पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

लता मंगेशकर (lata Mangeshkar)|स्वरयोगिनी| मधुवंती सप्रे

प्रस्तावना-- काही व्यक्ती आपल्या जीवनात इतके उंच शिखर गाठतात की, त्यांच्या आयुष्याकडे पाहताना डोळे दिपून जातात.मन फक्त होतं. त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अनेकांचं प्रेरणास्थान बनतं. स्वर साधनेस आपले उभे आयुष्य देणार्‍या आणि कित्येक दशकं आपल्या स्वर सुरांनी जगाचे लक्ष वेधणाऱ्या अवनी वरील तमाम जीवाच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या अशाच एका  ज्या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलत आहे, ती व्यक्ती म्हणजे साक्षात सरस्वतीच्या गळ्यात वास करत असे अशी सर्वांची लाडकी स्वर्योगिनी "लतादीदी". सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्यांना देवाज्ञा झाली. तन आणि मन दोन्हीही सुन्न झालं. जगच थांबल्या गत वाटू लागलं. मनातून त्यांचा विचार काही केल्या जात नव्हता. वर्तमानात त्या दिसत नसल्या तरीही पुस्तकं, गीत या सर्वांमधून त्या सगळ्यांमध्ये वावरत आहेतच."स्वरयोगिनी" हे मधुवंती सप्रे लिखित व्यक्ती चित्रण वाचून त्यांच्या अथांग कार्याचा आढावा घ्यावा आणि त्यांच्या अधिक समीप जाऊन यावे या हेतूने हे पुस्तक वाचले किती आणि काय लिहावे लतादीदीं बद्दल.... शब्दही अपुरे माझे अशी अवस्था झाली आहे.     स्वर योगिनी च्या ...

माधुरी चौधरी [कवयित्री] | आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या..

इमेज
  प्र स्तावना :--           काही साहित्यिक असे असतात, ज्यांच  साहित्य अंतर्मनाला हेलावून टाकतं.त्यांच्यातील लेखनकौशल्य वाचून मन आतृप्त होतं आणि त्यांनी लिहिलेला शब्द न शब्द मनाला छेदून तर जातोच पण तो वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. हा शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो, प्रश्न विचारत असल्याचा भास होतो आणि त्यामुळेच की काय वाचक प्रचंड अस्वस्थ होतो. त्या शब्दांची संवेदनशीलता, प्रखरता, स्पष्टताच एवढी असते की वाचक आतून-बाहेरून हेलावून जातो. असेच काहीसे "आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या " हा काव्यसंग्रह वाचताना झाले.           आपल्या लेखन प्रतिभेने सर्वसामान्य वाचकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी कवयित्री,लेखिका सौ. माधुरी चौधरी यांचा काव्यसंग्रह वाचताना डोळ्यात पाणी तरळले नाही तरच नवल.. भयान वास्तव दर्शन काव्यातून झालेले आहे आणि येथेच कवयित्रींनी वाचकास जिंकून घेतले आहे.            आज आपला भारत देश अमृतमहोत्सव साजरा करतो आहे.आजची नारी ही निश्चितच खूप बदललेली आहे. ती स्वावलंबी झालेली आहे. पण ज्...