Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली.... रॉबिन शर्मा
रॉबिन शर्मा यांनी लिहिलेल्या "The Monk Who Sold His Ferrari" या पुस्तकाचे हे मराठी भाषेत प्रकाशित झालेले अप्रतिम पुस्तक. प्रत्येक शब्द प्रेरणादायी. तुम्ही हे पुस्तक वाचून काय मिळवाल? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे... समाधान, आत्मविश्वास आणि चैतन्यपूर्ण जीवन. हे पुस्तक म्हणजे आनंदाने जगण्यासाठीची चावी म्हणता येईल. प्राचीन संस्कृतीच्या जीवनशैलीतील दैनंदिन जगण्याचे पाठ शोधून काढण्याचा यशस्वी प्रयत्न यातून दिसून येतो. वेळ आणि आपले नातेसंबंध यांची जपणूक करणे या सोबतच अनेक गोष्टी या पुस्तकात शिकायला मिळतात.
पुस्तकाचे नाव.... संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली
लेखक... रॉबिन शर्मा
प्रकाशन... जयको पब्लिशिंग हाऊस
भाषांतर..... मालती प्रमोद जोशी
मूल्य.... ₹ २२५
लेखक परिचय...
नाव... रॉबिन शर्मा
जन्म.... 18 मार्च 1965
व्यवसाय.... लेखक, व्यक्तिमत्व विकास व्याख्याते
रॉबिन शर्मा यांचा जन्म कनडा येथे वास्तव्यास असलेल्या पारंपारिक भारतीय मूल्य जपणाऱ्या परिवारात झाला. त्यांनी ल मध्ये मास्तर एक मिळवली आहे. यावरून त्यांना शिक्षणाची रुची असल्याचे दिसून येते. रॉबिन शर्मा यांची 11 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. जगभरात त्यांच्या पुस्तकांचे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. लिहिणे आणि वाचणे हे त्यांचे आवडते काम. इसवी सन 2011 मध्ये टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल द्वारा त्यांना गोल्डन गेवल अवॉर्ड मिळाला आहे.
*रॉबिन शर्मा लिखित काही पुस्तके*(Robin Sharma books) —
द लीडर हू हैड नो टाइटल
द ग्रेटनेस गाइड
द ग्रेटनेस गाइड बुक—2: 101
लैसन्स फॉर सक्सेस एंड हैप्पीनेस
द मोंक हू सोल्ड हिज फेरारी
लीडरशिप विजडम फ्रॉम
द मोंक हूसोल्ड हिज फेरारी
द सेंट द सर्फर एंड द सीईओ
हू विल क्राइ वैन यू डाइ?
लीड विदाउट ए टाइटल मेनीफेस्टो
संन्यासी जाणे आपली संपत्ती विकली....
रॉबिन शर्मा लिखित संन्यासी जाने आपली संपत्ती विकली हे पुस्तक मूळ "The Mock Who Sold His Ferrari" या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर आहे. ही एक
दंतकथा आहे. रॉबिन शर्मा स्वतः भारतीय वंशाचे असल्याने आणि त्यांचा जन्म भारतीय संस्कृतीची जपणूक करणाऱ्या परिवारातून असल्याने त्यांनी जीवन मूल्यांच्या विकासासाठीच्या ज्या पद्धतींचा उल्लेख पुस्तकात केला आहे, त्यांचे संपूर्ण श्रेय पूर्वेकडील साधू संतांना दिले आहे. पाश्चिमात्य संस्कृतीत वाढलेला असूनही पूर्वेकडील विशेषतः भारतीय योगी आणि महापुरुषांना श्रेय देणे हे तसे धाडसाचेच म्हणावे लागेल.
संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली ही दंतकथा म्हणजे जुलियन मॅन्टल आणि त्याचा मित्र जॉन यांच्यामधील संवाद आहे. ज्युलियन हा एक नामांकित वकील असतो. यश आणि पैसा कमावण्यासाठी तो दिवसाचे 18 तास काम करतो. एका महत्त्वाच्या केससाठी ज्युलियन जॉन ची निवड करतो आणि हळूहळू ते मित्र होतात. एक दिवस कोर्टात केस लढत असताना त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि तो जमिनीवर कोसळतो. जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये असतो. त्याच्या या परिस्थितीला सर्वस्वी तो आणि त्याचे धावपळीचे जीवन जबाबदार असते. याची जाणीव झाल्यावर तो वकिली न करण्याचा आणि आपल्या फार्ममध्ये वापस न जाण्याचा निर्णय घेतो.आपल्या सर्व संपत्तीचा त्याग करून तो पूर्वेकडे निघून जातो अगदी कोणालाही न सांगता...
एक दिवस अचानक तीन वर्षानंतर प्रथमच तो आपला मित्र जॉन याला भेटतो. प्रथम जॉन त्याला ओळखतच नाही कारण त्याच्यात आश्चर्यकारक बदल झालेला असतो.आपल्या वयाच्या निम्मा झालेला, हाडकुळा, प्रचंड उत्साहाने बोलणारा त्याचा तेजोमय चेहरा जॉनला बुचकळ्यात पाडतो. हा एवढा प्रचंड बदल ज्युलियन मध्ये कसा झाला ?तो कुठे गेला होता ?त्याला कोण भेटले? त्याला आलेले अनुभव आणि पूर्वेकडील म्हणजेच भारतातील हिमालयात फिरल्यानंतर त्याला मिळालेली अनमोल शिकवण कशी आत्मसात होत गेली? या सर्व प्रश्नांची गूढ उत्तरे ज्युलियन आणि जॉन यांच्या संवादातून हळूहळू उकलत जातात.
पूर्वेकडील हिमालयाच्या पायथ्याशी जुलियनला योगी कृष्णन भेटतात. ज्यूलियन योगी कृष्णन यांना परिपूर्ण जीवन जगण्यासाठी काय करावे लागते यासाठी मदत मागतो. मन शरीर आणि मेंदूवर ताबा मिळवण्याचे मंत्र हिमालयातील शिखरावर शिवाना येथील योगी ना अवगत आहे. आणि ते हिमालयाच्या शिखरावर आहेत ते नेमके कोठे राहतात हे मला माहीत नाही. तू त्यांचा शोध घे असे ते जुलियनला सांगतात. त्याप्रमाणे जुलियन हिमालयात भटकत राहतो. अनेक दिवसाच्या भ्रमंती नंतर त्याला योगी रामन नावाचे योगी भेटतात. ते त्याला शिवाना या गावात घेऊन जातात. जीवन समृद्ध बनवण्यासाठी जी मूलतत्त्वे आवश्यक असतात ते एका दंत कथेतून योगी रामन ज्युलियनला सांगतात.
ती दंतकथा अशी.......
योगी रामन ज्युलीयनला म्हणतात,अशी कल्पना कर तू एका अतिशय सुंदर हिरव्यागार बागेत बसला आहेस. या बागेत अत्यंत दुर्मिळ सुंदर फुले आहेत. या जादुई बागेत फिरताना तुला मध्यभागी एक सहा मजली बंगला झगमगत असताना दिसेल तो अगदी दीपस्तंभ सारखा आहे. यातून एक जपानी सुमो बाहेर येतो. तो बलाढ्य आणि नग्न आहे. त्याच्या कमरेभोवती गुलाबी तार आहे. त्याला खूप वर्षांपूर्वी कोणीतरी विसरलेले सोन्याचे घड्याळ दिसते. ते घड्याळ तो घालतो आणि जोरात खाली पडतो. आता तो मरणार असे वाटत असतानाच त्याला पिवळ्या गुलाबांच्या सुगंधाने स्फूर्ती मिळते आणि तो उभा राहतो. एका ठिकाणी झाडांच्या मध्ये त्याला चमकत्या रत्नांचा अरुंद रस्ता दिसतो.त्याचे अंतर्मन त्याला या रस्त्याने जाण्यास सांगते व तो त्या रस्त्याने जातो. हा रस्ता त्याला चिरंतन सुख आणि मनःशांती देतो. दंतकथेतील सात मूलभूत तत्व समजवण्यासाठी योगी रामन यांनी अद्भुतरम्य बाग, दीपस्तंभ, सुमो पैलवान, गुलाबी तार ,सोन्याचे घड्याळ, गुलाबांचा सुगंधआणि रत्नजडित मार्ग यांना प्रतीक म्हणून निवडले आहे.
शिवानातील योगींच्या सानिध्यात राहून मिळालेले ज्ञानामृत तो जॉनला देतो.जॉन त्याला म्हणतो,"ज्युलियन तुझ्याकडून मिळालेले ज्ञान आणि तत्व मी वाया जाऊ देणार नाही यासाठी मी स्वतःला वाहून घेईन. मी मिळालेले हे ज्ञान दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करेन". पुस्तकाच्या शेवटाकडे येता येता आपल्याला आपले अंतर्मनही जॉन सारखे एखाद्या ध्येयाने आणि दृढ निश्चयाने ओतप्रोत झाल्याचे भासते. आणि अवचित मुखपृष्ठावरचे वाक्य सार्थ असल्याचे जाणवते... हे वाक्य म्हणजे...
"तुमची स्वप्नपूर्ती करणारी आणि भाग्योदयाकडे नेणारी प्रभावी दंतकथा".
नक्की वाचा.....
टिप्पण्या