Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
रणजित देसाई यांचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या भराभर येऊ लागतात. "शेकरा" माञ यास अपवाद म्हणता येईल. वेगळा आणि तेवढाच उत्सुकतेचा विषय वाटल्याने वाचण्यास घेतले. एक ते दोन बैठकीत शेकरा ही मराठी कादंबरी संपण्याजोगी आहे. असे असले तरीही हे पुस्तक खूप काही शिकवून जाते.
प्रकाशन:- मेहता पब्लिशिंग हाऊस
लेखक:- रणजित देसाई
प्रकार:- कथा/कादंबरी
लेखक परिचय--
रणजीत रामचंद्र देसाई.यांचा यांचा जन्म ८ एप्रिल १९२८ साली झाला.
प्रसिद्ध मराठी ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत.
कादंबरी,नाटक,ललित,कथा कथा या साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे.
" पद्मश्री" या पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
६ मार्च १९९२ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
रणजित देसाई यांचे प्रसिद्ध साहित्य:-
संचित -(ललित)
समिधा -(कादंबरी)
सावली उन्हाची-(नाटक)
स्नेहधारा
संगीत सम्राट तानसेन
स्वामी-(कादंबरी)
स्वामी-(नाटक)
हे बंध रेशमाचे
पावनखिंड
राधेय
संकेत
शेकरा :-
रणजित देसाई यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. शेकरा ही त्यांची लघुकथा आहे.त्यांच्या निधनानंतर ही प्रसिद्ध झाली.जंगलातील प्राण्यांचे जीवन हा विषय याचा गाभा आहे. जंगलात राहणाऱ्या असंख्य प्राणिमात्रांपैकी एक शेकरा हा जीव. आणि याच प्राण्याच्या नजरेतून लेखकाने जंगलातील जीवन रेखाटले आहे. जंगलातील विविध प्राणी, त्यांचे जनजीवन, त्यांच्यातील संघर्ष सारे यातून अनुभवायला मिळते. वनातीलस भोवतालच्या परिसरात घडणाऱ्या घटना, त्यातील वास्तव, क्रौर्य भावना याचा भीषण अनुभव यात आहे. यात कोठेही माणसाचा उल्लेख दिसत नाही पण तरीही माणसाच्या जीवनातील भीषण सत्य व त्याचे कलात्मक वास्तव वाचताना प्रकर्षाने जाणवते.
काळे,झुबकेदार शेपूट असलेला आणि राखी रंगाचा हा खारीच्या जातीचा पण खरुताईपेक्षा मोठा शाकाहारी प्राणी. हा प्राणी या झाडावरून त्या झाडावर झेप घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.कथेचा नायक शेकरा हा निष्पाप प्राणी. संपूर्ण जंगल आणि जंगलातील झाडे म्हणजेआपलीच मक्तेदारीआहे याच आवेशात जंगलभर हिंडताना शेकरा किती सुरक्षित, निरागस, साक्षिवृत्तीने जंगल अनुभवणारा भाग्यवान प्राणी वाटतो न वाटतो तोवर तो एका खोकराचा अनपेक्षित भक्ष्य ठरतो.प्रतिकारासाठी साधन नाही, फक्त पलायन....पण तेही करता आले नाही की मग तो असहायपणे जंगलाच्या कायद्याचा बळी ठरतो.
"शेकरा " हा रणजीत देसाई यांचा संपूर्णतः वेगळा प्रयोग आहे.अत्यंत सुंदर रित्या त्यांनी याची बांधणी केली आहे. शेकरा सरळ धाटणीत वाचण्यापेक्षा त्याला समजून घेऊन वाचल्यास तो अधिक जवळचा वाटेल. जंगल सफारीचा अनुभव घेतलेल्या वाचकांना कदाचित हे म्हणणे चटकन लक्षात येईल. शेकरा आपल्याला त्याच्यासोबत जंगल सफारी करायलाच लावतो. तोच आपल्याला जंगलातील नियम ,प्राणी जीवन जगत असतानाचे त्या प्राण्याचे कायदे, त्याचबरोबर विविध प्राण्यांची माहिती करून देतो आणि आपण आपल्याही नकळत त्याच्यासोबत जंगल सफारी करूनही येतो. माणसांप्रमाणेच निसर्गातील हवामान बदलाचा जंगलावरही परिणाम होतो. जंगलामध्येही सामर्थ्यवान प्राण्यांचेच राज्य असते. मात्र येथे सर्व प्राण्यांना संधी मिळते. पळून जाण्याची ,शिकार करण्याची तर कधी विचारपूर्वक माघार घेण्याची. येणाऱ्या कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची चाहूल क्षेत्राला सर्वात आधी लागते तो ते आपल्या आवाजातून व्यक्त करतो. अचानक एक दिवस जंगलात आग लागते आणि संपूर्ण जंगल जळून खाक होते. सर्व प्राणी नाईलाजाने दुसऱ्या जंगलात निघून जातात. ज्या जंगलाने आपल्याला आश्रय दिला त्याला सोडून कसे जावे हा प्रश्न शेकराला पडतो आणि तो वाट पाहत तिथेच राहतो. वाट.... नवीन पालवी फुटण्याची. पण या सगळ्यात त्याला अनंत यातना सोसाव्या लागतात आणि यातच त्याची शिकार होते. एक छोटासा जीव असणारा शेकरा आपल्याला आयुष्यातील अनेक चढउतार दाखवून देतो. आयुष्याच्या वाटेवर पुढे काय होईल याची चिंता करण्यापेक्षा जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने कसा जगला पाहिजे हे तो शिकवून जातो. शेकरा च्या जाण्याने मात्र मनाला हुरहुर लावून जाते.
लहान थोराना वाचण्याजोगे हे पुस्तकं नक्की वाचा.
©® मैथिली कुलकर्णी
*नक्की वाचा.......*
टिप्पण्या