Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
पुस्तक-- माझी जन्मठेप
लेखक--वि. दा. सावरकर
प्रकाशन-- परचुरे प्रकाशन
लेखक परिचय:
* सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला.
* सावरकर धर्माने हिंदू होते.त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच चाफेकर बंधू यांचा प्रभाव होता. घरातील वातावरणही पोषक असल्यामुळे त्यांचा ओढा स्वातंत्र्यचळवळी कडे झुकत चालला होता.
* सावरकरांनी अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली.देशासाठी कार्य करण्याच्या त्यांच्या निस्वार्थ वृत्तीमुळे तरुणांमध्ये ते लोकप्रिय बनत गेले. एवढेच नाही कितीतरी क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान बनले.
* सावरकरांनी जवळजवळ ४१ पुस्तके लिहिली आहेत. आपल्या लेखणीतून त्यांनी देश प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. धगधगते लेखक ,समाज क्रांतिकारक, समाज सुधारक अशी कितीतरी नावे त्यांना देता येतील.
* थोर समाजसुधारक, क्रांतिकारक वि .दा. सावरकर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी अनंतात विलीन झाले.
वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :
१) अखंड सावधान असावे
२) १८५७ चे स्वातंत्र्यसमर
३) अंदमानच्या अंधेरीतून
४) अंधश्रद्धा भाग १
५) अंधश्रद्धा भाग २
६) संगीत उत्तरक्रिया
७) संगीत उ:शाप
८) ऐतिहासिक निवेदने
९) काळे पाणी
१०) क्रांतिघोष
११) गरमा गरम चिवडा
१२) गांधी आणि गोंधळ
१३) जात्युच्छेदक निबंध
१४) जोसेफ मॅझिनी
१५) तेजस्वी तारे
१६) नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
१७) प्राचीन अर्वाचीन महिला
१८) भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
१९) भाषा शुद्धी
२०) महाकाव्य कमला
२१) महाकाव्य गोमांतक
२२) माझी जन्मठेप
२३) माझ्या आठवणी - नाशिक
२४) माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
२५) माझ्या आठवणी - भगूर
२६) मोपल्यांचे बंड
२७) रणशिंग
२८) लंडनची बातमीपत्रे
२९) विविध भाषणे
३०) विविध लेख
३१) विज्ञाननिष्ठ निबंध
३२) शत्रूच्या शिबिरात
३३) संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
३४) सावरकरांची पत्रे
३५) सावरकरांच्या कविता
३६) स्फुट लेख
३७) हिंदुत्व
३८) हिंदुत्वाचे पंचप्राण
३९) हिंदुपदपादशाही
४०) हिंदुराष्ट्र दर्शन
४१) क्ष - किरणें
"ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला.."
ही कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या च लेखणीतून अजरामर झाली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या भारतातील युवा पिढी च्या मनात आजही या कविताने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत असताना देशद्रोहाचा खटला त्यांच्यावर लादण्यात आला व त्यांना दोन जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. ही शिक्षा सुमारे पन्नास वर्षे एवढी होती. भारतीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व स्वतःला सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिशांची बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.
अंदमानात त्यांना झालेली कोठडी आणि त्या तुरुंगात त्यांचे झालेले हाल याचे करून वर्णन या पुस्तकात केले आहे. रत्नागिरीच्या तुरुंगात असताना भोगाव्या लगणाऱ्या यातना सावरकरांनी चित्र रूपात कोरले. त्याच शिलालेखाचे विस्तृत वृत्तांत म्हणजे माझी जन्मठेप.स्वानुभावाने भोगलेला त्रास त्यांनी आपल्या भावाला सांगितला.
तुरुंगात त्यांना मिळालेली वागणूक वाचताना अंगावर काटा येतो.जन्मठेपेची शिक्षा भोगून सावरकर अंदमानातून मुंबईला येण्यासाठी " महाराजा " जहाजावर चढले तो दिवस म्हणजे 2 मे १९२१ होता.
तुरुंगातील हाल सोसताना अन्याय सहन झाला नाही आणि प्रतिकार केला तर त्याचा उलट परिणाम होत असे. अधिक छळ, अधिक मार, अधिक हाल, जेवण मिळणार नाही, मग् अशा वेळी करणार तरी काय? निमूटपणे सहन केल्याशिवाय सवरकरांकडे च काय पण इतर कैद्यानजवळ ही दुसरा पर्याय नव्हता. हा त्रास सहन झाला नाही की, आत्महत्या ही ठरलेली असे..
अंदमानातील शेवटच्या दिवसात जेव्हा त्यांचे बंधू त्यांना भेटायला आले तेव्हा त्याना वाटू लागले की
ही भेट शेवटची....आपल्या भावाला आपण यानंतर पाहू की नाही असे त्यांना वाटू लागले..
सावरकर लिहितात-"१९११ व्या वर्षी बंद झालेले ते त्या कारागृहाचे दार १९२१ व्या वर्षी परत एकदा करकरले. त्या जबड्याचे ते तोंड परत एकदा उघडले आणि आम्ही दोघेही बंधू जिवंतपणे आतून बाहेर पडलो."
सावरकर व त्यांच्या बंधुस निरोप देण्यासाठी सर्व कैदी आतुर झाले होते. यातील एकाने कोणासही न जुमानता, परिणामांची तमा न बाळगता चाफ्याच्या फुलांची माळ सावरकर यांना घातली आणि पायावर डोके ठेऊन निघून गेला. स्वातंत्र्यसाठी प्राणाची आहुती देणारी अशी माणसे पाहिली की मनात स्वातंत्र्यज्योत पेटल्याशिवाय राहत नाही.
बारा वर्षनंतर सावरकरांनी लांबवर पसरलेल्या अफाट समुद्रावर भारत भूमी चा किनारा प्रथम पहिला त्यावेळी त्यांच्या तोंडून फुटलेले शब्द व त्यांची अवस्था याचे उत्कट वर्णन त्यांनी आपल्या शब्दात मांडले.ते म्हणतात-
"बाबा! ते पहा भारत! ते पहा त्याचे निलसिंधुजलधौत चरणकमल!"
मृत्यूशी झुंज देऊन सावरकर सुखरूप मायदेशी परतले. अंदमानातील त्यांनी भोगलेले पर्व हे अत्यंत रौद्र आणि भयावह आहे.याचे रोमांचक वर्णन त्यांनी माझी जन्मठेप या त्यांच्या पुस्तकात केले आहे.
भारत मातेच्या स्वातंत्र्याचा ध्यास उराशी बाळगून देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीराची रोमांच कथा वाचून देशाप्रती आणि सावरकरां च्या प्रति अभिमान जागृत झाले नाही तरच नवल! त्यांच्या त्यागाला त्रिवार वंदन...
©® मैथिली कुलकर्णी, नांदेड
*नक्की वाचा*
सारे काही शांततेसाठी- सुहासिनी पांडे
जिजाऊसाहेब [मदन पाटील]|ऐतिहासिक कादंबरी
टिप्पण्या