Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

एपीजे अब्दुल कलाम|अग्निपंख मराठी बुक|APJ Death, Biography|Agnipankh

 प्रस्तावना:-

           जगविख्यात अनुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, हाडाचे शिक्षक, वृक्षप्रेमी आणि बालप्रेमी डॉक्टर अब्दुल कलाम. प्रत्येक भारतीयांच्या मनात ज्यांनी आपल्या कार्याने कष्टाने कर्तुत्वाने वेगळे स्थान निर्माण केले असे हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न असे महान पुरस्कार ज्यांच्या नावावर आहेत, ज्याने आपले संपूर्ण जीवन भारतभूमीच्या उज्वल भविष्यासाठी वेचली अशा भारतीय भूमिपुत्राबद्दल काय आणि किती वर्णन करावे??

 जगभरात झालेल्या कीर्तीतुन च त्यांच्या कार्याची सिद्धता होते. अब्दुल कलाम भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ तर होतेच पण त्याचबरोबर 2002 ते 2007 या काळात त्यांनी भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम केले. चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे ही त्यांनी काम केले. वर्तमानपत्र वाटणारा एक मध्यमवर्गीय मुलगा ते  देशाच्या  राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा, सहज नक्कीच नव्हता.


           अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी सध्याच्या तमिळनाडूच्या रामेश्वरम येथे झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन मारकायर होते. ते बोटीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते. कलाम यांच्या आई आशिअम्मा गृहिणी होत्या. कुटुंबातील चार भाऊ आणि एक बहीण या भावंडात अब्दुल कलाम हे सर्वात लहान होते. आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांचा मोठा प्रभाव त्यांच्या जडणघडणीवर झाला. प्रामाणिकपणा,स्वयंशिस्त, चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची अंतरिक शक्ती, दयाळू वृत्ती अब्दुल कलाम यांच्यातील हे सारे गुण त्यांच्या आई-वडिलांच्या संस्कारांची देण आहे. 

 27 जुलै 2015 रोजी भारतीय शास्त्रीय व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी ते गेले असता त्यांना अस्वस्थता जाणवू लागली. ते व्याख्यानासाठी उभे असतानाच अचानक स्टेजवर कोसळले. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून ते सावरू शकले नाहीत आणि त्यांची प्राणज्योत मावळली.

        डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आज आपल्यात नसले तरीही त्यांनी केलेले कार्य, त्यांनी दिलेले योगदान प्रेरणा रुपात आपल्या सोबत आहेत. अशा या महान व्यक्तीवर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत.

प्रज्वलित मने,अदम्य जिद्द,दीपस्तंभ, माझ्या स्वप्नातील भारत अशी कैक पुस्तके त्यांच्यावर लिहिली गेली आहेत.

          "विंग्स ऑफ फायर" या अब्दुल कलाम यांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे लेखिका माधुरी शानभाग यांनी "अग्निपंख" या नावाने अनुवादित केलेले  पुस्तक आहे.


                              (सौजन्य: गूगल इमेज)

पुस्तक:- अग्निपंख

लेखिका:- माधुरी शानभाग

प्रकाशन:- राजहंस प्रकाशन

किंमत:- ₹२२०/-


        -:लेखिका परिचय:-


माधुरी मोहन शानभाग या मूळच्या बेळगावच्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव गीता प्रभू आजगावकर. पदार्थ विज्ञानाच्या प्राध्यापिका म्हणून यांनी कार्य केले आहे. यांचे 25हून अधिक मराठी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. चरित्र विज्ञान , कथा , कादंबऱ्या , लघुकथा संग्रह यांचा त्यात समावेश आहे.


*माधुरी शानभाग यांची काही पुस्तके*


चेहरे (कथासंग्रह)


डॉक्टर्स फ्रॉम हेल(अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक-व्हीवियन स्पीझ)


अंतरी विणा झंकारती


अग्निपंख (अनुवादित, इंग्रजी पुस्तक विंग्स ऑफ फायर-लेखक ए.पी.जे.अब्दुल कलाम)


चकवा


जे आर डी एक चतुसूत्र माणूस


नोबेल पारितोषिक विजेते चंद्रशेखर (चरित्र)


पळसाची पाने


पुनर्जन्म (विज्ञान कथा)


मुंगी उडाली आकाशी


समुद्र (कथासंग्रह)


तिची गोष्ट


लेखन माला


वाटेवरचे रंगतरंग (प्रवास वर्णन)


सी एन आर राव - अनोख्या रसायनाने बनलेला माणूस


स्त्रियांचे सक्षमीकरण शासकीय पोलीस सेवा निवृत्ती आणि प्रशासन (अनुवादित, मूळ इंग्रजी पुस्तक- लेखिका किरण बेदी)


         माधुरी शानभाग यांना महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड या संस्थेतर्फे देण्यात येणारा २०१६ चा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाला आहे.


*अग्निपंख*---


              या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठावर अब्दुल कलाम यांचे चित्र आहे. त्यांची धीर गंभीर मुद्रा खूप काही बोलून जाते. अनेक वर्षांची मेहनत, तपश्चर्या , कष्ट या चित्रातून जाणवतात. पुस्तकाच्या डाव्या बाजूला आकाशात झेपावणारे रॉकेट आहे. कलाम यांच्या दूरवर पसरलेल्या कीर्तीचे ते प्रतिकच म्हणता येईल. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे राष्ट्रपतीपद भूषविणाऱ्या कलामांचे जीवन म्हणजे प्रत्येक युवा युवतीला प्रेरणा देणारे आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी व देश सेवेसाठी वेचले. अग्निपंख या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या खडतर प्रवासाचे वर्णन तर सांगितले आहेच पण त्याचबरोबर अग्नी, आकाश , पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या क्षेपणास्त्रांची ओळख, त्यांची जडणघडण याची सहजपणे सर्वसामान्य जनतेला माहिती करून दिली आहे.


         अथर्व वेदांच्या ओळींनी या आत्मचरित्राची सुरुवात होते. तमिळनाडूमधील रामेश्वरम येथे एका नावाड्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना जपणारा तो काळ होता. त्यांच्या दडणघडणीत त्यांचे कुटुंब आणि शिक्षक यांचा अनमोल असा वाटा आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्यांनीही आपले बालपण भोगले आहे. शाळा कॉलेज शिकत असताना कित्येक वेळा शिक्षणाची फीस देण्यासाठी ही त्यांच्याकडे पैसे नसायचे. अशावेळी वेळप्रसंगी त्यांच्या बहिणीने आपले दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. अशाही स्थितीत एरोनॉटिकलचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या भेटीने ते भारावून गेले. अनेक चुकांमधून सुधारणा करत त्यातून शिकत रोहिणी उपग्रहाचे प्रक्षेपण त्यांनी यशस्वी करून दाखवले. त्यानंतर त्यांची प्रगती पुढे चालतच राहिली आणि त्यांनी यातूनच स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवले. अब्दुल कलाम यांचा सांघिक कार्यावर विशेष भर होता. त्रिशूल पृथ्वी अग्नी या अग्निबाणाची त्यांनी निर्मिती केली. त्यांच्या या कार्यामुळे जगभरात त्यांचे कौतुक तर झालेच पण त्याचबरोबर संपूर्ण जगाचे भारतीय क्षेपणास्त्र सामर्थ्याकडे लक्ष वेधले गेले. आकाश व नाग या अग्निबाणाचीही निर्मिती त्यांनी केली. या निर्मिती वेळचे काही प्रसंग आपल्या चरित्रात त्यांनी मांडले आहेत. हे प्रसंग भारावून टाकणारे आहेत.


         अग्निपंख या आत्मचरित्रातून तरुणांना प्रोत्साहित करताना भारतीयांमध्ये असलेल्या समतेची जाणीव ते आवर्जून करून देतात. भारतीय संशोधक तंत्रज्ञ अपयशाला कधीही घाबरत नाहीत. अपयश हीच यशाची पहिली पायरी ते मानतात आणि त्यातून शिकत ,सुधारणा करत अत्यंत आत्मविश्वासाने आपले ध्येय यशस्वीरित्या गाठतात हे लक्षात येते. भारतीय अवकाश संशोधन, तंत्रज्ञ आणि विकास, क्षेपणास्त्रामध्ये मोठा वाटा असलेल्या लोकांचे योगदानही लक्षात घेण्यासारखे आहे.


           मेहनत, जिद्द,चिकाटी यातून घडत गेलेल्या अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील "अग्निपंख" या आत्मचरित्रात बऱ्याच ठिकाणी प्रसंगानुरूप काव्यपंक्तींचा वापर झालेला आहे. यातून त्यांचे साहित्य प्रेम लक्षात येते. भारताच्या अवकाश संशोधन आणि शस्त्रास्त्र साध्यतेची ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे. तरुणाईच्या उज्वल भविष्यात उभारी देण्याचे काम हे आत्मचरित्र नक्कीच करेल. येणाऱ्या पिढीला स्वतःचे आणि देशाचे उज्वल भविष्य घडविण्यात हे पुस्तक नक्कीच मदत करेल.


©® मैथिली कुलकर्णी

रिची डॅड पुअर डॅड (मराठी)|अभिजीत थिटे|best seller Marathi books| रॉबर्ट टी कियोसाकी


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges