Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

पत्र लेखन| व पु. काळे यांना स्व लिखित पत्र|

प्रति,

व. पु. यांना

साष्टांग नमस्कार!

   तुमच्या साहित्यावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्या साहित्यातून"गुलमोहरा"प्रमाणे तुमचे विचार अलगद टिपून ते आचरण्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारी  मी एक साहित्य रसिक. 25 मार्च. तुमचा जन्मदिवस. आठवण येणे सहाजिकच होते. तसे तुम्ही, तुमचे विचार पुस्तकरूपाने आमच्या समोर नेहमीच असतात, पण तरीही 25 मार्च आला की तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते.

  वाचनाची सवय लहानपणी लागली. कळतं वय झालं तसं त्यातील अर्थ समजू लागला आणि गोडी वाढत गेली. वाचत असताना अनेक विचार मनात"रंगपंचमी"खेळू लागले. तुमच्या साहित्यातील शब्दांच्या उधळणीने मनात"काहूर"माजले.त्यास शांत करणे, समाधान करणे गरजेचे होते. आशा वेळी मदतीचा हात देण्यास"सखी"आली. ती समजून घेत असतानाच "ठिकरी"ची सोना भेटली.


सोना ही पुरुषप्रधान संस्कृतीतील माणसाच्या वासनेची शिकार झालेली नायिका. स्वतः ठिकरी झालेली असताना जमेल तसे इतर ठिकाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते. त्यांना मदतीचा हात देते. यातच तिला कृतार्थता वाटते. कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली घेते तशीच ही सोना आपल्या पंखाखाली घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते.


माणसाचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद तुमच्या लेखणीत आहे. तुमचे"का रे भुललासी"हे त्याचेच उदाहरण मला वाटते. माणसाला जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागते. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे मुखवटे घालून माणूस आपले सुख दुःख, प्रेम लपवत असतो. प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. माणसाच्या खऱ्या रंगाचे वर्णन यात तुम्ही किती सुरेख मांडले आहे..हे माझ्या वाचनात आले तेव्हा मी वीस एक वर्षाची असेल.  माझ्या मनात हे घर करणार हे पाहिलं साहित्य.


तुमचं साहित्य वाचन म्हणजे माझ्यासाठी जणू"महोत्सव"माझ्या वाचनाची भूक मी तुमचे साहित्य वाचून पूर्ण करत, स्वतःला त्यात झोकून देत गेले.


व पु.काळे सर तुम्ही माहीत नाहीत असा मराठी साहित्यप्रेमी सापडणार नाही. तुम्ही म्हणजे मराठी मातीला मिळालेला अनमोल हिरा आहात.तुम्ही रचलेल्या साहित्य सागरातील मोती वेचत मी लहानाची मोठी झाले. तुमच्याबद्दल, तुमच्या साहित्याबद्दल लिहावं एवढी माझी पात्रता नाही.तुम्ही खऱ्या अर्थाने वाचकांचे"पार्टनर"आहात.


मन अस्वस्थ असताना तुमचे साहित्य आम्हा वाचकांस"चिअर्स"करते. त्यातून ऊर्जा घेऊनच पुढची वाट सुकर करतो आम्ही. तुमचे जाणे मनाला चटका लावून जाणारे... खूप वाईट वाटले. त्या वेळी मी बी. ए. च्या शेवटच्या वर्षी असावी.... वाचनातही मन रमत नव्हतं... पुन्हा तुम्हीच आलात धावून..... आणि"दोस्त"बनलात....कायमचे....मला खात्री आहे तुमचे साहित्य आमच्यासवे येणारी हजार एक वर्ष तरी प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज राहतील.


आज मी या पत्रातून मला उमजलेले "तुम्ही"शब्दरूपाणे मांडण्याचे वेडे धाडस केले आहे.समुद्राएवढे तुमचे साहित्य, आकाशाएवढी त्याची व्याप्ती. याचा सुगंध वर्षणुवर्षे  सर्वत्र दरवळत राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि विनम्र अभिवादन करून तुमच्या चरणी नतमस्तक होते.


                                                                                                                  सौ.मैथिली कुलकर्णी,नांदेड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges