Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

बाईपण भारी देवा चित्रपट परिक्षण|Baipan Bhari Dewa Film review| कलाकाराची माहिती

" बाईपण भारी देवा" चित्रपट परिक्षण

(Baipan Bhari Dewa Film review)


              
   

        बऱ्याच दिवसानंतर महिला प्रधान मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला." बाई पण भारी देवा" या चित्रपटाबद्दल केवळ एका शब्दात बोलायचं असेल तर "अप्रतिम" असंच म्हणता येईल. सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या मनातील घालमेल अतिशय उत्कटतेने प्रसंगावधान साधून टिपण्याचा प्रयत्न चित्रपटात झालेला आहे. अनेकदा नकळत घडलेल्या एखाद्या गोष्टीमुळे घट्ट नात्यात दुरावा येतो. जिथं एकदुसऱ्याला समजून घेण अपेक्षित असत , दुर्दैवाने तिथं इगो आडवा येतो आणि मग दुरावा वाढतच जातो. मग भविष्यात कुठेतरी झालेल्या चुकीची जाणीव होते आणि मग पश्चाताप होतो आणि वाटत राहातं की अरे आपण त्याचवेळी का नाही बोललो? आपण बोलायला हवं होतं. पण ती वेळ निघून गेलेली असते.हा चित्रपट पहाताना याची प्रकर्षाने जाणीव होते.

      सिनेमाच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर अगदी साधी आणि सरळ कथा आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन दुखावल्या गेलेल्या , एकमेकांपासून दुरावल्या गेलेल्या बहिणींची ही कथा आहे . या नात्यांची पुनर्भेट होण्यासाठी मंगळागौर हा सण निमित्त मात्र ठरतो. आता ही भेट कशी होते, त्यांच्यातील दुरावा कसा कमी होतो आणि हे नातं अधिक घट्ट कस होतं हे सारं चित्रपटात मांडलं आहे ते उत्कृष्ट संवादाने. या संवादाला खरा न्याय दिला तो चित्रपटातील अभिनय संपन्न कलाकारांनी. त्याशिवाय हा चित्रपट एवढा यशस्वी झाला नसता. रोहिणी हट्टंगडी यांना हॅट्स ऑफ. वयाचा आकडा मॅटर करत नाही हे  त्यांनी प्रूफ करून दाखवलं.


 "बाईपण भारी देवा" या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे यातली पात्रं आणि ती साकारणारी तेवढीच दमदार कलाकार मंडळी. यातलं प्रत्येक पात्र तुमच्या-आमच्या घरातलं वाटतं त्यामुळं ते प्रेक्षकांशी थेट कनेक्ट होतं आणि ते कनेक्ट होणं हेच या सिनेमाचं यश आहे. मेलोड्रामा पाहिजे म्हणून कुठेही लॉजिकचा बळी दिलेला नाही. त्यामुळेच त्याचा परिणाम जाणवतो. याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आणि लेखिका वैशाली नाईक (Vaishali Naik) यांचं आहे. एक साधा सरळ फॅमिली ड्रामा प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो .खूपच उत्तम रितीनं चित्रपट साकारला आहे. 

रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या  कुलकर्णी मोने (Sukunya Kulkarni Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब चौधरी (Deepa Parab Chaudhari) या साऱ्यांनीच कमाल कामं केली आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील पात्र त्या साकारात असल्या तरीही सुदैवाने दैनंदिन जीवनात त्या तशा नाहीत. आणि तरीही सामान्य वर्गातील स्त्रिया आणि त्यांच्या मनातील घालमेल त्यांनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने अभिनयातून साकारली आहे की त्याला तोड नाही. मुळात लिखाणाच्या पातळीवर प्रत्येकीचं पात्र आणि संवाद च उत्तम पद्धतीनं लिहिली गेली आहेत.  


सिनेमाची तांत्रिक बाजूही तितकीच महत्त्वाची असते. ती भक्कम आहे. वासुदेव राणे यांचा कॅमेरा, साई पियुष जोडीचं संगीत आणि मयुर हरदास यांनी केलेलं संकलन. या साऱ्या जमेच्या बाजू म्हणता येतील.  

     मध्यंतरानंतर चित्रपटाची स्पीड थोडी मंदावते. त्यामुळे चित्रपट रेंगाळल्यासारखा वाटतो. एवढी च गोष्ट सोडली तर ‘बाईपण भारी देवा’ हा संपूर्ण कुटुंबासोबत आवर्जून पहावा आणि बाईपणाच्या भावनांचा अनुभव घ्यावा असा आहे. पुरुषांनी ही हा चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges