Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

Anand Yadav Books|लोकसखा ज्ञानेश्वर , झोंबी| Anand Yadaw (आनंद यादव)


        परिचय-

प्रसिद्ध मराठी लेखक आनंद  यादव यांचा जन्म ३0 नोव्हेंबर १९३५ रोजी  झाला.

कथा, कादंबरी ,बाल साहित्य, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारात त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.

आनंद यादव यांची  ४0 हून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी त्यांना १९९० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांचे नाव विशेषत्वाने गणले जाते.

ग्रामीण भागात प्रसिद्ध असणाऱ्या तमाशा या कला प्रकारातील तमासगीर कलावंतांच्या उपेक्षित जीवनाला जनतेसमोर आणणारी "नटरंग"  ही कादंबरी तमाशातील कलावंतांची शोकांतिका मांडते. आनंद यादव यांच्या याच कादंबरीचा मराठी चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटाने इतिहास रचला.

 Anand Yadav Books|आनंद यादव पुस्तके:-

नांगरणी

ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या

माऊली

सैनिक हो तुमच्यासाठी

मळ्याची माती

गोतावळा

घर जावई

झाडवाटा

स्पर्शकमळे 

साहित्यिकाचा गाव

नटरंग

ग्राम संस्कृती

घरभिंती 

काचवेल

झोंबी


लोकसखा ज्ञानेश्र्वर:-

   ज्ञानेश्वर माऊली | ज्ञानराज माऊली तुकाराम |

संत संत ज्ञानेश्वर महाराजां बद्दल आपण सारेच जण जाणतोच.

साक्षात रेड्या करवे वेदाचे उच्चारण करवुन घेण्याचे सामर्थ्य असणाऱ्या संत ज्ञानेश्वरा बद्दल किती आणि काय ते वर्णावे?

ज्यांच्या ज्ञानाच्या सामर्थ्याने, परमेश्वरी भक्तीमुळे भिंतही चालू लागली, ज्यांच्या अद्भुत ज्ञानामुळे सामान्य जनतेला त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटू लागली, अशा लोकसखा ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन कसे असेल? अर्थातच त्यांची वाट खूप खडतर होती...

येणाऱ्या प्रत्येक संकटाला हसत मुखाने सामोरे जाऊन निवृत्ती , ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांनी आपले अस्तित्व सिद्ध केले. आपल्यातील प्रतिभासंपन्न गुणांमुळे ते अल्पावधीत लोकांच्या मनात वसले. ज्ञानदेवाने रचलेल्या अभंगातून सामान्य जनतेला सरळ,सोप्या मार्गाने परमेश्वर भक्तीचा  मार्ग गवसला.

        आपले १६ वर्षाचे जीवन ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी संपूर्णपणे वाहिले. ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला संजीवन समाधी घेतली तो दिवस म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८.


                        (सौजन्य: गुगल ईमेजेस)


परिक्षण:-

                               आनंद यादव लिखित मेहता पब्लिशिंग हाऊसची  "लोकसखा ज्ञानेश्वर" ही अतिशय सुंदर कादंबरी आहे.

                      अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर (१७ वर्षानंतर ) मीराबाई व गोविंदपंत यांच्या पोटी एक पुत्र रत्न जन्माला आले.त्याचे नाव विठ्ठलपंत. पैठण मध्ये शिक्षण घेऊन आपल्या मूळ गावी "अपेगाव" येथे विठ्ठलपंत परत गेले. तीर्थाटन करत असताना त्यांची भेट आळंदीच्या उमाबाई व  सिादधोपंत कुलकर्णी शी झाली. त्यांची कन्या रुक्मिणी हिच्याशी त्यांनी विवाह केला. विवाहानंतर संन्यास पत्करला व सहा वर्षानंतर परत गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यामुळे धर्मस्थळ मंडळींनी त्यांना बहिष्कृत केले. विवाहाच्या 11 वर्षानंतर त्यांना चार अपत्ये झाली. 


त्यांची नावे त्यांनी अतिशय अर्थपूर्ण अशी ठेवली. निवृत्ती,ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई.

     संत परंपरेतील ही नावे आपल्याला ज्ञात असली तरी या नावांचा अर्थ  " लोकसखा ज्ञानेश्वर" या पुस्तकात स्पष्ट केला आहे.

   कर्मकांडानी भरलेल्या तथाकथित श्रेष्ठ वर्ण असणाऱ्या जातीतून त्यांनी प्रत्यक्षात नसले तरी मनाने निवृत्ती घेतली. म्हणून पहिला मुलगा "निवृत्ती".

ती स्वीकारल्यानंतर ज्ञानसाधना अखंडपणे करण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यात अनेक अडथळे आले, संकटे आली. तरीही ती श्रेष्ठ आत्मसाधना अखंड चालूच ठेवायची असा निश्चय त्यांनी केला. जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा कायम मनासमोर रहावा म्हणून दुसऱ्या मुलाचे नाव त्यांनी "ज्ञानदेव" ठेवले.

अध्यात्मिक क्षेत्रातील आत्मज्ञानाची साधना पर्वता सारखे असते. विज्ञान, अज्ञान ,अनवधान, मोह, माया यांनी हा पर्वत व्यापलेला असतो. हे सर्व करण्यासाठी मार्ग हा खडतर असतो. ही वाट हळू हळू, टप्प्याटप्प्याने अधिकाधिक उंचावरून उत्तुंग तेकडे नेणारी असते. ही वाट चालताना आपण एकाकी असतो. सतत एकाग्र दृष्टी ठेवून एक एक टप्पा गाठताना अनेक टप्प्यांचा सोपान चढला तरच अपेक्षित स्थळी जाऊन आपण पोहोचू शकतो. या सोपाना चे सतत भान रहावे, एकाग्र साधनेचे महत्त्व सतत डोळ्यासमोर राहावे म्हणून तिसऱ्या मुलाचे नाव "सोपान" ठेवले.


आत्म साधनेचा उत्तुंग सोपान चढून गेल्यावर सिद्ध अवस्था प्राप्त होते .ही अवस्था जन्म-मृत्यू, सुख-दुःख, माया-मोह ,राग-लोभ इत्यादीतून जीवनाला मुक्त करणारी व परमेश्वर स्वरूपात आत्मस्वरूप विलीन झाल्याचा, परमात्म्यात जीवात्मा एकरूप झाल्याचा साक्षात्कार घडवणारी असते .म्हणून चौथ्या अपत्याचे नाव मुक्ती म्हणजेच "मुक्ताई" असे ठेवले.

     

                संत परंपरेला अध्यात्मिक वळण देण्याचे मोठे कार्य ज्ञानेश्वरांच्या रुपाने घडले. त्यामुळे सामान्य जनतेच्या श्रद्धेला परमेश्वराच्या भक्तीची जोड मिळाली .याचा परिणाम म्हणजे संत संप्रदायाचा  आजही प्रसार होताना आपल्याला दिसून येतो.


             देव ऋषि, कर्मकांड,अघोरी पद्धतीने दिला जाणारा बळी, पूजा अर्चा या सर्व प्रकारांना ज्ञानेश्वरांच्या दृष्टीमुळे आळा बसला. बहुजन समाजाला प्रतिष्ठा मिळण्यास मदत झाली. ज्ञानेश्वरांच्या या गुणांचे "लोकसखा ज्ञानेश्वर" वाचत असताना आपल्याला दर्शन घडते. काही आक्षेपार्ह मजकुरामुळे हे पुस्तक वादाच्या भोवाऱ्यात अडकले आणि या पुस्तकावर कायमची बंदी घालण्यात आली.


झोंबी:-

झोंबी ही मराठी लेखक आनंद यादव यांनी लिहलेली आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशन च्या या पुस्तकाला पु.ल. देशपांडे यांनी प्रस्तावना लिहलेली आहे. या पुस्तकाचे नंतर नांगरणी, घरभिंती , आणि काचवेल हे तीन भाग प्रसिद्ध झालेले आहेत. शाळेत जाऊन शिकण्यासाठीची आनंद यादव यांची धडपड , शाळा शिकू न देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी दिलेला मार आणि त्यांचे या काळातले इतर अनुभव आणि त्यांचे शाळा आणि शिक्षकांबद्दलचे विचार या कादंबरीत आहेत.


       आपल्या शिक्षण प्रवासात नायकाला भोगाव्या लागणाऱ्या असंख्य दुःखाचा, अडचणींचा यात उल्लेख केला गेला आहे. पुस्तक वाचून झाल्यावर झोंबी या शीर्षकाचा खरा अर्थ समजतो आनंद यादव हे ग्रामीण फळीचे नेतृत्व करणारे लेखक म्हणता येतील. त्यांच्या लेखन शैलीतून ते जाणवते. ग्रामीण जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणी या शहरी जीवनशैली पेक्षा कितीतरी वेगळ्या असतात. ग्रामीण भागातील लोकांची प्राथमिकता वेगळी असते. या छोट्या छोट्या गोष्टी झोंबितून मांडण्यात आल्या आहेत.



©® मैथिली कुलकर्णी

*नक्की वाचा*

दत्त लहरी (अनुवादक प्रा. रमेश भारदे)|Datt Lahari




       



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges