पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

अश्विनी निवर्गी(Ashwini Niwargi)|कथारंग

इमेज
प्रस्तावना:-                 अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या आपल्या भारत भूमीवरील महाराष्ट्र हे मराठी साहित्य क्षेत्रातील बहुमोल असे राज्य. आज जगभरात मराठी साहित्यिक वसलेले असताना 2022 चे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर येथे घेण्याचे कारणच मुळी सर्व काही सांगून जाते.  मराठवाड्यातील साहित्यिकांच्या लेखनशैलीची छाप मराठीच नव्हे तर जगभरातील वाचक प्रेमी वर पडताना दिसून येते आहे. मराठवाड्यातील प्रतिभावंत साहित्यिकांची, त्यांच्या लेखनशैलीची मोहिनी माणसाच्या मनावर आशी पडते की, ती व्यक्ती कायमची आपली होऊन जाते. त्या व्यक्तीचे लेखन आपल्या मनावर राज्य करू लागते. त्यांच्या विचारांनी माणूस एवढा भारावून जातो की, त्यांची पाऊले आपसूकच साहित्य वाटेवर चालू लागतात आणि साहजिकच त्यांची पुस्तके परिवारातील सदस्य स्वरूप प्रत्येक मराठी साहित्यप्रेमींच्या घरात विराजमान होतात.            मराठी साहित्याचा समृद्ध वारसा पुढे घेऊन जाण्याचे दायित्व निर्विवादपणे सांभाळत अखंड साहित्य सेवेस स्वतःला झोकून देणारे आणि सोशल मीडिया तसेच लहान थोर मंडळ...

झाशीची वाघीण (zashichi waghin)|भास्कर महाजन (Bhaskar Mahajan)

प्रस्तावना---               स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वीचा तो काळ खूप वेगळा होता. इंग्रजांचे भारतावर राज्य होते. त्यांची गुलामगिरी सहन करता करता सामान्य जन मेटाकुटीला आले होते. अशातच प्रत्येक संस्थान विलीन करून तेथील जनतेवर अत्याचार करण्याचा इंग्रजांनी सपाटा लावला होता. झांसी हे संस्थान त्याला अपवाद कसे राहील?                झाशीची राणी महाराणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या  जिवाची बाजी लावून इंग्रजांशी लढा दिला आणि त्यांच्या हयातीत इंग्रजांच्या तावडीतून  झाशी संस्थान वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. झाशी संस्थांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा, कार्याचा आढावा म्हणजेच त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र होय. याचेच वर्णन  लेखक भास्कर महाजन यांनी आपल्या " झाशीची वाघीण"  या पुस्तकात केले आहे. पुस्तक-- झाशीची वाघीण लेखक-- भास्कर महाजन प्रकाशन-- चंद्रमौळी प्रकाशन लेखक परिचय---                   लेखक भास्कर महाजन यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची जवळ जवळ 65 च...

Anand Yadav Books|लोकसखा ज्ञानेश्वर , झोंबी| Anand Yadaw (आनंद यादव)

इमेज
         परिचय- प्रसिद्ध मराठी लेखक आनंद  यादव यांचा जन्म ३0 नोव्हेंबर १९३५ रोजी  झाला. कथा, कादंबरी ,बाल साहित्य, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारात त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. आनंद यादव यांची  ४0 हून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी त्यांना १९९० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांचे नाव विशेषत्वाने गणले जाते. ग्रामीण भागात प्रसिद्ध असणाऱ्या तमाशा या कला प्रकारातील तमासगीर कलावंतांच्या उपेक्षित जीवनाला जनतेसमोर आणणारी "नटरंग"  ही कादंबरी तमाशातील कलावंतांची शोकांतिका मांडते. आनंद यादव यांच्या याच कादंबरीचा मराठी चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटाने इतिहास रचला.   Anand Yadav Books|आनंद यादव पुस्तके:- नांगरणी ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या माऊली सैनिक हो तुमच्यासाठी मळ्याची माती गोतावळा घर जावई झाडवाटा स्पर्शकमळे  साहित्यिकाचा गाव नटरंग ग्राम संस्कृती घरभिंती  काचवेल झोंबी लोकसखा ज्ञानेश्र्वर:-    ज्ञानेश्वर माऊली | ज्ञानराज माऊली तुकाराम | ...

जिजाऊसाहेब[मदन पाटील]| ऐतिहासिक कादंबरी

इमेज
 प्रस्तावना:-                        पृथ्वीतलावर माणूस जगत असताना, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना इतिहासात घडून गेलेल्या गोष्टीं कडून प्रेरणा घेत असतो. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले... संघटन कौशल्य आणि गनिमी कावा शिवबातील या गुण कौशल्यामुळे छत्रपतींचे स्वराज्य स्थापन झाले. मराठी रयतेला राजा मिळाला. या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांची प्रेरणास्थान म्हणून खंबीरपणे उभ्या होत्या  त्या त्यांच्या मातोश्री "जिजाऊ साहेब".         १२ जानेवारी . राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंतीदिनी त्यांना त्रिवार नमन!!                               स्वराज्यस्थापनेच्या वेळचा तो काळ विचारात घेता, त्या काळात तसे पाहता स्त्रियांना अनेक बंधने होती. अशा परिस्थितीतही प्रसंगी हातात तलवार घेऊन स्वतः जिद्दीने येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जात आणि स्वतःचे ,आपल्या कुटुंबाचे, रयतेचे रक्षण करणे ही सोपी गोष्ट नव्हती....

जगावे तर असे (जितेंद्र इंगळे)|सिंधुताई सकपाळ

इमेज
  प्रस्तावना:-  " मी सिंधुताई सपकाळ" हा चित्रपट पाहिला आणि या थोर माऊलीचे चरित्र उलगडत गेले. त्यांना अधीक जाणून घेण्याची उतुस्काता वाटू लागली  लेखक जितेंद्र इंगळे यांचे "जगावे तर असे" हे सिंधुताई सपकाळ यांचे व्यक्तीचित्रण असलेले पुस्तक वाचून झाले. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे चार जानेवारी रोजी सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाले. हा निव्वळ योगायोग म्हणावा का? मन सुन्न करणारी घटना... ही बातमी ऐकून अक्षरश: निशब्द झाले होते. भावना दाटून आल्या पण बोलता येत नव्हतं. ज्या माऊली ची गरज आज पृथ्वीवर सर्वात जास्त होती तिला देवाने एवढ्या लवकर का बोलावलं हाच प्रश्न मनात सतत येत होता.                         (सौजन्य: गुगल इमेज) पुस्तकाचे नाव:-                      जगावे तर असे (व्यक्तिचित्रण) लेखक:-                         जितेंद्र दे. इंगळे व्यवसाय:-                ...

सांजधुन (उज्वला केळकर)|Ujwala Kelkar

इमेज
प्रस्तावना--                 उज्ज्वला केळकर यांची पुस्तके अतिशय वाचनीय असतात. सांजधुनही त्यातलाच एक अनुवादित कथा संग्रह आहे. माणसाच्या मनोवृत्तीच्या वेगवेगळ्या रूपांचे वर्णन त्यांनी आपल्या  कथांमध्ये मांडले आहे. परिचय :--- नाव.... उज्वला केळकर शिक्षण -  एम्.ए एम् एड्  व्यवसाय -         अध्यापन - कस्तुरबा ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे ३० वर्ष अध्यापन.----- १ वर्ष बळवंतराव झेले हायस्कुल - जयसिंगपूर येथे मुख्याध्यापिका. सध्या निवृत्त.  लेखन : -          विविध नियतकालिके, मासिके, साप्ताहिके इ.मधे कविता, कथा, ललित-वैचारिक लेख, पुस्तक-परिक्षणे, परिचय लेख, अनुवादित कथा इ. प्रकाशीत पुस्तकाचे नांव----- सांजधुन मूळ लेखक---- श्री मोहनलाल गुप्ता अनुवाद---    उज्ज्वला केळकर  उज्ज्वला केळकर यांची इतर प्रकाशित पुस्तके:-            उज्ज्वला केळकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील काही पुस्तकांची नावे खालील प्रमाणे आहेत------ १) गरगर गिरकी ...