Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती


सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल.

कोण आहेत या सुधा मूर्ती?

त्यांचे आई वडील कोण?

त्यांना कीती मुलं आहेत?

त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत?


या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.

                        (सौजन्य: गूगल इमेज)

   परिचय:-    

    सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील शिरगाव या गावी झाला त्यांच्या आई वडिलांचे नाव विमल कुलकर्णी आणि डॉक्टर आर. एस. कुलकर्णी. त्यांच्या जन्म झाला त्यावेळी मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याच्या बाबतीत उदासीनताच होती तरीही त्या जिद्दीने शिकल्या नुसत्या शिकल्याच नाही तर भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी त्यांनी मिळवली त्यांना सुवर्णपदकही मिळाले त्यावेळी त्यांच्या कॉलेजमधून त्या एकमेव महिला इंजिनियर होत्या. नारायण मूर्ती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्य आहेत. रोहन आणि अक्षता.


        अक्षता ही बिझनेस वुमन असून युके (UK) च्या पंतप्रधान ऋषी सोनक यांची ती पत्नी आहे. तर रोहन ने हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले असून तिथून त्याने पीएचडी केली आहे. या विद्यापीठात तो सोसायटी ऑफ फेलोज मधील जिनियर फेलो आहे. विद्यापीठातर्फे हा सन्मान मिळालेला संगणक विज्ञान शास्त्रज्ञ असा तो दुसरा आहे यापूर्वी हा पुरस्कार विद्यापीठाने मारव्हीन मिन्स्की यांना दिला होता.


      इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून संगणक शास्त्रात एम इ ही पदवी सुधा मूर्ती यांना मिळाली आहे. त्यांच्या शिक्षणानंतर अभियंता म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला इंजिनियर होत्या. पुण्याच्या क्राईस्ट कॉलेजात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या सध्या काम पाहतात सुधा मूर्ती यांनी केवळ कंपनीचे स्थापन केली नाही तर समाजाच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी इन्फोसिस फाउंडेशन या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या त्या सहसंस्थापिका आहेत. समाजातील विविध विकासकामांना गती देण्याचे काम ही संस्था करते सुधा मूर्ती सामाजिक कार्य सोबतच एक कुशल लेखिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत त्यांची कानडी मराठी इंग्रजी या भाषेत अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत नऊ पेक्षा जास्त कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत त्यांनी अनेक कथासंग्रह लिहिले आहेत.


*सुधा मूर्ती लिखित पुस्तके*


*डॉलर बहू (मराठी,इंग्रजी)*


          पेंग्विन प्रकाशनाने इंग्रजीमध्ये हे पुस्तक प्रकाशित केलं असून मराठीमध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे.

कादंबरी किंवा दीर्घकथा असलेल्या या पुस्तकामध्ये सर्वचर्चित सासू-सून संबंधांचे चित्रण केलेले आहे. परंतु त्याही पलीकडे पैशाच्या-भौतिक विकासापाठी लागल्याने होणार्‍या परिणामांवर लेखिका भाष्य करते. सास-सून हा अत्यंत तरल समजला जाणारा विषय लेखिकेने कुशलपणे उलगडून दाखवला आहे. पुस्तकातले वातावरण मध्यमवर्गीय आहे. मध्यमवर्गीय पात्र रेखाटताना त्यांचे बारीकसारीक तपशील, जडणघडण कल्पकतेने टिपले आहे. त्यांच्या अंतरंगांमध्ये डोकावण्याची धाटणीही कौतुकास्पद आहे.

शामण्णा हे एक सरळ स्वभावाचे शिक्षक. त्यांची पत्नी गौरी, दोन मुलगे आणि मुलगी असा संसार असतो. काटकसरीने संसार करणार्‍या गौरीचा स्वभाव महत्त्वाकांक्षी असतो. रेशमी साड्या, हिरेमोती असल्या महाग गोष्टींची तिला फार हौस असते. त्यातच कुटुंबातली एखादी व्यक्ती जर परदेशात गेली तर अशा महत्त्वाकांक्षांना अनेक फाटे, फांद्या फुटतात. कारण मिळणारी मिळकत डॉलरमध्ये असल्याने रुपयांमध्ये काही पट असते. घरात भौतिक गोष्टी वाढू लागतात, उपभोग वाढतो, पण माणुसकीचा झरा मात्र आटू लागतो, असे लेखिकेने सुचवले आहे. गौरीचा एक मुलगा व सून अमेरिकेत असतात. दुसरा मुलगा मात्र बँकेत साधा क्लार्क असतो. त्याची बायको चांगली गायिका व कष्टाळू, विनम्र सून असते. त्यामुळे तिचा पदोपदी गौरी अपमान करत असते. परंतु वर्षभर अमेरिकेत राहून आल्यावर गौरीचे डोळे उघडतात. आपण दुसर्‍या सुनेवर उगाच अन्याय करत होतो हे तिला कळतं. म्हणून भारतात आल्यावर तिच्याशी नीट वागायचं असं ठरवते. पण होतं उलटंच. डॉलर देणार्‍या सुनेचे गुणगान ऐकून सतत अपमानित होऊ नये म्हणून शामण्णा दुसर्‍या सुनेला दुसर्‍या ठिकाणी नोकरी करायला सांगतात!

लेखिकेने दोन व्यक्तींतील, दोन पिढय़ांतील, दोन संस्कृतींतील, दोन चलनांतील, दोन मनांतील अंतर तसेच गरीब-र्शीमंतीतील अंतर दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.


 *अस्तित्व*

           अस्तित्व म्हणजे सुधा मूर्ती यांच्या  लेखणीतून साकारलेली, वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कादंबरी होय. एका श्रीमंत घरातल्या मुकेशची व त्याच्या अस्तित्वाची ही कहाणी. सुखी समाधानी मुकेशच्या जीवनात अचानक एक वादळ उठतं. तो कोण, कोणाचा मुलगा अशा कधीच न पडलेल्या प्रश्‍नांनी तो वेढला जातो. त्याचं आयुष्य पार बदलून जातं. एक बळकट कौटुंबिक बंध अचानक तुटून जातो. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती ? स्वत:च्या जन्माचा शोध घेता घेता मानवी जीवनातल्या कितीतरी अनोख्या वाटावळणांवरून त्याला जावे लागते.मुकेशच्या स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधाने मानवी नातेसंबंधांवर, भारतीय कुटुंबसंस्थेच्या, संस्कारांच्या शाश्‍वततेवर प्रकाशझोत टाकलेला आहे. एका कुटुंबात घडलेली ही घटना भारतातल्या कुठल्याही भागात घडू शकणारी आहे.  भारतीय लोकांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे रितीरिवाज आहेत, पण कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले नाते अत्यंत प्रेमाचे, जिव्हाळ्याचे असल्याचे सर्वच राज्यात,गवा गावात दिसून येते.


*जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)*


       सुधा मूर्ती यांचे हे लोकप्रिय पुस्तक आहे. दोन विरोधी समुदायांची संबंधित हे पुस्तक आहे श्रीकांत आणि श्रीमती यांच्या लग्नाची ही कथा आहे. सुधा मूर्ती यांनी लिहिलेली ही पहिली कादंबरी आहे जी आधुनिक मूल्य आणि कार्य नैतिकतेच्या तपासण्याची संबंधित आहे.


*तीन हजार टाके-- (मूळ इंग्रजी, ’थ्री थाउजंड स्टिचेस’; मराठी अनुवाद लीना सोहोनी)*

         आदिवासी महिलांना भेटण्यासाठी सुधा मुर्ती गेल्यावर त्यांना पहिल्यांदा बायकांनी स्वीकारले नाही पण त्यांनी जिद्द व चिकाटीने त्यांच्याशी संपर्क चालूच ठेवला. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नकेले. आपल्यावडिलांच्या सल्याने त्या पाड्यावर जाताना साडी घालून जाऊ लागल्या.हळु हळूचित्र बदलू लागले. सुधा मूर्ती यांच्या कष्टाला फळ आले. त्यांच्या प्रयत्नातून 3000 महिलांचे जीवन समृध्द झाले. या महिलांनी एक कार्यक्रम घेतला. त्यात सुधा मुर्ती यांना आमंत्रित केले. या महिलांनी त्यांना 3000 टाके घातलेली गोधडी दिली. या घटनेवर सुधा मुर्ती यांनी एक पुस्तक लिहीले आणि त्याला नाव दिले... तीन हजार टाके!


महाश्वेता (कानडी व इंग्रजी):--

    

         सुधा मूर्ती यांच्या अनेक पुस्तकांपैकी महाश्वेता आहे. हे त्यांच्या आवडीचे पुस्तक आहे. हे पुस्तक भ्रम आणि विश्वासघाताने ग्रासलेल्या जगात धैर्य आणि लवचिकतेची प्रेरणादायी कथा आहे . या पुस्तकात अनुपमा नावाच्या मुलीची कथा सांगितली आहे . कथेत नायिकेला ल्युकोडर्मा आजार झाल्याचे कळते.  या कथेत अनुपमा ही एक विवाहित स्त्री आहे जिला पतीने दूर केलेले असते. सामाजिक कलंक मिटविण्यासाठी ती मुंबईला येते. तिथे तीला नवीन जीवनासोबत यश आणि सन्मान मिळतो. 

  

*वाइज अँड अदरवाइज (इंग्रजी), (मराठी)*


       सर्वाधिक विकले गेलेले हे पुस्तक आहे. वास्तविक जीवनातील घटनांना एकत्रित करून संग्रह केलेले हे नॉन फिक्शन पुस्तक आहे. सुधा मूर्ती यांनी या पुस्तकात देशभरातील लोकांबद्दल काही मार्मिक आणि डोळे उघडणाऱ्या कथाकथन केल्या आहेत. यासोबतच पुस्तकात उदारतेच्या अविश्वासनीय उदाहरणांचा ही उल्लेख आहे हे पुस्तक 2022 मध्ये प्रकाशित झाले होते .सुधा मूर्ती यांच्या वाईज अँड अदरवाईज या पुस्तकाच्या इंग्रजी मध्ये 30,000 प्रति विकल्या गेल्या आहेत आणि सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये हे अनुवादित केले गेले आहे.


*हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अँड अदर स्टोरीज (इंग्रजी)*


          हे पुस्तक म्हणजे लघुकथांचा संग्रह आहे. या पुस्तकातील सर्व कथा अतिशय साध्या आणि हृदयस्पर्शी तसेच वाचकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.


थैलीभर गोष्टी


परिधी (कानडी) 


परीघ (मराठी)


पितृऋण


पुण्यभूमी भारत


बकुळ (मराठी) 


सुकेशनी

गोष्टी माणसांच्या


सामान्यांतले असामान्य (अनुवाद उमा कुलकर्णी) २०१७


द मॅजिक ड्रम अँड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी)


आजीच्या पोतडीतील गोष्टी 



आयुष्याचे धडे गिरवताना



द ओल्ड मॅन अँड हिज गॉड (इंग्रजी)


कल्पवृक्षाची कन्या: पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा (मूळ इंग्रजी-द डाॅटर्स फ्राॅम अ विशिंग ट्री, मराठी अनुवाद - लीना सोहोनी)

पुरस्कार आणि सन्मान:---


इ.स.१९९५ साली उत्तम शिक्षक पुरस्कार (बेस्ट टीचर अवोर्ड )


इ.स.२००१ साली ओजस्विनी पुरस्कार


इ.स. २००६ - भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.


इ.स. २००६ साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्कार


श्री राणी-लक्ष्मी फाऊंडेशनकडून १९ नोव्हेंबर, इ.स. २००४ रोजी राजलक्ष्मी पुरस्कार.


इ.स. २०१० - एम.आय.टी.कॉलेजकडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार.


सामाजिक कामासाठी राष्ट्रीय स्तरावरील सन्मान


सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी


इ.स. २०२३ - भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges