Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वीचा तो काळ खूप वेगळा होता. इंग्रजांचे भारतावर राज्य होते. त्यांची गुलामगिरी सहन करता करता सामान्य जन मेटाकुटीला आले होते. अशातच प्रत्येक संस्थान विलीन करून तेथील जनतेवर अत्याचार करण्याचा इंग्रजांनी सपाटा लावला होता. झांसी हे संस्थान त्याला अपवाद कसे राहील?
झाशीची राणी महाराणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या जिवाची बाजी लावून इंग्रजांशी लढा दिला आणि त्यांच्या हयातीत इंग्रजांच्या तावडीतून झाशी संस्थान वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. झाशी संस्थांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा, कार्याचा आढावा म्हणजेच त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र होय. याचेच वर्णन लेखक भास्कर महाजन यांनी आपल्या " झाशीची वाघीण" या पुस्तकात केले आहे.
पुस्तक-- झाशीची वाघीण
लेखक-- भास्कर महाजन
प्रकाशन-- चंद्रमौळी प्रकाशन
लेखक भास्कर महाजन यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची जवळ जवळ 65 च्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महासती गांधारी ही त्यांची साहित्यक्षेत्रातील 21वी कादंबरी आहे. त्यांच्या प्रकाशित साहित्य आणि पैकी काहींची नावे खालील प्रमाणे आहेत...
ज्येष्ठ कौरव दुर्योधन
झाशीची वाघीण
बहिणाबाई( चरित्र)
महासती गांधारी (चरित्र)
महाराणी लक्ष्मीबाई यांच्यावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.भास्कर महाजन लिखित झाशीची वाघीण वाचत असताना वाचक आपसूकच इतिहासात जातो. इतिहासातील ती घटना आपल्या डोळ्यासमोर होते आहे असा भास वाचकास होऊन जातो.
झाशीची वाघीण चरित्र वर्णन करत असताना प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न केला आहे. झाशी संस्थान व त्यांच्या कारभाराची महिती बरिकिने वर्णन केले आहे.
मोरोपंत तांबे हे एक गरीब ब्राह्मण होते. साताऱ्यातील वाई या गावचे ते मुळ रहिवासी होते. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या चिमाजीअप्पा या भावाचे ते स्नेही होते. चिमाजी आप्पा चा मृत्यूनंतर श्रीमंतांनी मोरोपंतांना आपल्या वाड्यात रहावयास बोलावले व कारभारी म्हणून नेमले.
मनकर्णीका (मनू) ही त्यांचीच मुलगी. १३ नोव्हेंबर १८३५ मध्ये तिचा जन्म झाला. ती दिसायला आपल्या आईवर म्हणजेच भागीरथीबाई यांच्यावर गेली होती. नानासाहेब व रावसाहेब ही श्रीमंतांची दोन मुले. (दत्तक घेतलेली) ते मनूला लाडाने छबिली म्हणत. तात्या टोपे हे या तिघांचे गुरू होते. लहानपणीच मनुने अश्व रोहन, तलवारबाजी यासारखे गुण आत्मसात केले.
रघुनाथ हरी हे झाशीचे शासक होते. पण त्यांना संतान नसल्याने त्यांनी आपला भाऊ शिवराम भाऊ याला राज्यकारभार दिला. यांना तीन मुले होती. कृष्णराव, रघुनाथराव व गंगाधरराव. शिवराम भाऊ नि 18 वर्षे राज्यकारभार केला. या दरम्यान त्यांचा कृष्णराव हा मुलगा मरण पावला. त्यांचा मुलगा रामचंद्रराव हा अल्पवयीन होता त्याला गादीवर बसून त्यांच्या आईला म्हणजे कृष्णरावांची पत्नी सुखबाई यांना तो वयात येईपर्यंत कारभार करावा लागला. अतिशय धूर्त होत्या. राज्याच्या लोभापायी त्यांनी स्वतःच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात असताना त्यांना देवाज्ञा झाली. रामचंद्र रावांना राज्य सुख जास्त काळ लाभले नाही त्यांच्या निधनानंतर रघुनाथरावांच्या म्हणजेच रामचंद्रराव यांचे काका यांच्या हातात कारभार गेला.त्यांच्या निधनानंतर झाशीच्या गादीवर हक्क सांगणाऱ्या चार व्यक्ती होत्या...
१) रामचंद्र रावांचा दत्तक पुत्र ...कृष्णराव
२) रघुनाथरावांच्या रखेली चा मुलगा ....अली बहादुर
३) रघुनाथ रावांची पत्नी
४) रघुनाथरावांचे लहान भाऊ .....गंगाधरराव
झाशी संस्थानाचा नरेश म्हणून गंगाधर राव यांना नियुक्त करण्यात आले.
गंगाधर राव हे अतिशय सोज्वळ व सालस गृहस्थ होते. त्यांच्याशीच मनूचा विवाह झाला.
१८४२ मध्ये ती झाशी संस्थानाची महाराणी लक्ष्मीबाई झाली. गंगाधरराव हे विदुर होते. केवळ संतानप्राप्तीसाठी त्यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी मनुशी विवाह केला. त्यावेळी मनू ही केवळ नऊ वर्षाची होती. वयाच्या पंधराव्या वर्षी मनूला पुत्ररत्न प्राप्त झाले. पण केवळ तीन महिन्यातच ह्या बालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गंगाधरराव अधिकच खचले. म्हणून त्यांनी त्यांच्याच वंशातील वासुदेव नेवाळकर यांच्या आनंदराव याला दत्तक घेतले व त्याचे नाव "दामोदर" असे ठेवले.२१ नोव्हेंबर १८५३ ला कादर राव यांचे निधन झाले.
दत्तक विधान मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यावेळी गव्हर्नर जनरल डलहौसीने होता त्याने दत्तक विधान नामंजूर केले व मेजर एलिस कडे पाठवले. तो झाशीमध्ये आला व त्याने ही बातमी दिली. महाराणीला हे ऐकून अतिशय राग आला व त्वेषाने उठून त्या म्हणल्या---
झाशी संस्थान इंग्रजांच्या तावडीतून वाचवण्यासाठी महाराणी लक्ष्मीबाई यांनी आटोकाट प्रयत्न केले. पण शेवटी मेजर एलिस याने राज्य आपल्या हाती घेतले. लॉर्ड डलहौसी चे वर्तन दिवसेंदिवस वाढतच होते. त्यामुळे जनता पेटून उठली व बंड करू लागली. नत्येखांशी लढाई झाली व तेव्हा इंग्रजांनी विनाकारण लक्ष्मीबाईंना दोषी ठरवले. त्यांनी लक्ष्मीबाईंच्या बंदोबस्तासाठी इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक केली. महाराणी लक्ष्मीबाईंनी बारा दिवस युद्ध केले व इंग्रजांना अडवून ठेवले. पण त्यांना जास्त काळ हे अडवता आले नाही व तेथून त्यांना पळून जावे लागले. महाराणीनी किल्ला वाचवण्यासाठी खुप प्रयत्न केले. पण ते व्यर्थ गेले.किल्ल्याच्या उत्तरेकडील दरवाजाने राणी लक्ष्मीबाई व त्याचे साथीदार पसार झाले. १२० किलोमीटर अंतर अवघ्या २४ तासात पार करून महाराणी कलापिला आली. ग्वाल्हेर चा किल्ला त्यांनी जिंकून घेतला. आता लक्ष्य होते ते झांसी वर. या युद्धादरम्यान महाराजांचा घोडा जबर जखमी झाला. त्यामुळे त्यांना दुसरा घोडा घ्यावा लागला. आपला निभाव लागणार नाही म्हणून महाराणीने चक्रविव मोडले व तुफान वेगाने त्यांनी आपला घोडा पळविला वाटेत एक नाला आला आणि त्यांचा घोडा अडला आता आपल्याला एकदा शिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले महाराणी अतिशय थकल्या होत्या त्यांच्या पाठीत एक गोळी लागली व पाठीमागे डोक्यावर जबर वार झाला. त्यांचे साथीदार तेथे पोहोचले व त्यांनी इंग्रजांना ठार केले. महाराणी मात्र कोसळल्या त्यांनी दामोदर ला सांभाळा एवढेच म्हटले आणि त्या कायमच्या शांत झाल्या.
महाराणी लक्ष्मीबाई यांच्या चरित्रावर लेखकांची वेगवेगळी मते आहेत. साहित्य लेखनातील अन्वयार्थ असा आहे.. की.. वयाच्या अवघ्या नऊ वर्षापासून झाँसी संस्थानाचा कारभार आपल्या डोळ्याने पाहून, सांभाळून समर्थपणे चालवून
महाराणी लक्ष्मीबाई यांनी एक आदर्श शासनकर्ता म्हणून आपले नाव इतिहासात कोरले. त्यांच्या या महान कार्याला मानाचा मुजरा!!!
©® मैथिली कुलकर्णी
टिप्पण्या