Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
अधिकारिणी:-
महाराष्ट्र प्रशासनाचा कार्यभार सांभाळून अनेक अडचणींना तोंड देत आपली तडफदार कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचे प्रेरणादायी अनुभव अधोरेखित करणारे हे पुस्तक. प्रशासनात अनेक लोक येतात आणि जातातही. आपापली कर्तव्य ते पार पाडत असतात. विशेषता या क्षेत्रात महिलांना फार अडचणींना सामोरे जावे लागते घर मूल संसार सांभाळून त्या आपली जबाबदारी नीट आणि पार पाडतात अशा रणरागिनींना व त्यांच्या कार्याला कितपत न्याय मिळतो? किंबहुना तो दिला जातो? या महिलांनी आपल्या पदापर्यंत पोहोचण्या मागची जिद्द त्यांची चिकाटी याची कल्पना कोणालाही नसते. जेव्हा त्यांचे कार्य सिद्ध होते तेव्हा त्या प्रकाश झोतात येतात आणि म्हणूनच स्वप्ना जरग यांनी आपल्या लेखणीतून या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पानिपतकार आय ए एस विश्वास पाटील यांनी या पुस्तकासंदर्भात अतिशय बोलके वर्णन केले आहे. ते म्हणतात...
"सळसळत्या रक्ताच्या तरुण-तरुणींना अधिकारींनी हा ग्रंथ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणा देईलच, पण पुढे नोकरीच्या कार्यकाळातही जीवनाची लढाई कशी जिंकावी यासाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरेल."
हे पुस्तक दोन भागांत आहे. पहिल्या भागात १३ आयएएस, आयपीएस महिलांच्या मुलाखातींचा समावेश आहे. दुसऱ्या भागात २००८ नंतर लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या नऊ विद्यार्थिनींची परीक्षाविषयक मनोगते आहेत. अशा सेवेत जाण्यासाठी आव्हानांसंबंधीची माहिती पुस्तकात मिळते. त्यामुळेच हे पुस्तक संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतं.
लेखिका स्वप्ना जगर यांनी प्रशासनातील जवळजवळ 22 महिला अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचा अनुभव ,अडचणी, भावना जाणून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. त्यांचा त्यांच्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी प्रशासनात कार्यरत असताना केलेले वेगवेगळे प्रयोग या सगळ्या गोष्टीकडे नेटकेपणाने दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या तसेच निवृत्त झालेल्या अशा महिला अधिकाऱ्यांपैकी 13 जणांची त्यांनी संवाद साधला. नागरी सेवेतल्या स्त्रीशक्तीचा अभ्यासपूर्ण वेध त्यांनी यानिमित्ताने घेतला आहे.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सर्वप्रथम पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी रोवली आणि आज सर्व क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. देशाच्या निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाच्या पदावर आणि राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी झेप घेतली आहे. स्त्रिया आता लीलया अनेक जबाबदार्या पार पाडताना दिसत आहेत. नागरी प्रशासनातही स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. स्वप्ना जरग यांनी प्रशासनातील २२ महिला अधिकार्यांच्या भेटी घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या कामासंबंधी, तसेच या कामाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांनी सेवेत असताना केलेले प्रयोग, हे सारे त्यांनी नेमकेपणाने मांडले आहे. या पुस्तकात विविध उच्च पदांवर काम करत असलेल्या, तसेच निवृत्त झालेल्या अशा अधिकार्यांपैकी अशा १३ जणींशी त्यांनी संवाद साधला आहे. २००८ नंतर ही परीक्षा दिलेल्या ९ जणींचे मनोगत आहे.
२००८ हे वर्ष निवडण्यामागचे कारण म्हणजे त्या वर्षीच्या आय.ए.एस.च्या १११अधिकाऱ्यांच्या तुकडीत ३२ महिला होत्या. हा उच्चांक होता. या सेवेत नुकत्याच प्रवेश केलेल्या महिला अधिकार्यांमध्ये संपदा मेहता, उज्ज्वला भागवत, मोक्षदा पाटील, नीलांबरी जगदाळे आणि शीतल उगले यांचा समावेश आहे. पहिल्या भागात लीना मेहेंदळे, मीरा बोरवणकर, राणी जाधव आणि नीला सत्यानारायण तसेच व्ही. राधा आदींचा समावेश आहे. या महिलांनी या सेवेकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगितला आहे; तसेच परीक्षा कशी द्यावी, कशी तयारी करावी याच्या टिप्स दिल्या आहेत. सेवेत येऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना या टिप्स उपयोगी पडतील. सेवेत विविध पदांवर काम केलेल्या ज्येष्ठ महिला अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा अनुभव सांगताना या सेवेत काय काळजी घ्यावी लागते व कशा कशाचा त्याग करावा लागतो, ते स्पष्ट केले आहे. जुन्या-नव्यांचा संगम साधनाऱ्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे- नेमकी शब्दरचना आणि निवडलेल्या विषयाशी प्रामाणिक राहून लेखिकेने या कार्यमग्न अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती मिळवली आहे आणि ती नेटकेपणाने सादर केली आहे. नागरी सेवेत नेमकेपणा लागतो आणि कसोटीच्या वेळी बुद्धीची परीक्षा पाहणारे प्रसंग येतात, तेव्हा त्या अधिकाऱ्यांची क्षमता कळते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवरील पुस्तकही असेच नेमके व अचूक हवे होते. इथे या अधिकाऱ्यांच्या कामाचा व त्यांच्या कष्टांचा तपशील पद्धतशीररीत्या सादर झालेला आहे. शब्दांचा फाफटपसारा नाही आणि अलंकारिक वाक्ये वापरून कुठेही कादंबरीचा बाज आणलेला नाही. तरीही हे पुस्तक वाचनीय आणि नागरी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी झाले आहे. या पुस्तकातील अनेक अधिकारी महिला या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत, तर काही अधिकारी महिलांनी लग्नानंतर सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून ही परीक्षा दिली आहे. त्यांच्या यशातून अनेकांना स्फूर्ती मिळेल. कठोर मेहनत आणि योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले, तर या परीक्षांचा हा अवघड गड जिंकणे शक्य आहे, असा विश्वास हे पुस्तक देते. प्रत्येक महत्वकांक्षी तरुणीने वाचावे असे हे पुस्तक आहे. प्रशासनातील या कर्तुत्वशालिनीला एकदा तरी नक्की वाचा.
©® सौ. मैथिली कुलकर्णी
*नक्की वाचा*
टिप्पण्या