पोस्ट्स

Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

एपीजे अब्दुल कलाम|अग्निपंख मराठी बुक|APJ Death, Biography|Agnipankh

इमेज
  प्रस्तावना :-            जगविख्यात अनुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, हाडाचे शिक्षक, वृक्षप्रेमी आणि बालप्रेमी डॉक्टर अब्दुल कलाम. प्रत्येक भारतीयांच्या मनात ज्यांनी आपल्या कार्याने कष्टाने कर्तुत्वाने वेगळे स्थान निर्माण केले असे हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न असे महान पुरस्कार ज्यांच्या नावावर आहेत, ज्याने आपले संपूर्ण जीवन भारतभूमीच्या उज्वल भविष्यासाठी वेचली अशा भारतीय भूमिपुत्राबद्दल काय आणि किती वर्णन करावे??  जगभरात झालेल्या कीर्तीतुन च त्यांच्या कार्याची सिद्धता होते. अब्दुल कलाम भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ तर होतेच पण त्याचबरोबर 2002 ते 2007 या काळात त्यांनी भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम केले. चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे ही त्यांनी काम केले. वर्तमानपत्र वाटणारा एक मध्यमवर्गीय मुलगा ते  देशाच्या  राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा, सहज नक्कीच नव्हता.         ...

स्वप्ना जरग|अधिकारिणी-Adhikarini|swapna jarag|Imp Book for MPSC UPSC|Motivated Book

 अधिकारिणी:-            महाराष्ट्र प्रशासनाचा कार्यभार सांभाळून अनेक अडचणींना तोंड देत आपली तडफदार कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचे प्रेरणादायी अनुभव अधोरेखित करणारे हे पुस्तक. प्रशासनात अनेक लोक येतात आणि जातातही. आपापली कर्तव्य ते पार पाडत असतात. विशेषता या क्षेत्रात महिलांना फार अडचणींना सामोरे जावे लागते घर मूल संसार सांभाळून त्या आपली जबाबदारी नीट आणि पार पाडतात अशा रणरागिनींना व त्यांच्या कार्याला कितपत न्याय मिळतो? किंबहुना तो दिला जातो? या महिलांनी आपल्या पदापर्यंत पोहोचण्या मागची जिद्द त्यांची चिकाटी याची कल्पना कोणालाही नसते. जेव्हा त्यांचे कार्य सिद्ध होते तेव्हा त्या प्रकाश झोतात येतात आणि म्हणूनच स्वप्ना जरग यांनी आपल्या लेखणीतून या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.         पानिपतकार आय ए एस विश्वास पाटील यांनी या पुस्तकासंदर्भात अतिशय बोलके वर्णन केले आहे. ते म्हणतात... "सळसळत्या रक्ताच्या तरुण-तरुणींना अधिकारींनी हा ग्रंथ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणा देईलच...

रिच डॅड पुअर डॅड(मराठी)|अभिजित थिटे|best seller Marathi books| रॉबर्ट टी कियोसाकी

इमेज
      मूळ इंग्रजी भाषेतील मराठीमध्ये अनुवादित केलेले हे पुस्तक. पुस्तके अनेक प्रकारची असतात. कोणी ऐतिहासिक लेखन करतं तर कोणाला अध्यात्मिक लेखनात रस असतो. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे अनेक भाषेत अनुवाद झालेले आहेत. मायबोली मराठी  ही त्यातलीच एक म्हणता येईल. लाखो लोकांना त्यांच्या पैशाप्रती असणारे विचार बदलण्यास भाग पाडणारे, माईंड सेट बदलवणारे विचार माणसांच्या मनात बिंबवणारे हे पुस्तक म्हणता येईल. * लेखक परिचय *       नाव : रॉबर्ट टोरू कियोसाकी • जन्म : 8 एप्रील 1947, हिलो, हवाई, यू.एस. • वडील : राल्फ एच. कियोसाकी • आई : मरजोरी ओ. कियोसाकी अनुवाद :--- *अभिजित थिटे* * अभिजीत थिटे यांनी अनुवादित केलेले इतर प्रकाशित पुस्तके* मुक्ती आय टू हेड अ लव्ह स्टोरी तेजशलाका मनःपूर्वक खुशवंत रिच डॅड पुअर डॅड:---                   पुस्तकाचे मुखपृष्ठ उघडल्यावर सुरुवातीला नेहमीच्या पुस्तकांप्रमाणेच अनुक्रमणिका दिसली. यात एकूण दहा प्रकरण आहेत.  धड्यांवरून नजर फिरवताना पुस्तकाचे स्वरूप लक्षा...

संपूर्ण चातुर्मास ( Sampurn chaturmas)|काशिनाथ अनंत जोशी| पुस्तक परिक्षण |चातुर्मासातील व्रत वैकल्यांची विशेष माहिती

इमेज
प्रस्तावना:-           मराठी संस्कृतीमध्ये सण, उत्सव, व्रतवैकल्य यास अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक कर्म आणि दानधर्म यावर सामान्य जन मनाचा गाढा विश्वास आहे. त्यामुळे अनेक मंदिरे,मठ यामध्ये भक्तांची गर्दी दिसून येते. सामान्य जीवन जगत असताना वर्षभर येणाऱ्या सण उत्सवांची माहिती देणारे आणि समाज जीवनात उपयुक्त ठरणारे, माणसाला वाटाड्या होऊन वाट दाखवणारे, मार्गदर्शन करणारे असेच एक धार्मिक पुस्तक म्हणजे " संपुर्ण चातूर्मास". चातुर्मास व्रत ( चातुर्मासात कोणते व्रत करावे) (जाणून घेण्यासाठी वरील लिंक ला नक्की click करा)            सर्वसामान्य कुटुंबातील अबालवृद्धांना धार्मिक गोष्टींची माहिती व्हावी तसेच ही माहिती एकाच ठिकाणी संग्रहित असावी या उद्देशाने लेखक, संपादक, प्रकाशक कै. काशिनाथ अनंत जोशी यांनी या पुस्तकाचे लेखन केले. साधरण १९५६ साली हे धार्मिक पुस्तक प्रसिद्ध झाले. पुस्तक:- संपूर्ण चातुर्मास (धार्मिक पुस्तक) लेखक:- काशिनाथ अनंत जोशी प्रकाशक:- रविंद रामचंद्र पेठे आवृत्ती :- २००६ किंमत:- ₹ ९०/-   काशिनाथ अनंत जोशी ---     ...

List of book's written by D.M.Mirasdar| द. मा. मिरासदार

 द. मा. मिरासदार:--                 कथाकार,विनोदी लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक असा साहित्य प्रवास करणारे द. मा.म्हणजेच दत्ताराम मारुती मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी झाला. साहित्य वर्तुळात ते दादासाहेब म्हणूनही प्रसिद्ध होते.                 द.मा. मिरासदार यांचे शिक्षण अकलूज (पंढरपूर) येथे झाले. पुण्यात एम.ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्ष पत्रकारिता केली. 1952 मध्ये अध्यापन क्षेत्रात प्रवेश करत पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन च्या शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.            मनुष्य स्वभावाच्या जवळ जाऊन त्यांच्या मनाचा ठाव घेत आपल्या विनोदाद्वारे माणसाच्या तना मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,आपल्या निष्कील स्वभावाने जन माणसाला भुरळ पाडणाऱ्या या श्रेष्ठ आणि जेष्ठ साहित्यिकाचे 2 ऑक्टोबर 2021 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. द. मा. मिरासदार यांन...

Marathi literature and his writer| मराठी साहित्य आणि साहित्यीक

  प्रस्तावना:-          मराठी संस्कृतीची गणना अति प्राचीन संस्कृतीमध्ये करता येईल. त्याचप्रमाणे मराठी साहित्याचेही आहे. इतिहास आणि संत परंपरेने मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. अभंग, ओवी, गोष्टी, कविता, लघु कथा, कादंबरी, महाकाव्य, खंडकाव्य, नाटक अशा नानाविध साहित्य प्रकारातून मराठी साहित्य लेखन झालेले आहे. साहित्य लेखनाचे हे वर्गीकरण संशोधनाअंती झाले असावे. मग हे संशोधन कधी झाले? तर मराठी वांड्मयाच्या संशोधनाचा खरा आरंभ एकोणिसाव्या शतकात सुरू झाला. मुद्रण कलेच्या शोधामुळे आणि आगमनामुळे हस्तलिखित असलेले साहित्य मुद्रणबद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि त्यातून एक एक टप्पा गाठता गाठता हस्त लिखित स्वरूपात असलेले महान ग्रंथ पुस्तक रुपात वाचकांच्या समोर आले. हस्तलिखितातील ज्ञानामृत चाखत मराठी संस्कृती अधिकाधिक समृद्ध होऊ लागली.        मराठी साहित्य लेखनातील काही नामांकित, प्रसिद्ध साहित्यिक:- अधिक माहिती साठी वाचा.... Wachan katta with Maithili Kulkarni * वी. वा.शिरवाडकर ( wi.wa.shirwadkar) * शिवाजी सावंत (shivaji sawant) * व. पु. काळे (w....

आम्ही नवदुर्गा (Amhi nawdurga)| पुस्तक परिक्षण| 10सख्यांचा एकत्र कथासंग्रह

इमेज
प्रस्तावना:-        आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या लातूर जिल्ह्यातील कार्यकारणीतील दहा पदाधिका-यांनी एकत्र येऊन त्यांच्या लेखणीतून साकारलेला कथासंग्रह म्हणजे आम्ही नवदुर्गा. 2021 मध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला कै. मोहन कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून या संस्थेचे बीज रोवले गेले. कोरोना या महामारी मुळे संपूर्ण जगच त्रस्त असताना, संपूर्ण कुटुंब घरात असताना अशा वेळी घरातील प्रत्येक माणसाच्या तब्येतीची काळजी घेण्यासोबतच स्वतःची तब्येत आणि स्वतःची मानसिकता ढळू न देणे हा मोठा टास्क एक गृहीणी ,एक महिला म्हणून प्रत्येक स्त्री वर होता. अशा अस्वस्थ मानसिकतेतून स्वतःला सावरत, कुटुंबाला फुलाप्रमाणे जपत असतानाच स्त्रियांनी स्वतःमधील साहित्यलेखन डिजिटल माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी पुढाकार घेतला. याचेच एक फलित म्हणून आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेकडे पाहता येईल. दोन वर्षाच्या या काळात संस्थेच्या अध्यक्ष माननीय प्राध्यापिका पद्माताई हुशिंग,उपाध्यक्ष माननीय प्राध्यापिका विजयाताई मारोतकर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे या संस्थेचा व्हाट्सअप वर समूह तयार झाला. प्रत्येक जिल्ह्यात त्याच्या शाखा स्थ...