Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

सारे काही शंतातेसाठी- सौ. सुहासिनी पांडे

प्रस्तावना:-

                  जेष्ठ साहित्यप्रेमी, लेखिका सौ. सुहासिनी ताई पांडे यांची सहज भेट झाली आणि त्यांचा कथासंग्रह  हातात पडला. वाचन पूर्ण झाले आणि परीक्षण लिहिण्याचा मोह  आवरला नाही.
प्रत्येक साहित्यिकाचं लेखन हे त्या साहित्यिकाच्या दृष्टीने उत्तम दर्जाचं च असतं. कारण ते शब्द हृदयातून भ्रमण करत पुस्तकं रूपातील कागदांवर उमटलेले असतात. हेच शब्द जेव्हा वाचक प्रेमींच्या हृदयात उतरतात तेव्हा त्यास प्रसिद्धी मिळते.

लेखिकेचा परिचय---



सौ. सुहासिनी सुरेश पांडे

पत्ता - काबरा नगर, नांदेड

जन्मतारीख - 1ऑगस्ट

 "संस्कार बालवाडी" बालकेंद्राच्या सर्वेसर्वा

(१५ वर्षे अविरत कार्य)

लोकमत"सखी".. सकाळ

प्रजावाणि.. दिव्या मराठी

ईत्यादी वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध

"सारे कांही शांततेसाठी" हा

कथासंग्रह


परीक्षण---


            सुहासिनी पांडे यांचा हा प्रथमच कथासंग्रह आहे. या कथासंग्रहात एकूण १९ कथांचा समावेश आहे. प्रसिद्ध दिवंगत लेखिका अनुराधा वैद्य यांची प्रस्तावना लाभलेले हे कथासंग्रह वाचताना शेवटापर्यंत कधी पोहोचले हे लक्षातही आले नाही.


    
             

              माणूस आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत जगत असतो. या प्रवासात  त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक तडजोडीही कराव्या लागतात. या तडजोडी करत असताना मात्र त्याची घुसमट होत जाते. ही घुसमट फक्त स्त्रियांची च होते का? तर नाही ..बऱ्याच अंशी पुरुषांनाही याचा सामना करावा लागतो. दिनकररावांसारखे व्यक्ती याच पुरुषी विवंचनेने चे प्रतिनिधित्व करतात. आपले आपल्या पत्नीशी पटूच शकत नाही हे अल्पावधीतच समजले असतानाही केवळ आणि केवळ आपल्या पिलांसाठी संसाराचा  गाडा ओढताना ते अगतिक होतात. पण तरीही अतिशय धीराने ते आपले सर्व कर्तव्य पार पडतात आणि आयुष्याच्या शेवटी मात्र आपल्या पत्नीशी काडीमोड करून वृद्धाश्रमात राहणे पसंत करतात. हा कठोर निर्णय त्यांनी घेतला तो केवळ उतारवयात का होईना.... शांतता मिळावी म्हणूनच ना...


             एका प्रवासादरम्यान रेल्वे अपघातात दगावलेल्या दांपत्याची अश्विनी ही मुलगी. त्याच डब्यात प्रवास करणारे एक जोडपे या मुलीला दत्तक घेतात. छान वाढवतात आणि तिचे लग्नही लावून देतात. तिच्या गर्भारपणात तिच्या सासरचे लोक कौतुक करताना पाहून तिच्या आईला... अश्रू अनावर होतात. अश्विनी ची खरी आई असती तर ..... हा विचार तीच्या मनास स्पर्शुन जातो.


               सर्वच कथा खूपच रोचक लिहिल्या गेल्या आहेत. पहिलाच कथासंग्रह असूनही यातील उणिवा ह्या नगण्य आहेत. ऋणानुबंधाच्या गाठी, दैवगती, असेही मातृत्व खूप काही बोलून जातात. आपला मुलगा सात वाजेपर्यंत येतो म्हणून सांगून जातो तो पुन्हा येतच नाही. त्याचा एक्सीडेंट होतो. अपघातात झालेला त्याचा मृत्यू त्याच्या कुटुंबांनी कसा सोसला असेल? नुसत्या विचारानेच अंगावर शहारे येतात.


                           आयुष्यात सुख समाधान असताना केवळ  व्यसनाधीनतेमुळे माणसाचे आयुष्य कसे पालटून जाते याचे वर्णन म्हणजे" नवी पहाट." आपला पती दारूच्या अधीन गेल्यामुळे एका पत्नीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पण हीच स्त्री आपल्या पतीच्या चुका माफ करते व सुखी संसाराचा मार्ग अवलंबते. अतिशय सकारात्मक विचारांची ही कथा आहे.


            "मुक्ती" या कथेतील वसुधा ही आजच्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते असे वाटते. सायला सुमार असल्यामुळे तिचे लग्न जुळत नाही. मोठ्या प्रयत्नानंतर एका श्रीमंत घरातील मुलाशी श्रीकांत रवांशी तिचा विवाह होतो. पण सत्य काही वेगळेच असते. अर्धांगवायू झालेल्या आईला सांभाळण्यासाठी म्हणून आईच्या हट्टापायी केलेले हे लग्न असते. हे वसुधाला जेव्हा कळते तेव्हा ती खूप दुखावते. अनुभव व परिस्थिती माणसाला शहाणा करत असतात तशी वसुधा ही धिटाईने त्याच घरात राहते.उच्चशिक्षित असलेली वसुधा नोकरी करण्याचा निर्णय घेते. आपली सासू घर सांभाळून ती नोकरी करत असते. एरवी फारसे घराकडे न फिरणारा पती आपल्या आईच्या मृत्यूनंतर वारंवार वासुधाकडे येऊन तिला घटस्फोटाची मागणी करतो.पण वसुधा त्यास बळी पडत नाही. एक दिवस श्रीकांत राव यांना अर्धांगवायू झाल्याचे तिला समजते. ती त्याला भेटायला जाते तेव्हा त्याच्या जवळ कोणीच नसतं. वसुधाला त्याच्यावर कीव  येते व ती आपल्या घरी त्यांना घेऊन येते. तिची सेवा पाहून श्रीकांत रावांना खूप पश्चाताप होतो. ते वसुधाची माफी मागतात. श्रीकांत रावांच्या अक्षम्य अशा अपराधास तिची क्षमा देत नाही. उलट घर आणि घटस्फोट घेऊन पुण्याला निघून जाते. आयुष्याची संध्याकाळ शांततेत घालवण्यासाठी.....


                    संपूर्ण कथांचा सार सांगायचा झाल्यास या कथा या सकारात्मकतेने ओतप्रोत भरलेल्या आहेत. कोठेही अति टोकाचा निर्णय न घेता सामंजस्याने संकटांचा सामना केला आहे. आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब प्रधानाची आहे त्यामुळे कुटुंब कसे स्थिर ठेवता येईल यावर अधिक भर दिला गेला आहे. नेमक्या याच गोष्टीची आजच्या पिढीला अधिक गरज आहे. नातेसंबंध, नात्यातील वीण काय असते याची जाणीव काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कथासंग्रह.


                अतिशय सुंदर साधे-सरळ पण वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे असे लेखन सुहासिनी पांडे यांनी यात केले आहे. त्यांच्या या लेखन कौशल्य बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील लेखन प्रवासाबद्दल खूप खूप शुभेच्छा!!

©® मैथिली कुलकर्णी 

*  नक्की वाचा*

     पार्टनर- व. पु. काळे 

डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व- अंजली कीर्तने

    






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges