Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges

               आषाढ महिना आला की वेध लागतात... ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या विठू माउली च्या दर्शनाचे...आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.

पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची पंरपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. चारोळी च्या रुपात मी मनातला विठु राया शब्दबद्ध केला आहे...  शब्दसुमनांची साहित्य वारी त्यांच्या चरणी अर्पण करते आहे....माझी ही लेखणीतून साकारलेली माऊली माझ्या मनातील भाव आहेत.वीठूराया चरणी हा भाव अर्पण करून समाधान शोधण्याचा केलेला छोटासा प्रयत्न तुम्हालाही भावेल अशी अपेक्षा करते... 


1)

येता आषाढ महिना 

आठवण माऊलीची......

 पाय आपसूकच चाले

 ही वाट पंढरीची !!


२)

माऊली माऊली

 गजर विठ्ठलाचा .....

ध्यास मजला लागे

 विठू माऊलीचा!!



३)

कटी कर ठेवूनीया

 उभा राही विठुराया...

 साऱ्या वारकऱ्यांवर

 तुझी अपार रे माया!!



४)

विठ्ठल नाम घेता मुखी

 प्रसन्न होते मन.....

 हरिनामाच्या जपाने

 सुखावते तन !!



५)

युगे झाली अठ्ठावीस

विठू माझा विटेवरी.....

माऊलींच्या भेटीसाठी

अतुरले वारकरी !!



६)

पुंडलिका भेटी साठी

 परब्रम्ह अवतरले.....

 दृष्टांत होता माऊलीचा

सारे विघ्न दूर सरले !!



७)

दिंड्या पताका ने सारी

 दिसे शोभूनन ही वारी....

 नाद मृदंगाने मग 

  दुमदुमते पंढरी !!



८)

भक्तजनाचा हा मेळा

 चंद्रभागेतीरी येतो....

 आषाढीचा हा सोहळा

 मग अलौकिक होतो !!



९)

पंढरीचा हा महिमा

 वर्णावा तो किती??

 दर्शन घेता विठोबाचे

 होते जीवनाची मुक्ती !!



१०)

सावळीशी विठू मूर्ती 

तुळशीमाळ गळा .....

देवाधिदेव पांडुरंग 

तुझा आगळा !!



११)

पंढरीस वसे तो 

माझा मायबाप .....

वारी चुकली हो माझी

याचा झाला पश्चाताप !!



१२)

प्रेमभरे ओवाळते 

माझ्या विठुरायास मी ....

साऱ्या विश्वाचा या 

तुच आहेस रे स्वामी !!



१३)

विठूराया तुझ्या चरणी

 तन मन हरपले ....

नामस्मरनात आता 

स्वतःस समर्पले !!



१४)

ध्यानी मनी चित्ती ही 

तूच विठुराया ....

स्वप्नात तुझं पाहुनी 

हरवते माझी काया !!



१५)

वारकरी संप्रदाय ...

आम्हा ध्यास विठ्ठलाचा ...

रात्रंदिन करी जप

 पंढरीच्या माऊलीचा !!



१६)

एकादशीचा सोहळा 

तृप्त नयनी पाहिला...

 दर्शन होता माऊलीचे

 चरणी जीव मी वाहिला !!



१७)

माऊलीच्या नामाचा 

महिमा च अगाध ....

गोडवा हा त्याचा 

जणू पुष्पतील मध !!



१८)

पंढरीचा पांडुरंग

 दैवत प्रसन्न.....

 भेटी विना विठुच्या

 होते मन सुन्न !!



१९)

विठुरायाची ही गोडी

 वैष्णवांना लागली....

 नामांमृत चाखूनी

  जीवनकळा साधली !!



२०)

आषाढी कार्तिकी 

भक्तजनांचा हा मेळा ....

नेत्रदीपऊन टाके 

पंढरीचा हा सोहळा !!



२१)

पांडुरंगा विठूराया 

तुझी एकादशीची वारी ....

अवघा रंग एक झाला

 माऊलीच्या नादलहरी !!



२२)

एकनाथा भक्ती पायी

 खांदी कावड घेतली .....

चोख्या संगे माऊलीने 

राणी ढोरही ओढली !!



२३)

सावता माळ्याची पाखरे

 विठुराया नी राखली .....

कांदा मुळा भाकर

 भक्तासवे चाखली !!



२४)

जना म्हणे विठ्ठलाला 

जीवे न सोडी मी रे तुला....

 तुझ्या नामस्मरणाची तु

बेडी घातलीस मला !!



२५)

हृदयाच्या पिंजऱ्यात 

विठ्ठल कैद झाला..... 

मनातील भाव सारे

कळते हो त्याला !!


२६)

चंद्रभागी पंढरीच्या

 साधुसंतांची हो दाटी.....

 मेळ साधून हा येता 

विठू महती हे गाती !!



२७)

विनवते दास तुझी

 येऊ दे रे भेटी मज....

 रुप पाहू दे एकदा

 अर्जवते तुला आज !!



२८)

दिन आज आनंदाचा 

आहे माझ्या विठ्ठलाचा.....

चरणी त्याच्या मी वाहते

हार तुळशी- फुलाचा !!



२९)

विठू  उभा विटेवरी

 रखुमाई थोडी दूर.....

 दर्शनास दोघांच्याही

 मन झाले हे अतुर !!



३०)

रात्रंदिन विठुराया

 तळमळ अंतरीची ....

भगवंता तूझ्याच रे 

फक्त एका भेटीची !!



३१)

विठ्ठलाची ओढ 

लागली मनास.....

 तूच माता पिता 

तुला भेटण्याची आस !!



३२)

माथी वारकरी टिळा 

त्यास चंदनाचा गंध.....

तुळशीच्या पानांनाही

 विठूनामाचा सुगंध !!



३३)

अवघे रंग एक होती 

सावळ्याच्या भेटीसाठी ....

भक्तांचा मेळा जमे 

चंद्रभागेच्या  या काठी !!



३४)

विठुराया ...देवा तुरे ....

भक्तांचा कैवारी....

 रमतोस तुही सदा

 देवा त्यांच्याच अंतरी !!



३५)

रूप पाहता विठूचे 

होऊन जावे त्यात दंग ....

मुखी नाम माऊलीचे

 सदा पांडुरंग !!



३६)

विठ्ठल नामात या

 होऊन जावे दंग ....

महती थोर तुझी 

गावे रे अभंग !!



३७)

 भेट घेता पंढरपुरा

 भक्त लोटांगण घाली.....

 चरण स्पर्श माऊलीचे

 वारी सार्थची झाली !!


३८)

मुखी तुझे नाम 

चित्ती तुझे ध्यान....

 भक्तांच्या हृदयात 

विठुरायास हो मान !!


३९)

आली आली एकादशी

 लागे भजनाचा छंद ....

विठुरायाच्या नामाने 

होई मनास आनंद !!



४०)

भक्तगण होती गोळा 

आषाढी-कार्तिकीला ....

शुभ दिनी विठूस मी 

बुक्का हा वाहिला !!



४१)

विठुरायाच्या चरणी 

शब्द पुष्प मी वाहते....

 कृपादृष्टी तुझी राहो 

हेच आशिष मागते !!





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?