Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

संपूर्ण चातुर्मास ( Sampurn chaturmas)|काशिनाथ अनंत जोशी| पुस्तक परिक्षण |चातुर्मासातील व्रत वैकल्यांची विशेष माहिती

प्रस्तावना:-

          मराठी संस्कृतीमध्ये सण, उत्सव, व्रतवैकल्य यास अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक कर्म आणि दानधर्म यावर सामान्य जन मनाचा गाढा विश्वास आहे. त्यामुळे अनेक मंदिरे,मठ यामध्ये भक्तांची गर्दी दिसून येते. सामान्य जीवन जगत असताना वर्षभर येणाऱ्या सण उत्सवांची माहिती देणारे आणि समाज जीवनात उपयुक्त ठरणारे, माणसाला वाटाड्या होऊन वाट दाखवणारे, मार्गदर्शन करणारे असेच एक धार्मिक पुस्तक म्हणजे " संपुर्ण चातूर्मास".

चातुर्मास व्रत ( चातुर्मासात कोणते व्रत करावे)

(जाणून घेण्यासाठी वरील लिंक ला नक्की click करा)

           सर्वसामान्य कुटुंबातील अबालवृद्धांना धार्मिक गोष्टींची माहिती व्हावी तसेच ही माहिती एकाच ठिकाणी संग्रहित असावी या उद्देशाने लेखक, संपादक, प्रकाशक कै. काशिनाथ अनंत जोशी यांनी या पुस्तकाचे लेखन केले. साधरण १९५६ साली हे धार्मिक पुस्तक प्रसिद्ध झाले.


पुस्तक:- संपूर्ण चातुर्मास (धार्मिक पुस्तक)

लेखक:- काशिनाथ अनंत जोशी

प्रकाशक:- रविंद रामचंद्र पेठे

आवृत्ती:- २००६

किंमत:- ₹ ९०/-

 

काशिनाथ अनंत जोशी ---

          काशिनाथ अनंत जोशी यांचा जन्म ११ डिसेंबर १९१३ रोजी झाला. काशिनाथ अनंत जोशी यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही पुस्तके नंत पैठणकर या टोपण नावानेही लिहिली आहेत.

काही प्रसिद्ध पुस्तके.....

पंचतंत्र

शिव पुराण

विष्णुपुराण

हितोपदेश

कथासरित्सागर

इसापनीती

अरेबियन नाईट्स

कोळी आणि राक्षस

बिरबल

सिंदबादच्या सफरी

*अनंत पैठणकर या टोपण नावाने लिहिलेली पुस्तके*

ज्ञानेश्वर चरित्र

एकनाथ चरित्र

तुकाराम चरित्र

पाच संत चरित्रे

मल्हारी महात्म्य

 सुलभ ज्ञानेश्वरी

देवी महात्म्य

रेणुका महात्म्य

काशिनाथ अनंत जोशी लिखित ही धार्मिक पुस्तके वारकरी संप्रदायात विशेष लोकप्रिय आहेत.

एकनाथी भागवत आणि सकलसंत गाथा या दोन मोठ्या ग्रंथांचे प्रकाशनाचे काम त्यांनी केले.

१९  नोव्हेंबर १९९१ या दिवशी का.अ.जोशी यांचे देहावसान झाले

माञ पुस्तक रूपाने ते सदैव या जगात चिरंतन राहतील.


संपुर्ण चातुर्मास:-

              संपूर्ण वर्षभरातील सण उत्सवात आपल्या उपयोगी येणारे हे पुस्तक आहे.हे पुस्तक एकूण सहा भागात विभागले गेले आहे. सुरुवातीलाच "देवदर्शन" या भागात प्रसिद्ध देवस्थानातील मूर्तींची चित्रे आहेत.

       पहिला भाग हा " नैमत्तिक पाठ,स्तोत्रे, आरत्या हा आहे. यात महात्म्य, आरत्या यांचा समावेश आहे. 

दुसरा भाग हा नित्योपयोगी स्तोत्र,पाठ पाठ याचा आहे.यात  रामरक्षा, श्री गणपती अथर्वशीर्ष, नित्य पाठाच्या 42 ओव्या, शिवलीलाअमृताचा आकरावा अध्याय तसेच काही लहान स्तोत्रही आहेत.

       

             तिसरा भाग येतो तो सण, उत्सव, नेमधर्म यांचा. आपण जे सण साजरे करतो त्याची धार्मिक दृष्ट्या माहिती या पुस्तकात दिली आहे. नागपंचमी, राखी पौर्णिमा, मंगळागौरी, पिठोरी अमावस्या, सत्यनारायण पूजा, हरितालिका, गणेश चतुर्थी, मकर संक्रांत, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, वटपोर्णिमा, अक्षय तृतीया अशा सर्वच सणांची उत्तम माहिती यात आहे. त्याचबरोबर रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, याविषयीची माहितीही यात आहे.


               "विविध माहिती" या चौथ्या भागात पसायदान, दत्तक्षेत्रे, चारधाम, ज्ञानदेवाचे हरिपाठाचे अभंग,अष्टविनायक अष्टविनायक याची माहिती आहे. "सचित्र कहाण्या व पूजा" या भागात कहाण्या आहेत.


             सहावा आणि शेवटचा भाग पूजेचा आहे.यात यातसत्यनारायणपूजा पूजा,संपूर्ण गणेश पूजा अश्या अनेक पूजनाचे विधिवत मार्गदर्शन केले आहे.


                  कैलासवासी काशिनाथ अनंत जोशी यांचे "संपूर्ण चतुर्मास" हे पुस्तक सणासुदीच्या दिवसात हमखास उपयोगी पडणारे आहे. आजच्या पिढीला सण उत्सवाचे महत्व समजण्यासाठी, बालमनावर सुसंस्कार होण्यासाठी हे पुस्तक अवश्य उपयोगी ठरेल.

©® मैथिली कुलकर्णी

*नक्की वाचा*

आम्ही नवदुर्गा (Amhi nawdurga)| पुस्तक परिक्षण|10सख्यांचा एकत्र कथासंग्रह



             

   


       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges