पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

एक होता कार्व्हर (Ek hota carver)मराठी पुस्तक|वीणा गवाणकर

इमेज
एक होता कार्व्हर-Ek Hota Carver Book review प्रस्तावना:-         वाचनाची आवड असणाऱ्या माझ्यासारख्या अनेक साहित्य वेड्या वाचकांना पुस्तक म्हणजे, जीव की प्राणच जणू!!! मराठी पुस्तक वाचनं तसं सोयीचं....कारण मातृभाषा मराठी. असेच एक पुस्तक हाती लागले.... ते म्हणजे " एक होता कार्व्हर!" वास्तविक पाहता या पुस्तकातील पात्र म्हणजे एका नीग्रो शास्त्रज्ञाचे चरित्र. कुतूहल वाटले म्हणून वाचण्यास घेतले. एकदा दोनदा वाचून झालं. मन काही शांत होत नव्हतं. प्रत्येक क्षणाला हा माणूस आपल्या समोर उभा आहे असा भास होत होता. आणि त्याच्या त्या आभासी आदरयुक्त धाकाने शेंगाची टरफल सुद्धा  डस्टबिन ऐवजी झाडाच्या बुंध्याशी कधी जाऊ लागली हे कळलेच नाही. प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्या अप्रतिम,अद्वितीय, लेखनातून साकारलेलं हे पुस्तक म्हणजे आपल्याला मिळालेली अनमोल देण आहे. कार्व्हर जरी भारतात जन्माला आला नसला तरीही त्याची आयुष्य गाथा ही सामान्य माणसाची कथा आहे. कार्व्हर म्हणजे आपल्या जवळ असणाराच एखादा आपल्यातील माणूस आहे असाच भास वाचताना होतो. अशी महान असामान्य माणसे भारतात जन्माला यायला हवी.. शेत...

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

इमेज
प्रस्तावना ---             रणांगणावर कर्तृत्व गाजवणाऱ्या प्रत्येक पराक्रमी , शुर, धैर्यवान योध्याचे आयुष्य अनेक रोमहर्षक प्रसंगांनी भरलेलं असतं. थोरले बाजीराव पेशवे ही त्यापैकीच एक. तो ऐतिहासिक कालखंड, त्या वेळची परिस्थिती आणि राजकीय तसेच सामाजिक जीवन पद्धती यांचा अभ्यास करता ब्राह्मणी आणि यवनी संस्कारांची देवाण-घेवाण करावं इतपत पुढारलेला समाज त्या वेळेचा निश्चितच नव्हता. तरीही अप्रतिम सौंदर्याची खाण असणाऱ्या मस्तानीवर बाजीरावाने उत्कट प्रेम केलं. विरह यातनेत मृत्युला कवटाळून समाजविरोधी केलेल्या धाडसाची यथोचित किंमतही चुकवली.             अप्रतिम कल्पनाविलास , सुरेख लेखन शैली यामुळे राऊ वाचतांना वाचक सहज सुलभ त्या दृश्यांच्या अवतीभवती असल्याचा भास होतो. थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या मधील भावनविश्व रेखाटताना कोठेही अतिरेक झाला नाही आणि त्यामुळेच राऊ वाचकांच्या पसंतीस उतरली. पुस्तक ---                  ...

Rohini pande(रोहिणी पांडे)- रोही पंचाक्षरी| नक्षत्रावली

इमेज
प्रस्तावना:-                 माणूस म्हटला की, व्यक्त होणे हे ओघाने आलेच. स्वतःला जे म्हणायचे आहे, सांगायचे आहे ते कोणी बोलून तर कोणी हातवारे करून व्यक्त करतो. चित्र ,कविता ,लेख, निबंध, कथा ,कादंबऱ्या ही सगळी  व्यक्त होण्यासाठीची  मानव निर्मित साधने आहेत. मनातील भावना काव्यरूपात कागदावर उतरल्या की त्याची कविता होते. त्याच कवितेला सुरांची जोड लागली की ते काव्य होतं. आणि आता याच काव्याला सुमधुर आवाज मिळाला की ते गीत माणसाच्या मुखातून गुणगुणन्या इतपत लोकप्रिय होऊन जातं. एकाच व्यक्तीमध्ये हे सर्व गुण असणारी माणसे दुर्मिळच म्हणावी लागतील.                   "रोहिणी पांडे" या अशाच एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची भेट योगायोगाने झाली आणि या बहू गुणसंपन्न अशा व्यक्तीतील नानाविध पैलूंची ओळख होत गेली. कविता, लेख ,कथा ,गझल , अलक अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील त्यांचे लेखन वाखाणण्याजोगे आहे. हा प्रवास करत असतानाच स्वनिर्मित काव्यप्रकाराची निर्माती बनलेली ही मराठमोळी सखी एवढ्यावरच न थांबता आपल्या स्वनिर्मित ...