Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

नरेंद्र चपळगावकर|96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष| Nyaymurti Narendr Chapalagawkar|मनातली माणसं

 प्रस्तावना:-

   वैचारिक लेखक म्हणून साहित्य विश्वात ज्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं ते नाव म्हणजे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली आहे. नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे न्यायमूर्ती म्हणून तर प्रसिद्ध आहेतच पण त्यांच्या अलौकिक आणि अभ्यासपूर्ण लेखनातून ते वाचकांच्या आणि सर्वसामान्यांच्या अधिक जवळ पोहोचले. अखिल भारतीय मराठी  साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली ती त्यांच्या अद्भुत लेखन कार्यामुळे आणि पात्रतेमुळेच.

       

        नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पिठाचे निवृत्त न्यायाधीश असून त्यांचे वैचारिक लेखन अधिक आहे. संवेदनशील व सत्वशील मराठी लेखक म्हणूनही ते ओळखले जातात. न्यायाधीश होण्यापूर्वी ते 1961 - 62 साली लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. 2003 पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी  निदेशक आहेत. दिव्यमराठी मधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. ते नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त  आहेत. पंधरा वर्षापेक्षाही अधिक वर्षे मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा "जीवनगौरव" पुरस्कार त्यांना मिळाला आहे.


          एम ए एल एल बी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी 27 वर्षे वकिली केली. नऊ वर्ष मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य केले. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ते प्राध्यापक होते आणि आय.एल.एस. विधी महाविद्यालयात फोर्ड अध्यासनाचे मानद प्राध्यापक होते.2005 साली माजलगाव येथे पार पडलेल्या 26 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे न्याय व सामाजिक विषयांवर विपुल लेखन आहे. त्याचबरोबर अनेकविध सामाजिक प्रकल्पांमध्ये सहभागही आहे.

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार :--

 * भैरूरतन दमाणी पुरस्कार -2011

 * पुण्यात 21 - 22 जानेवारी 2012 रोजी झालेल्या तेराव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

 * प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (२०१८)

*औरंगाबाद येथे १३-१४ मार्च २०१४ या तारखांना झालेल्या ९व्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.


 "मनातली माणसं" हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. या व्यतिरिक्त नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली अनेक पुस्तके वाचनीय आहेत...


*नरेंद्र चपळगावकर लिखित पुस्तके*


1) लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड - व्यक्तिचित्रण


2) त्यांना समजून घेताना - टिळक, गांधी ,नेहरू, वल्लभभाई, सुभाषचंद्र आणि राजाजी - लेख


3) नामदार गोखले यांचा भारतसेवक समाज - माहितीपर


4) न्यायमूर्ती केशवराव कोरटकर - चरित्र


5) न्यायाच्या गोष्टी - कथासंग्रह


6) आठवणीतले दिवस - व्यक्तिचित्रण


7) हरवलेले स्नेहबंध - ललित


8) संघर्ष आणि शहाणपण - माहितीपर


9) संस्थानी माणसं


10) मनातली माणसं - व्यक्तिचित्रण


11) कहानी हैदराबाद लढ्याची - ऐतिहासिक ,राजकीय


12) दीपमाळ


13) सावलीचा शोध


14) कायदा आणि माणूस


15) समाज आणि संस्कृती


16) तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ - चरित्र


17) कर्मयोगी संन्यासी - चरित्र


18) पंतप्रधान नेहरू - व्यक्तिचित्रण


19) तुमच्या माझ्या मनातलं - ललित


20) महात्मा गांधी आणि भारत


21) विधिमंडळे आणि न्याय संस्था संघर्षाचे सहजीवन


22) राज्यघटनेचे अर्धशतक


23) मर्ढेकर आणि लागू


24) सदाशिवपेठी


25) टिळक, गांधी आणि त्यांचा निर्णयतेचा वारसा


                      (सौजन्य  -  गूगल इमेज)

पुस्तक:- मनातली माणसं

लेखक:- नरेंद्र चपळगावकर

प्रकाशन:- मौज प्रकाशन गृह

किंमत:- ₹ २२५/-

*मनातली माणसं*

           नरेंद्र चपळगावकर यांच्या अनेक सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक म्हणजे "मनातली माणसं". पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहताच त्यावरील चेहरे पाहता पुस्तकाचा अन्वयार्थ लक्षात येतो. सावलीचा शोध नंतर प्रसिद्ध होणारा नरेंद्र चपळगावकर यांचा हा दुसरा व्यक्तीचित्र संग्रह. माणसाच्या मनात आपल्या जवळच्या म्हणजे आप्तेष्टमंडळीच्या आठवणी कायमच असतात. या अप्तेष्टमंडळींमध्ये, नातलगांमध्ये, आपल्या माणसांमध्ये आई ,वडील, भाऊ - बहीण ,शिक्षक , मित्र-मैत्रीण, गुरुजन यांचा समावेश असतो. नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या जवळच्या माणसांच्या आठवणी मनातली माणसं मधून पुस्तक रूपाने शब्दात उतरवल्या आहेत.   

         न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचा जन्म मूळचा मराठवाड्यातला. बीड आणि आसपासच्या परिसराचा, तेथील समाजजीवनाचा त्यांच्या  जडणघडणावर परिणाम झालेला दिसून येतो. त्यांचे वडील पुरुषोत्तम चपळगावकर हे प्रचलित वकील होते. स्वातंत्र्य चळवळीतील वडिलांच्या कार्याचा जवळून अनुभव नरेंद्र चपळगावकर यांनी घेतला होता. वडिलांच्या वकिलीचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला.    

       

   मुलगा ,पती, वडील,वकील ,न्यायमूर्ती आणि लेखक. जीवनातील या वेगवेगळ्या वळणावरील त्यांचे बदलते रूप आणि त्यांच्या यशस्वीतेमध्ये त्यांच्यासोबत कायम असणारा त्यांचा कुटुंबकबिला म्हणजेच त्यांच्या "मनातली माणसं".यात त्यांची आई ,वडील त्याचबरोबर मुकुंदराव किर्लोस्कर, गोविंद भाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ, त्यांचे मित्र वा ल कुलकर्णी, सुधीर रसाळ, त्यांचे गुरुजन, अनंत भालेराव, भगवंतराव देशमुख ,व्यंकटराव देशपांडे या अनेकांविषयी लिहिले गेले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व तसेच नरेंद्र चपळगावकर यांच्याशी  असणारे  त्यांचे नाते, ऋणानुबंध या बद्दल लिहीले आहे. त्याचबरोबर भावनिक नात्यांसोबतच त्या काळातील समाजाचे दर्शन आपल्याला पुस्तक  वाचताना प्रत्येक वेळी होते. नरेंद्र चपळगावकर यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.

©® सौ. मैथिली कुलकर्णी

भारत सासणे|Bharat sasane|दाट काळा पाऊस|९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges