Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

Historical Books in Marathi|मराठी ऐतिहासिक कादंबरी, त्यांचे लेखक|List of Marathi Historical Books

 Marathi Historical Books|मराठी ऐतिहासिक कादंबरी, त्यांचे लेखक|List of  Historical Books in Marathi

        माणसाच्या जडणघडणीमध्ये तेथील संस्कृतीचा मोठा वाटा असतो. या संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास. स्थळ, काळ, व्यक्ती, समाज हे या इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ म्हणता येतील. सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा देखील इतिहासावर बऱ्याच प्रमाणात परिणाम होतो. भूतकाळातील लोकांचे जीवन कसे असेल? ते कोणते कपडे वापरत असतील? त्यांची भाषा कोणती असेल? अशी एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात आणि ते जाणून घेण्याचे उत्सुक्य ही वाटत असते. आपली ही कुतूहलता, आपल्या मनातील प्रश्नांची भूक भागवतात ती ऐतिहासिक पुस्तके. ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला त्या काळाच्या परिस्थितीचा मागोवा घेता येतो. प्रत्यक्ष नसलो तरीही पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना जवळून अनुभवता येतं. उदाहरणच म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणा, महाराणी येसूबाई म्हणा, बहिर्जी नाईक म्हणा, महाराणा प्रताप अशी असंख्य उदाहरणे देता येतील. इतिहास हा पाठांतराचा विषय नसून तो अनुभवण्याचा विषय आहे. त्या काळात या महान लोकांनी केलेल्या महान कृत्यांचा जयघोष करण्याचा विषय आहे. या महान थोर लोकांनी हिंदवी स्वराज्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपली अख्खी हयात घालवली आणि आपल्या पिढ्या झीजवल्या. त्यांना झालेल्या यातना, कष्ट आपण या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून अनुभव होऊ शकतो. आणि इतिहासातील घटनांतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो.

                 बाबासाहेब पुरंदरे, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, ना. स. इनामदार यांसारख्या दिग्गज मंडळींच्या  मराठी कादंबऱ्यांनी तर इतिहास रचला. त्यांच्या उत्कृष्ट लेखनशैलीमुळेच त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आणि इतिहास जगाच्या समोर आला असे म्हणल्यास वावगे ठरू नये. 

 List of  Historical Books in Marathi

 *वाचनीय अशी काही ऐतिहासिक पुस्तके*

1) मृत्युंजय .....  शिवाजी सावंत

      Mrutyunjay.... Shivaji Sawant

2) छावा......शिवाजी सावंत

Chhawa...... Shivaji Sawant

3) संभाजी ......विश्वास पाटील

Sambhaji..... Vishwas Patil

4) श्रीमानयोगी .......रणजीत देसाई

ShrimanYogi...... Ranjeet Desai

5) पानिपत ........विश्वास पाटील

      Panipat ...... Vishwas Patil

6) ययाती ....... वि स खांडेकर

     Yayati.......  vi s khandekar

7) राजा शिवछत्रपती ......बाबासाहेब पुरंदरे

     Raja ShivChhatrapati..... Babasaheb purandare

8) युगांत.......  इरावती कर्वे

Yugant...... Iravati Karve

9) राधेय....... रणजीत देसाई

     Radhe.... Ranjeet Desai

10) १८५७ चे स्वातंत्र्यसमर .....वि दा सावरकर

      1857 che SwatantraSamar.... Vi.da. Savarkar

11) सेनापती हंबीरराव मोहिते ....... डॉ.सदाशिव शिवदे

       Senapati hambirrao Mohite.... Dr. Sadashiv shivde

12) महाराष्ट्रातील लेणी ...... प्रा.सु. ह.जोशी

      Maharashtatil Leni.... Pra. Su.H. Joshi

13) महाराष्ट्रातील किल्ले...... डॉ.द.ग. देशपांडे

     Maharashtatil kille..... Dr.D.G.Deshpande

14) पेशवाई महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान ......

   कौस्तुभ कस्तुरे

Peshwai (maharashtacha itihaasaatil ek suvarnpan)....

         Kaustubh Kasture

15) राऊ (ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

         Rau ..... Na.S.Inamdar

16) कृष्णनीती..... डॉ. गिरीश प. जाखोटिया

      Krishnaniti..... Dr. Girish p. Jakhotiya

17) माझी आत्मकथा.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Mazi aatmkatha.... Dr. Babasaheb Ambedkar

18) युगंधर.....  शिवाजी सावंत

     Yugandhar...... Shivaji Sawant

19) बाजिंद.... पै. गणेश मानुगडे

      Bajind....... Pai. Ganesh Manugade

20) अजिंक्य तारा....... प्रभाकर बागुल

     Ajinkya Tara.... Prabhakar Babul

21)  थोरला बाजीराव पेशवा.... मदन पाटील

       Thorala Bajirao Peshwa ..... Madan Patil

22) पावनखिंड..... रणजित देसाई

      Pavankhind......  Ranjeet Desai

23) गुप्तहेर बहिर्जी नाईक...... मीनाक्षी वैद्य

     Gupther Bahirji Nike.... Meenakshi Vaidya

24) खर्ड्याच्या स्वारीची आणि सवाई माधवराव नारायणराव पेशवे यांची बखर... 

             संपादक :-- काशिनाथ नारायण साने

      Khardiya cha swarichi aani Sawai Madhavrao NarayanRao peshway yanchi Bakhar...

             Sampadak..... Kashinath Narayan sane

25) शिवपुत्र राजाराम...... डॉक्टर प्रमिला जरग

       Sivaputra Rajaram..... Dr. Pramila Garg

26) क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता..... मृणालिनी गडकरी

      Krantiyogini bhagini Nivedita...... Mrunalini Gadkari

27) शेतकऱ्यांचा असूड..... महात्मा फुले

     Shetkaryancha asud..... Mahatma Fule

28) जिजाऊसाहेब ....... मदन पाटील

     JijauSaheb...... Madan Patil

29) महाराणी येसूबाई...... डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर

     Maharani yesubai..... Dr. Suvarna Naik Nimbalkar

30) महाराणी ताराबाई...... नयनतारा देसाई

      Maharani Tarabai..... Nayanthara Desai

31) लोकसखा ज्ञानेश्वर ...... आनंद यादव

     Loksakha Dyaneshwar..... Anand Yadav

     32) झाशीची वाघीण......  भास्कर महाजन

      Jhansi chii waghin..... Bhaskar Mahajan


नक्की वाचा......

Wachan katta with Maithili Kulkarni

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges