पोस्ट्स

Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

Rocky Aur Rani K Prem Kahani Review in Marathi| आलीया, रणवीर,कारण जोहर चित्रपट

इमेज
Rocky Aur Rani ki Prem Kahani Review in Marathi करण जोहरने कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या आपल्या समाजातील  संस्कृतीच्या विरोधात विचार मांडला आहे. जो विवाहाच्या बाबतीत विविधतेत एकतेवर विश्वास ठेवत नाही.  चित्रपट  सांगतो की आपण एकमेकांच्या अपूर्णतेसह जगणे शिकू शकतो.                          (सौजन्य: गुगल इमेज) फिल्म.....रॉकी और रानी की प्रेम कहानी (हिंदी) दिग्दर्शक: करण जोहर कलाकार:  रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, आमिर बशीर, तोता रॉय चौधरी     फिल्म चा हिरो  रॉकी  (Rocky)आणि हिरोईन राणी (Rani) एकमेकाच्या प्रेमात पडतात. पण दोघांचे कुटुंब खुप वेगळे असते. त्यांच्या चालीरिती भिन्न असतात.दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्या सांस्कृतिक फरकांवर मात करण्याचा प्रयत्न  हे प्रेमी युगुल करताना त्यांची होणारी कसरत यात दाखवण्यात आली आहे. जाँटी रॉकी (रणवीर सिंग) हा एक समृद्ध शहरी पंजाबी तरुण आहे जो राणी चॅटर्जीच्या (आलिया भट्ट) जीवनात दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या...

Ved Film Review| ved Film Review in Marathi| वेड मराठी movie

इमेज
 VED  film review in Marathi....                       मराठी चित्रपसृष्टीतील वेड हा २०२२ चा ब्लॉक ब्लास्टर सिनेमा ठरला असून त्याने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. रितेश देशमुखने "लय भारी" आणि "माऊलीसह" बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट दीली. आता या वेड्या प्रेमकथेचा स्टार आणि दिग्दर्शक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर आणि तमाम रसिकांवर राज्य करण्यासाठी तो ‘वेड’ घेऊन आला.                                ( सौजन्य: गूगल इमेजेस) चित्रपटाची सुरुवात एका क्रिकेटच्या मैदानावर होते जिथे भास्कर अण्णांच्या (रविराज कवडे) माणसांनी पंचांना लाच देऊन त्यांना जिंकू दिलेले असते. मग तिथे टीमच्या बचावासाठी एक  मद्यपी म्हणजेच कथानकाचा हिरो सत्या (रितेश देशमुख) येतो, जो त्याच्या अनुभातून अण्णांच्या पराक्रमावर विजय मिळवण्यास मदत करतो. जसजसे आपण पुढे जातो तसतसे त्याची हरवलेली प्रेमिका निशा (जिया शंकर) आणि ती परत येण्याची तो 12 वर्षांपासून वाट पाहत असतो . ती कधी परत येईल की ...

बाईपण भारी देवा चित्रपट परिक्षण|Baipan Bhari Dewa Film review| कलाकाराची माहिती

इमेज
" बाईपण भारी देवा" चित्रपट परिक्षण (Baipan Bhari Dewa Film review)                            बऱ्याच दिवसानंतर महिला प्रधान मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला." बाई पण भारी देवा" या चित्रपटाबद्दल केवळ एका शब्दात बोलायचं असेल तर "अप्रतिम" असंच म्हणता येईल. सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या मनातील घालमेल अतिशय उत्कटतेने प्रसंगावधान साधून टिपण्याचा प्रयत्न चित्रपटात झालेला आहे. अनेकदा नकळत घडलेल्या एखाद्या गोष्टीमुळे घट्ट नात्यात दुरावा येतो. जिथं एकदुसऱ्याला समजून घेण अपेक्षित असत , दुर्दैवाने तिथं इगो आडवा येतो आणि मग दुरावा वाढतच जातो. मग भविष्यात कुठेतरी झालेल्या चुकीची जाणीव होते आणि मग पश्चाताप होतो आणि वाटत राहातं की अरे आपण त्याचवेळी का नाही बोललो? आपण बोलायला हवं होतं. पण ती वेळ निघून गेलेली असते.हा चित्रपट पहाताना याची प्रकर्षाने जाणीव होते.       सिनेमाच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर अगदी साधी आणि सरळ कथा आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन दुखावल्या गेलेल्या , एकमेकांपासून दुरावल्या गेलेल्...

रवींद्र शोभणे|डॉ. रवींद्र शोभणे परिचय, पुरस्कार, प्रकाशित साहित्य|97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

इमेज
      97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  डॉ.रवींद्र शोभणे यांचा.......         परिचय, पुरस्कार आणि साहित्य परिचय .....        साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत म्हणजेच अमळनेर येथे भरणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षपदी डॉ.रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे.                 कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म 15 मे 1959 रोजी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नरखेड येथे, तर पदव्युत्तर शिक्षण नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून झाले. नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून त्यांनी ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे’ या विषयावर प्रबंध सादर करून १९८९ साली पीएच.डी. ची पदवी प्राप्त केली.          कथा, कादंबरी, नाट्य, कविता, समीक्षा, ललित, अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन करणार्‍या डॉ. रवींद्र शोभणे यांची वयाच्या विसाव्या वर्षी पह...

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges

               आषाढ महिना आला की वेध लागतात... ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या विठू माउली च्या दर्शनाचे... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पा...

Historical Books in Marathi|मराठी ऐतिहासिक कादंबरी, त्यांचे लेखक|List of Marathi Historical Books

 Marathi Historical Books|मराठी ऐतिहासिक कादंबरी, त्यांचे लेखक|List of  Historical Books in Marathi         माणसाच्या जडणघडणीमध्ये तेथील संस्कृतीचा मोठा वाटा असतो. या संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास. स्थळ, काळ, व्यक्ती, समाज हे या इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ म्हणता येतील. सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा देखील इतिहासावर बऱ्याच प्रमाणात परिणाम होतो. भूतकाळातील लोकांचे जीवन कसे असेल? ते कोणते कपडे वापरत असतील? त्यांची भाषा कोणती असेल? अशी एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात आणि ते जाणून घेण्याचे उत्सुक्य ही वाटत असते. आपली ही कुतूहलता, आपल्या मनातील प्रश्नांची भूक भागवतात ती ऐतिहासिक पुस्तके. ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला त्या काळाच्या परिस्थितीचा मागोवा घेता येतो. प्रत्यक्ष नसलो तरीही पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना जवळून अनुभवता येतं. उदाहरणच म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणा, महाराणी येसूबाई म्हणा, बहिर्जी नाईक म्हणा, महाराणा प्रताप अशी असंख्य उदाहरणे देता येतील. इति...