Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

जिजाऊसाहेब[मदन पाटील]| ऐतिहासिक कादंबरी

 प्रस्तावना:-

                       पृथ्वीतलावर माणूस जगत असताना, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना इतिहासात घडून गेलेल्या गोष्टीं कडून प्रेरणा घेत असतो. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले... संघटन कौशल्य आणि गनिमी कावा शिवबातील या गुण कौशल्यामुळे छत्रपतींचे स्वराज्य स्थापन झाले. मराठी रयतेला राजा मिळाला. या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांची प्रेरणास्थान म्हणून खंबीरपणे उभ्या होत्या  त्या त्यांच्या मातोश्री "जिजाऊ साहेब".

        १२ जानेवारी . राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंतीदिनी त्यांना त्रिवार नमन!!
       
                      स्वराज्यस्थापनेच्या वेळचा तो काळ विचारात घेता, त्या काळात तसे पाहता स्त्रियांना अनेक बंधने होती. अशा परिस्थितीतही प्रसंगी हातात तलवार घेऊन स्वतः जिद्दीने येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जात आणि स्वतःचे ,आपल्या कुटुंबाचे, रयतेचे रक्षण करणे ही सोपी गोष्ट नव्हती. इंग्रज, मोगल , निजाम यांचे वर्चस्व भारत भूमीवर त्याकाळी होते. त्यांच्या अन्यायाला न जुमानता जिद्दीने स्वबळावर स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपतींना प्रेरणा देणाऱ्या जिजाऊमाता यामुळेच वेगळ्या ठरतात. कादंबरी वाचत असताना आणि जिजाऊ साहेबांचे जीवन चरित्र उलगडत जात असताना त्यांच्या बद्दलची आत्मीयता वाढते आणि सन्मान द्विगुणित होतो.
त्यांनी केलेल्या कार्याला मानाचा मुजरा!!!



                        ( सौजन्य - गुगल इमेज )


पुस्तकाचे नाव : -

                  जिजाऊसाहेब

लेखक:-

                     मदन पाटील

प्रकाशन:-

                    श्री स्वामी पब्लिकेशन,पुणे

मदन पाटील यांची प्रकाशित पुस्तके:-

             मदन पाटील यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ऐतिहासिक लेखनावर त्यांचा भर अधिक असल्याचे जाणवते. काही पुस्तके खालीलप्रमाणे आहेत :-

१) अकथित सावरकर

२) महाराज साहेब ( हा मराठा नावाचा इतिहास आहे )

३) जिजाऊसाहेब

४) चला अणुशक्तीच्या जगात! 

५) माधवराव पेशवा

६) थॉमस अल्वा एडिसन

७) घालुया गवसणी अवकाशाला

८) अकथित हिटलर

९) परग्रहावरील जीवसृष्टी

१०) मुसोलिनी

११) छत्रपती प्रतापसिंह

१२) पेशवा बाळाजी विश्वनाथ

१३) रघुनाथराव पेशवा


जिजाऊसाहेब:-

     स्वराज्यासाठी, मराठी मातीसाठी, तिच्या अस्मितेसाठी आणि त्यास स्वतंत्र असे अस्तित्व मिळवून देण्यासाठी दिवसा ढवळ्या पाहिलेले स्वप्न  छत्रपती शिवरयांकरवे मूर्त रूपात आणणाऱ्या ...स्वराज्य जननी ..जिजाऊ साहेब!!


        श्री स्वामी पब्लिकेशन, पुणे प्रकाशित  मदन पाटील यांनी लिहिलेले "जिजाऊ साहेब" हे पुस्तक. जिजाऊंच्या जीवनावर ही कादंबरी रचली गेली आहे. ही कादंबरी वाचत असताना जिजाऊंची शिकवण आणि त्यांतून युद्ध पारंगत झालेल्या आपल्या पुत्र शिवबाच्या पराक्रमाची गाथा उकलत जाते.

          जिजाऊंच्या कार्याची दखल आज सर्व जगात घेतली जात असली तरीही त्या काळची परिस्थिती मात्र फार वेगळी होती. गुलामगिरी, पारतंत्र्य मराठी मातीतील लोकांच्या अंगवळणी पडले होते. अन्याय, अत्याचार सहन करत जनता जीवन जगत होती. राजमाता जिजाऊंना मात्र हे अमान्य होते. त्यांच्या मनातील हे शल्य, हा धगधगता निखारा ज्वाला बनून शिवरायांच्या रूपात जन्माला आला आणि जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी जिजाऊंच्या कुशल नेतृत्वाने पूर्ण केले. हे कार्य काही सोपे नव्हते... प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, जनतेत स्वाभिमान जागृत करावा लागला. त्या काळातील एका महिलेने केलेले हे महान कार्य  वाचताना  जिजाऊसाहेबांबद्दल चा आदर अधिकच द्विगुणित होतो.


            मराठी साम्राज्य उदयास येण्यासठी कारणीभूत ठरलेल्या जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांकडून हे महान कार्य करवुन घेतले...जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्यास आकार दिला.जिजाऊ लहान असताना च त्यांना गुलामगिरी खटकत असे, त्या क्रोधाने तडफडत असत. दुसऱ्यांची चाकरी करण्यापेक्षा मरण बरे असे त्यांना नेहमी वाटत असे. त्यांच्या या विचारांचे पडसाद त्यांच्या बालमनावर कोरत गेले. शिवबांवर ही नकळत हे गर्भसंस्कार होत गेले. त्यामुळेच शिवाजी आपले स्वप्न पूर्ण करू शकेल याची खात्री त्यांना वाटू लागली. मग त्यासाठी त्यांनी हालचाल सुरू केली. शिवबास तसे युद्ध नीतीचे शिक्षण दिले.शिवाजी महाराजांनी ही जिजाऊंच्या कार्यात स्वतःला झोकून दिले आणि अथक कष्टातून उभे राहिले ते मराठयांचे हिंदवी स्वराज्य!

जिजाऊसाहेबांनी केलेले कार्य--

१) राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. 
 २) राजांच्या सल्ला मसलतीत भाग घेत. 
  ३) राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात.
 ४) शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला  जिजाऊ मा साहेबांनी जिंकून घेतला.
५) जिजाबाईंनी पूर्णत: जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली. हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यासाठी केलेल्या अनंत परिश्रमात, शिवबा आणि मावळ्यांच्या पाठीमागे त्या खंबीरपणे शेवटपर्यंत उभ्या राहिल्या. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मराठी साम्राज्याला छत्र आणि  रयतेला राजा मिळाला.
६) संपूर्ण हिंदुस्तानात मराठ्यांचे राज्य स्थापन झाले. 


              मदन पाटील यांच्या या कादंबरीतून जिजाऊ साहेबांच्या बालपणाचा तसेच त्यांच्या आप्तेष्टांचा इतिहास समजतो. त्यांचे घराणे हे भगवान श्रीकृष्णाच्या घराण्याचे वांशज होते हे या कादंबरीत नमूद करण्यात आले आहे. जिजाऊसाहेब या निजामशाहीचे मातब्बर सरदार "लखुजी राजे जाधव " यांच्या कन्या. त्यांच्या आईचे नाव म्हाळसा राणी. जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी  सिंदखेडराजा ( जिल्हा- बुलढाणा ) येथे झाला. मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. निजामशाहीचा हुकमी कारभार त्या स्वतःच्या डोळ्यांनी लहानपणापासून पाहत आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात निजामाने केलेल्या अन्यायाप्रती भयंकर चीड होती. हा न्याय आपण का म्हणून सहन करायचा?? असेच त्यांना नेहमी वाटत असे.

        कादंबरी वाचताना जिजाऊंच्या अनेक गणगोताची ओळख होत जाते. जसे....

जगदेवराव जाधव हे जिजाऊंचे काका होते.

जगदेव ,दत्ताजी, अचलोजी,  बहादुर  हे जिजाऊंचे भाऊ होते.

उमाऊसाहेब,राजाराम देव ,हेमाद्री पंडित,   गोमाजी पानसंबळ, संभाजी राजे भोसले, तू काऊ मोहिते, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, बाजी घोरपडे,  अशा अनेक ऐतिहासिक मातब्बर सरदारांची पुस्तकात नोंद आहे. वाचताना त्यांच्या कार्याचा अंदाज बांधता येतो. हजारो-लाखो सरदार आणि मावळ्यांच्या रक्तातून मराठी स्वराज्याची स्थापना झाली. 

                 

          आजच्या महिलांना एवढंच सांगावस वाटत की, घ्यायचाच असेल तर जिजाऊंच्या स्वभावातील कर्तबगारी, कुशल प्रशासन,कर्तव्य कठोरता, हे त्यांचे गुण आत्मसात करून कार्य करूया... आणि आम्ही जिजाऊंच्या लेकी हे अभिमानाने म्हणू या.

आपण केलेले कोणत्याही क्षेत्रातील प्रामाणिक कार्य हीच त्यांनी केलेल्या त्यागाची खरी पोच पावती ठरेल.

एकदा नक्की वाचा---जिजाऊसाहेब!

©®मैथिली कुलकर्णी, नांदेड

*नक्की वाचा*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges