Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

Rocky Aur Rani K Prem Kahani Review in Marathi| आलीया, रणवीर,कारण जोहर चित्रपट


Rocky Aur Rani ki Prem Kahani Review in Marathi

करण जोहरने कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या आपल्या समाजातील  संस्कृतीच्या विरोधात विचार मांडला आहे. जो विवाहाच्या बाबतीत विविधतेत एकतेवर विश्वास ठेवत नाही.  चित्रपट  सांगतो की आपण एकमेकांच्या अपूर्णतेसह जगणे शिकू शकतो.

 

                       (सौजन्य: गुगल इमेज)

फिल्म.....रॉकी और रानी की प्रेम कहानी (हिंदी)

दिग्दर्शक: करण जोहर

कलाकार: रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, आमिर बशीर, तोता रॉय चौधरी


    फिल्म चा हिरो  रॉकी  (Rocky)आणि हिरोईन राणी (Rani) एकमेकाच्या प्रेमात पडतात. पण दोघांचे कुटुंब खुप वेगळे असते. त्यांच्या चालीरिती भिन्न असतात.दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्या सांस्कृतिक फरकांवर मात करण्याचा प्रयत्न  हे प्रेमी युगुल करताना त्यांची होणारी कसरत यात दाखवण्यात आली आहे.

जाँटी रॉकी (रणवीर सिंग) हा एक समृद्ध शहरी पंजाबी तरुण आहे जो राणी चॅटर्जीच्या (आलिया भट्ट) जीवनात दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या वादळाप्रमाणे प्रवेश करतो. राणी चे वडील कथ्थक वादक आहेत (तोटा रॉय चौधरी) आणि तिची आई (चुर्णी गांगुली) एक इंग्रजी प्राध्यापक आहे.

  रॉकी एक कौटुंबिक मिठाईचा व्यवसाय चालवतो ज्यावर त्याची आजी धनलक्ष्मी (जया बच्चन) नियंत्रण ठेवते, जी पितृसत्ताक आणि कडक स्वभावाची आहे. जेव्हा रॉकी आणि राणीला कळते की त्यांच्यामध्ये शारीरिक आकर्षणापेक्षाही बरेच काही आहे, तेव्हा ते त्यांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्यासोबत तीन महिने राहून सांस्कृतिक मतभेद दूर करण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करतात.आता हे दोघे एकमेकांच्या कुटुंबाशी जुळवून घेऊन लग्नगाठ बांधतात की नाही हा या चित्रपटाचा मूळ आशय म्हणता येईल. अतिशय साधी आणि सामान्य कथा असलेल्या या चित्रपटाला करण जोहरने त्याच्या नेहमीच्या भव्यदिव्य पद्धतीने सादर केलं आहे, अन् त्यात तो यशस्वी झाला आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊससारखंच भव्य रंधावा पॅलेस, ऊंची आणि तितकेच हटके फॅशन असलेले कपडे, जबरदस्त लोकेशन्स, मोठमोठे स्टार्स, नेपोकिड्सची मांदियाळी, भव्यदिव्य सेट्स, सुपरहीट गाण्यांवर नाचणारे हजारो डान्सर्स हे सगळं यात भरभरून पाहायला मिळतं.

चित्रीकरण, संगीत, गाणी हे करण जोहर स्टाईलप्रमाणे अप्रतिमच झालं आहे. प्रीतम यांनी दिलेली गाणी खरंच उत्तम आहेत आणि ती चित्रपटातही तितकीच उत्तमरित्या सादर केली गेली आहेत. याबरोबर सगळ्या कलाकारांची कामंही छान जमून आली आहेत. आमिर बशीर, शबाना आजमी, तोता रॉय चौधरी, चुर्णी गांगुली, नमित दास यांची काम खूप सुंदर झाली आहेत. जया बच्चन चे काम ठीक आहे.

        मराठमोळ्या क्षिति जोगनेही रणवीरच्या आईची भूमिका निभावली आहे . तिने ती उत्तमरित्या भूमिका साकारली आहे. धर्मेंद्र यांना फार स्क्रीन टाइम नसला तरी त्यांना बघूनही फार आनंद वाटतो.

रॉकीच्या भूमिकेत रणवीर सिंग अगदी परफेक्ट  आहे. रानीची भूमिका आलियानेही उत्तम वठवली आहे. रानीचं पात्र लिहिण्यात थोडा प्रगल्भतेचा अभाव वाटला. बाकी पडद्यावर आलियावरुन नजर हटत नाही. इतकी ती यात सुरेख दिसली आहे. बॉलिवूड आणि कारण जोहर स्टाईल ने परिपूर्ण असलेला .....Rocky Aur Rani ki Prem kahani हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges