पोस्ट्स

Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

Marathi literature and his writer| मराठी साहित्य आणि साहित्यीक

  प्रस्तावना:-          मराठी संस्कृतीची गणना अति प्राचीन संस्कृतीमध्ये करता येईल. त्याचप्रमाणे मराठी साहित्याचेही आहे. इतिहास आणि संत परंपरेने मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. अभंग, ओवी, गोष्टी, कविता, लघु कथा, कादंबरी, महाकाव्य, खंडकाव्य, नाटक अशा नानाविध साहित्य प्रकारातून मराठी साहित्य लेखन झालेले आहे. साहित्य लेखनाचे हे वर्गीकरण संशोधनाअंती झाले असावे. मग हे संशोधन कधी झाले? तर मराठी वांड्मयाच्या संशोधनाचा खरा आरंभ एकोणिसाव्या शतकात सुरू झाला. मुद्रण कलेच्या शोधामुळे आणि आगमनामुळे हस्तलिखित असलेले साहित्य मुद्रणबद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि त्यातून एक एक टप्पा गाठता गाठता हस्त लिखित स्वरूपात असलेले महान ग्रंथ पुस्तक रुपात वाचकांच्या समोर आले. हस्तलिखितातील ज्ञानामृत चाखत मराठी संस्कृती अधिकाधिक समृद्ध होऊ लागली.        मराठी साहित्य लेखनातील काही नामांकित, प्रसिद्ध साहित्यिक:- अधिक माहिती साठी वाचा.... Wachan katta with Maithili Kulkarni * वी. वा.शिरवाडकर ( wi.wa.shirwadkar) * शिवाजी सावंत (shivaji sawant) * व. पु. काळे (w....

आम्ही नवदुर्गा (Amhi nawdurga)| पुस्तक परिक्षण| 10सख्यांचा एकत्र कथासंग्रह

इमेज
प्रस्तावना:-        आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या लातूर जिल्ह्यातील कार्यकारणीतील दहा पदाधिका-यांनी एकत्र येऊन त्यांच्या लेखणीतून साकारलेला कथासंग्रह म्हणजे आम्ही नवदुर्गा. 2021 मध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला कै. मोहन कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून या संस्थेचे बीज रोवले गेले. कोरोना या महामारी मुळे संपूर्ण जगच त्रस्त असताना, संपूर्ण कुटुंब घरात असताना अशा वेळी घरातील प्रत्येक माणसाच्या तब्येतीची काळजी घेण्यासोबतच स्वतःची तब्येत आणि स्वतःची मानसिकता ढळू न देणे हा मोठा टास्क एक गृहीणी ,एक महिला म्हणून प्रत्येक स्त्री वर होता. अशा अस्वस्थ मानसिकतेतून स्वतःला सावरत, कुटुंबाला फुलाप्रमाणे जपत असतानाच स्त्रियांनी स्वतःमधील साहित्यलेखन डिजिटल माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी पुढाकार घेतला. याचेच एक फलित म्हणून आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेकडे पाहता येईल. दोन वर्षाच्या या काळात संस्थेच्या अध्यक्ष माननीय प्राध्यापिका पद्माताई हुशिंग,उपाध्यक्ष माननीय प्राध्यापिका विजयाताई मारोतकर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे या संस्थेचा व्हाट्सअप वर समूह तयार झाला. प्रत्येक जिल्ह्यात त्याच्या शाखा स्थ...

पुस्तक परीक्षण | गुंजाली (gunjali) | गणगोत प्रकाशन |अश्विनी निवर्गी, रोहिणी पांडे, मैथिली कुलकर्णी, अर्चना संबरकर ,अपर्णा कुलकर्णी 2022

इमेज
प्रस्तावना :-                  95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील बालाघाटाच्या कुशीत वसणाऱ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या उदगीर शहरात नुकताच मोठ्या दिमाखात पार पडले. याच शहरात वास्तव्यास असल्याने हा कार्यक्रम याचि देही याची डोळा पाहण्याचा योग आला. या साहित्य मेळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. अनेक नवोदित हातांना आपल्या लेखनास पुस्तकं रुपात प्रकाशन करण्याची संधी या वेळी मिळाली. दोन पेक्षा अधिक साहित्यीक एकत्र येऊन त्यांच्या लेखनीतून साकारलेल्या कथा आणि कविता यांच्या पुस्तकांचे  होणारे प्रकाशण हे यावेळचे वैशिष्ट्य म्हणता येईल. पुस्तकं:-                   गुंजाली (कथा संग्रह) लेखिका:-              अश्विनी निवर्गी             रोहिणी पांडे            अपर्णा कुलकर्णी            अर्चना संबरकर            मैथि...

भारत सासणे|Bharat sasne|दाट काळा पाऊस|९५ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

इमेज
 प्रस्तावना:-       ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाली. यापूर्वी भारत सासणे यांचे पुस्तक वाचण्याचा कधी योग आला नाही. लेखक म्हणून ते परिचित असले तरीही त्यांचे पुस्तक कधी वाचनात आले नव्हते. उत्सुकतेपोटी त्यांची माहिती सर्च केली आणि त्यांची महती कळत गेली. एवढ्या मोठ्या इसमाचे एखादे पुस्तक तरी आपण वाचलेच पाहिजे असे वाटतं होते. माझे वाचनवेड लक्षात घेता वाढदिवसाचे औचित्य साधून बहिणीने " दाट काळा पाऊस" हे भारत सासणे यांचे पुस्तक मला भेट कारणे हा ही एक योगायोगच... झपाटल्यागत पुस्तक वाचण्यास सुरुवात झाली. भारत सासणे यांच्या लेखणीची प्रगल्भता च एवढी आहे की, प्रामाणिक मत मंडायचे झाल्यास एकदा वाचून हे पुस्तक समजत नाही. वारंवार वाचनातून त्यांचीलेखन शैली उलगडत जाते. त्यासाठी त्यांची पुस्तके वाचावी लागतात. पुस्तकं:-             दाट काळा पाऊस ( दीर्घ कथा संग्रह)  लेखक:-             भारत सासणे प्रकाशन:-              मॅजेस्टिक प...

लता मंगेशकर (lata Mangeshkar)|स्वरयोगिनी| मधुवंती सप्रे

प्रस्तावना-- काही व्यक्ती आपल्या जीवनात इतके उंच शिखर गाठतात की, त्यांच्या आयुष्याकडे पाहताना डोळे दिपून जातात.मन फक्त होतं. त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अनेकांचं प्रेरणास्थान बनतं. स्वर साधनेस आपले उभे आयुष्य देणार्‍या आणि कित्येक दशकं आपल्या स्वर सुरांनी जगाचे लक्ष वेधणाऱ्या अवनी वरील तमाम जीवाच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या अशाच एका  ज्या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलत आहे, ती व्यक्ती म्हणजे साक्षात सरस्वतीच्या गळ्यात वास करत असे अशी सर्वांची लाडकी स्वर्योगिनी "लतादीदी". सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्यांना देवाज्ञा झाली. तन आणि मन दोन्हीही सुन्न झालं. जगच थांबल्या गत वाटू लागलं. मनातून त्यांचा विचार काही केल्या जात नव्हता. वर्तमानात त्या दिसत नसल्या तरीही पुस्तकं, गीत या सर्वांमधून त्या सगळ्यांमध्ये वावरत आहेतच."स्वरयोगिनी" हे मधुवंती सप्रे लिखित व्यक्ती चित्रण वाचून त्यांच्या अथांग कार्याचा आढावा घ्यावा आणि त्यांच्या अधिक समीप जाऊन यावे या हेतूने हे पुस्तक वाचले किती आणि काय लिहावे लतादीदीं बद्दल.... शब्दही अपुरे माझे अशी अवस्था झाली आहे.     स्वर योगिनी च्या ...

माधुरी चौधरी [कवयित्री] | आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या..

इमेज
  प्र स्तावना :--           काही साहित्यिक असे असतात, ज्यांच  साहित्य अंतर्मनाला हेलावून टाकतं.त्यांच्यातील लेखनकौशल्य वाचून मन आतृप्त होतं आणि त्यांनी लिहिलेला शब्द न शब्द मनाला छेदून तर जातोच पण तो वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. हा शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो, प्रश्न विचारत असल्याचा भास होतो आणि त्यामुळेच की काय वाचक प्रचंड अस्वस्थ होतो. त्या शब्दांची संवेदनशीलता, प्रखरता, स्पष्टताच एवढी असते की वाचक आतून-बाहेरून हेलावून जातो. असेच काहीसे "आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या " हा काव्यसंग्रह वाचताना झाले.           आपल्या लेखन प्रतिभेने सर्वसामान्य वाचकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी कवयित्री,लेखिका सौ. माधुरी चौधरी यांचा काव्यसंग्रह वाचताना डोळ्यात पाणी तरळले नाही तरच नवल.. भयान वास्तव दर्शन काव्यातून झालेले आहे आणि येथेच कवयित्रींनी वाचकास जिंकून घेतले आहे.            आज आपला भारत देश अमृतमहोत्सव साजरा करतो आहे.आजची नारी ही निश्चितच खूप बदललेली आहे. ती स्वावलंबी झालेली आहे. पण ज्...

एक होता कार्व्हर (Ek hota carver)मराठी पुस्तक|वीणा गवाणकर

इमेज
एक होता कार्व्हर-Ek Hota Carver Book review प्रस्तावना:-         वाचनाची आवड असणाऱ्या माझ्यासारख्या अनेक साहित्य वेड्या वाचकांना पुस्तक म्हणजे, जीव की प्राणच जणू!!! मराठी पुस्तक वाचनं तसं सोयीचं....कारण मातृभाषा मराठी. असेच एक पुस्तक हाती लागले.... ते म्हणजे " एक होता कार्व्हर!" वास्तविक पाहता या पुस्तकातील पात्र म्हणजे एका नीग्रो शास्त्रज्ञाचे चरित्र. कुतूहल वाटले म्हणून वाचण्यास घेतले. एकदा दोनदा वाचून झालं. मन काही शांत होत नव्हतं. प्रत्येक क्षणाला हा माणूस आपल्या समोर उभा आहे असा भास होत होता. आणि त्याच्या त्या आभासी आदरयुक्त धाकाने शेंगाची टरफल सुद्धा  डस्टबिन ऐवजी झाडाच्या बुंध्याशी कधी जाऊ लागली हे कळलेच नाही. प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्या अप्रतिम,अद्वितीय, लेखनातून साकारलेलं हे पुस्तक म्हणजे आपल्याला मिळालेली अनमोल देण आहे. कार्व्हर जरी भारतात जन्माला आला नसला तरीही त्याची आयुष्य गाथा ही सामान्य माणसाची कथा आहे. कार्व्हर म्हणजे आपल्या जवळ असणाराच एखादा आपल्यातील माणूस आहे असाच भास वाचताना होतो. अशी महान असामान्य माणसे भारतात जन्माला यायला हवी.. शेत...