मूल संसार सांभाळून त्या आपली जबाबदारी नीट आणि पार पाडतात अशा रणरागिनींना व त्यांच्या कार्याला कितपत न्याय मिळतो? किंबहुना तो दिला जातो? या महिलांनी आपल्या पदापर्यंत पोहोचण्या मागची जिद्द त्यांची चिकाटी याची कल्पना कोणालाही नसते. जेव्हा त्यांचे कार्य सिद्ध होते तेव्हा त्या प्रकाश झोतात येतात आणि म्हणूनच स्वप्ना जरग यांनी आपल्या लेखणीतून या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.         पानिपतकार आय ए एस विश्वास पाटील यांनी या पुस्तकासंदर्भात अतिशय बोलके वर्णन केले आहे. ते म्हणतात... "सळसळत्या रक्ताच्या तरुण-तरुणींना अधिकारींनी हा ग्रंथ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणा देईलच...