Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
(सौजन्य: गुगल इमेज)
जगावे तर असे (व्यक्तिचित्रण)
जितेंद्र दे. इंगळे
श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत महात्मा फुले महाविद्यालय, वरुड येथे ग्रंथालय लिपिक पदावर कार्यरत
* राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे समाज सेवक पुरस्कार , औरंगाबाद.
* डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सेवा गौरव पुरस्कार, अमरावती
* विदर्भ रत्न पुरस्कार, वर्धा
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण संघर्षाचा होता. त्यातील काही घटनांची सांगड घालत व्यक्तीचित्रण रूपात सिंधुताईंचे जीवन चित्र रेखाटले आहे .
"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" असे म्हणायला एक मिनिट लागणार नाही , पण याच आईचे आयुष्य जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी एक तप लागेल. एवढे त्यांची कार्य महान आहे.साधी सरळ आणि स्पष्ट लेखन शैलीतून उलगडत जाणारे माईंचे जीवनपट वाचकांच्या मनावर उमटत जातात. केवढा हा संघर्ष??
माईंचा संक्षिप्त परिचय, माईंची या जगाला कशी ओळख झाली?, गाईच्या गोठ्यात त्यांच्या मुलीचा जन्म कसा झाला,माईचे पहिले वहिले भाषण, आदिवासींच्या पुनर्वसनासाठी चा माईंचा दुसरा लढा या सर्व गोष्टींचा यात समाविष्ट करण्यात आला आहे. त्याच बरोबर त्यांच्या जीवनात त्यांनी खाल्लेल्या हाल-अपेष्टा याचे ही वर्णन अतिशय हृदयद्रावक असे करण्यात आले आहे.
वाचताना मन सुन्न होऊन जातं, अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. वाचताना वाचकाची अशी अवस्था असेल तर जिने ते प्रत्यक्ष भोगले आहे तिची काय अवस्था झाली असावी??
पुस्तकातील काही वाक्य मनास स्पर्श करून जातात...
"देवा आम्हाला हसायला शिकव
परंतु आम्ही कधी रडलो होतो
याचा विसर पडू देऊ नकोस"
सिंधुताई यांच आयुष्य म्हणजे खडतर प्रवास. हा प्रवास करत असताना त्या कधीही हरल्या नाहीत, डगमगल्या नाहीत, घाबरल्या तर मुळीच नाहीत. आई-वडील आपल्या मुलांचे नाव किती प्रेमाने ठेवतात.. पण सिंधुताईंचे नाव चिंधी ठेवण्यात आलं. एक मुलगी म्हणून एवढी उपेक्षा? लहान असताना त्यांचा विवाह झाला. बालविवाहास सामोऱ्या जाणाऱ्या माईंच्या चारित्र्यावर सासरच्या लोकांनी शिंतोडे उडवले. नवऱ्याने त्यांच्यावर संशय घेतला मग बाकीच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? घरातून हाकलून दिल्यावर त्या माहेरी मोठ्या आशेने परतल्या. पण माहेरच्या लोकांनीही त्यांना आधार दिला नाही. समाजानही वाळीत टाकल्यावर स्मशान भूमीशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. पिंडाचा भात आणि स्मशानातील जळत्या निखाऱ्यावर भाकरी भाजून खायची वेळ त्यांच्यावर आली. रस्ता बांधणीच्या कामात व्यस्त असणाऱ्या मजुरांच्या मुलांना त्या सांभाळू लागल्या.
"दिपक गायकवाड" नावाच्या एका निराश्रित मुलाला त्यांनी सहारा दिला. रस्त्यावर भीक मागणारे मुलं सांभाळताना त्या अनाथांच्या आई झाल्या. "ज्यांच कोणी नाही, त्यांची माई " असं त्या नेहमी म्हणत असत. ज्या नवऱ्याने त्यांना टाकून दिलं त्या नवऱ्याचा ही साभाळत त्यांनी केला. हे सर्व करत असताना आपल्या मुलीमध्ये आणि इतर मुलांमध्ये दुजाभाव होऊ नये म्हणून त्यांनी आपली मुलगी " ममता " हिला पुण्याचा सेवासदन मध्ये दाखल केलं. केवढा हा त्याग? केवढे समर्पण???
आपल्यासाठी तर सगळेच जगतात..... पण दुसऱ्यांसाठी समाजासाठी आपले आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवनारी ही माीई , अनाथांची माय ,थोर समाजसेविका ,इतरांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही याचे असहय दुःख आहे. देवाला ही आईची गरज भासली असावी. आज त्यांच्या जाण्याने अनाथ मुले ही खऱ्या अर्थाने अनाथ झाली आहेत.
काही अडचण आली की, आपण आपला रस्ताच बदलतो....पण माईंनी मात्र नेमके याच्या उलट केलं.त्यांनी वाटेत येणाऱ्या अडचणींना धीराने तोंड दिले आणि म्हणूनच त्यांचे कष्ट सार्थकी लागले. भारत सरकारला त्यांची ,त्यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागली आणि पद्मश्री सारखा मोठा सन्मान त्यांना मिळाला. अर्थात त्यांना कधीच कोणत्याच सन्मानाची लालसा नव्हती... कारण जगातील सर्वश्रेष्ठ सन्मान त्यांना जनतेने दिला होता तो म्हणजे "आई ". त्यांच्या समजकर्याबद्दल "सिंधुताई सपकाळ" हे नाव जनतेच्या सदैव स्मरणात राहील.
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनातील आदिवासींसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनापर्यंतचा भाग यात वर्णन करण्यात आलेला आहे आहे. त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र यात रेखाटण्यात आले आहे. सिंधुताईंना जाणून घ्यायचे झाल्यास हे पुस्तक नक्की वाचावे.
©® मैथिली कुलकर्णी
*नक्की वाचा*
सांजधुन (उज्वला केळकर)|Ujwala Kelkar
जिजाऊसाहेब [मदन पाटील]|ऐतिहासिक कादंबरी
टिप्पण्या