Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

लता मंगेशकर (lata Mangeshkar)|स्वरयोगिनी| मधुवंती सप्रे


प्रस्तावना--

काही व्यक्ती आपल्या जीवनात इतके उंच शिखर गाठतात की, त्यांच्या आयुष्याकडे पाहताना डोळे दिपून जातात.मन फक्त होतं. त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अनेकांचं प्रेरणास्थान बनतं. स्वर साधनेस आपले उभे आयुष्य देणार्‍या आणि कित्येक दशकं आपल्या स्वर सुरांनी जगाचे लक्ष वेधणाऱ्या अवनी वरील तमाम जीवाच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या अशाच एका  ज्या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलत आहे, ती व्यक्ती म्हणजे साक्षात सरस्वतीच्या गळ्यात वास करत असे अशी सर्वांची लाडकी स्वर्योगिनी "लतादीदी". सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्यांना देवाज्ञा झाली. तन आणि मन दोन्हीही सुन्न झालं. जगच थांबल्या गत वाटू लागलं. मनातून त्यांचा विचार काही केल्या जात नव्हता. वर्तमानात त्या दिसत नसल्या तरीही पुस्तकं, गीत या सर्वांमधून त्या सगळ्यांमध्ये वावरत आहेतच."स्वरयोगिनी" हे मधुवंती सप्रे लिखित व्यक्ती चित्रण वाचून त्यांच्या अथांग कार्याचा आढावा घ्यावा आणि त्यांच्या अधिक समीप जाऊन यावे या हेतूने हे पुस्तक वाचले किती आणि काय लिहावे लतादीदीं बद्दल.... शब्दही अपुरे माझे अशी अवस्था झाली आहे.

    स्वर योगिनी च्या निमित्ताने माझ्या लेखणीतून लता मंगेशकर या स्वरसम्राज्ञी ला एक छोटीशी मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात यासाठी मी खूप थेटकी आहे. लतादीदींचे विचार मनातून जावे हे या जन्मात तरी शक्य नाही. मनाला शांती मिळावी यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. जिच्या अंगाई गीताने बाळ झोपते, प्रेम गीताने प्रेमाचा खरा अर्थ कळतो, विरह गीताने विरहाच्या अनंत यातनांची जाणीव होते, देशभक्ती गीते ऐकून माणसांच्या मनामनात रोमारोमात देशप्रेम जागृत होते अशा स्वरसम्राज्ञी ला तमाम रसिक प्रेमींच्या वतीने मी मानवंदना देत आहे.

पुस्तकं:- स्वर योगिनी (व्यक्ती चित्रन)

लेखिका:- मधुवंती सप्रे

प्रकाशन:- परम मित्र पब्लिकेशन

लेखिका परिचय:-.

मधुवंती सप्रे या एक मराठी लेखिका कवयित्री आहेत.

त्यांनी संपादित केलेले अक्षरगंध हे दिवाळी अंक प्रसिद्ध आहे.

त्यांचे साहित्य विश्व मोठे आहे त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. 

मधुवंती सप्रे लिखित प्रकाशित पुस्तके:-

आत्मजा

अन्वर्थ (कथासंग्रह)

अंतस्थ ( कथासंग्रह )

द्रोपदी

पाच तेजस्विनी

फुले वेचिता

रानात चालताना (कवितासंग्रह)

व्यासांच्या लेकी

सुवर्ण पिंपळ (कादंबरी)

स्वर योगिनी (लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण)

हसरी कविता

प्रिय मुंबई


स्वर योगिनी:-

             

प्रसिद्ध लेखिका कवयित्री मधुवंती सप्रे लिखित स्वर योगिनी हे पुस्तक स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे व्यक्ती चित्रण आहे. परम मित्र पब्लिकेशन प्रकाशित या व्यक्तिचित्रणात लतादीदींच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ते त्यांना मिळालेल्या मानसन्मान पर्यंतच्या प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण आणि अर्थपूर्ण अशा शीर्षक कांबळे वाचकाची उत्कंठा शिगेस पोहोचते. आळंदी येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण लतादीदींनी गायलेली मराठी गाणी अभंग भावगीत चित्रपटगीत यांचाही उल्लेख यात करण्यात आला आहे.


  स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म व 28 सप्टेंबर 1929 साली मध्यप्रदेश येथील इंदोर शहरात झाला. महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात जन्मलेल्या लतादीदींचे पाळण्यातील नाव हृदया असे होते. पंडित दीनानाथ मंगेशकर हे नाट्य कलावंत गायक होते. मंगेशकर कुटुंबीयांचे मूळ आडनाव हर्डीकर होते.मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मूळचे गोव्याचे. ते मंगेशी चे भक्त असल्याने पुढे त्यांनी मंगेशकर हे आडनाव लावण्यास सुरूवात केली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना केलेली मदत नाट्यक्षेत्रातील दिनानाथ यांचे कार्य आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांना राजघराण्यातून होणाऱ्या मदतीचा विसर दीनानाथांचे आपत्य ही कधीही विसरले नाहीत. लता, आशा ,उषा ,मीना आणि या चार बहिणींचा एकुलता एक भाऊ हृदयनाथ अशी पाच भावंडे संगीतक्षेत्रात चमकत गेली. त्यांनी आपलं मराठीपण मात्र कधीही सोडलं नाही. या पंच रत्नांवर सरस्वती आणि लक्ष्मी चा वरदहस्त असताना देखील त्यांनी कधीच आपला साधेपणा सोडला नाही. माणुसकी जपत त्यांनी आपल्या अर्थार्जनाचा यथायोग्य वापर समाजसेवेसाठी ही केला. यातूनच त्यांच्या मनाची थोरवी स्पष्टपणे दिसून येते.

  लतादीदींचा धर्म कोणता? त्या हिंदू होत्या का? कशी निरर्थक चर्चा करणारा न्याय एवढेच सांगावेसे वाटते की त्या भारतीय होत्या. भारतीयत्व हाच त्यांचा धर्म. लतादीदींनी बद्दल प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेला मजकूर लतादीदींचा अथांगतेचा अनुभव देतो... स्वर योगिनी या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेला हा मजकूर....

"आजच्या जगातील एक गायिका

जेव्हा भगवंताच्या हातातील बासरी होते,

तेव्हा तिचं नातं,

विश्वातील जे जे मंगल, उदात्त ,उत्तम

याच्याशी जोडलं जातं 

ती काळाच्या पलीकडे पोचते

देशाच्या सीमा ओलांडते

अखिल मानववंशाशी संवाद सांधते

लता मंगेशकर हा या शतकातील

लोकोत्तर दिव्य अविष्कार आहे.

त्यांचं संगीत त्याची साधना त्याचे संस्कार

त्यांच्या निष्ठा यांचा परिचय आपले जीवन

समृद्ध आणि संपन्न होण्यासाठी करून

घेतला पाहिजे.

या करिता ललित शैलीत लिहिलेले हे सांगीतिक चरित्र

"स्वरयोगिनी" लता.


          स्वर योगिनी च्या दुसऱ्या आवृत्तीसाठी लेखिका कवयित्री मधुवंती सप्रे यांनी आणखी लेखनाची त्यात भर घातली आहे परंतु त्यांनी दिलेली लतादीदींची समग्र मराठी गाण्याची सूची हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे लतादीदींनी बद्दल संपूर्ण माहिती या व्यक्तिचित्रणात लिहिण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.


*लता मंगेशकर यांची काही प्रसिद्ध अजरामर मराठी गीते*

* सुंदर ते ध्यान

*ने मजसी ने परत मातृभूमीला

*पसायदान

*शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

*रेशमाच्या रेघांनी लाल काळया धाग्यांनी

*लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं

*वेडात मराठी वीर दौडले सात

*जयोस्तुते

*गंगा यमुना डोळ्यात उभ्या का? जा मुली तू...


*गणराज रंगी नाचतो

*वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

*मोगरा फुलला

*जीवनात ही घडी अशीच राहू दे

*आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे

*लाजली सीता स्वयंवराला


*लतादीदींची काही प्रसिद्ध अजरामर अशी हिंदी गाणी*


*सत्यम शिवम सुंदरम

*मै तुलसी तेरे आंगन की

*तेरे बिना जिंदगी से कोई

*जीत जायेंगे हम

*तेरे मेरे बीच मे

*मेहंदी लगाके रखना

*डफलीवाले डफली बजा

*हम थे जिनके सहारे

*ये जिंदगी उसी की है

*रेना बीती जाये

*बिंदिया चमकेगी

*जिंदगी कि ना तुटे लडी

*दो घुंट मुझे भी पिला दे शराबी

*क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया...

*आजा सनम मधुर चांदनी में हम...


*लतादीदी यांना मिळालेला मानसन्मान:-

*संपूर्ण विश्वात सर्वात जास्त गीत गायनाचा गिनिज बुक रेकॉर्ड ( 1974)

*महाराष्ट्र सरकार पुरस्कार (१९६६-६७ )

*पद्मभूषण ( १९६९ )

*दादासाहेब फाळके पुरस्कार ( १९८९ )

*राजीव गांधी पुरस्कार

*एन टी आर पुरस्कार

*पद्मविभूषण (१९९९)

*फिल्म फेयर अवॉर्ड

*नॅशनल फिल्म अवार्ड

*सेक्सी फिल्म फेयर लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड

*झी सिने लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड

*आय आय ए एफ लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड

*भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न 2013 स*** त्यांना मिळाला.

*महाराष्ट्र भूषण

*नूरजहा पुरस्कार


*लतादीदीं वर लिहीण्यात आलेली इतर पुस्तके---*


*लता (इसाक मुजावर)

*स्वर योगिनी (मधुवंती सप्रे)

*लता संगीत क्षेत्रातील चंद्रमा

*द सर्च ऑफ लता मंगेशकर (इंग्रजी- हरीश भिबाणी)

*मोगरा फुलला (संपादक- रेखा चवरे)


*हे रत्न भारताचे लतामंगेशकर( लेखक- रेखा चवरे)

*सप्तसुरांच्या पलिकडे :लता मंगेशकर( हरीश भिबाणी)

*लता इन हर कोण व्हॉइस (नसरीन मुन्नी कबीर)








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges