प्रस्तावना:
माणूस किती ही मोठा झाला तरी तो आपल्या आईवडिलांसाठी लहानच. त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन आपण मार्गक्रम करत असतो.लहानपण हे निष्पाप असते. दिसेल ते पाहणे आणि येईल तो अनुभव मग तो बरा वाईट कसाही असो हे बालमन आत्मसात करत असते. त्यामुळे आईवडिलांनी मुलांसमोर चांगलेच वागायला हवे. त्यांच्या समोर भांडणे झाली तर संस्कारक्षम मनावर त्याचा उलट परिणाम होतो. दुर्दैवाने आपण हे सहज विसरतो. आणि त्यामुळे मुलांचे जीवन बिघडते. मुलांच्या जडणघडणीत आईवडिलांचा मोठा हात असतो. आपण काय बोलतो, वागतो याचे बारीक निरीक्षण मुलं करत असतात. आपणच आदळआपट केली, भांडण करत राहिलो तर त्याचा विपरीत परिणाम मुलांवर होतो.मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे दुर्दैव नाही.
पुस्तक- श्यामची आई
लेखक- साने गुरूजी
प्रकाशक- रिया पब्लिकेशन्स
किंमत- ₹१००/-
लेखक परिचय:
नाव:- पांडुरंग सदाशिव साने
जन्म:- २४ डिसेंबर १८९९
जन्मगाव:- रत्नागिरी जिल्ह्यातील "पालगड"
प्रकाशित साहित्य:- साने गुरुजी यांचे सुमारे 80 पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत.
मृत्यु:- ११ जून १९५०
Sane Gruji Marathi Books....
साने गुरुजी यांनी लिहिलेली पुस्तके
साने गुरुजी यांची जवळजवळ ८० पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत...
१) विनोबाजी भावे
२) विश्राम
३) शबरी
४) श्री शिवराय (चरित्र, ८ भाग)
५) शिशिरकुमार घोष (चरित्र)
६) धडपडणारा श्याम
७) श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)
८) श्याम ची आई
९) श्यामची पत्रे
१०) भगवान श्रीकृष्ण (चरित्र, ८ भाग)
११) संस्कृतीचे भवितव्य
१२) सती
१३) संध्या
१४) समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)
१५) साधना
१६) साक्षरतेच्या कथा
१७) सुंदर कथा
१८) सुंदर पत्रे
१९) सोनसाखळी व इतर कथा
२०) सोन्या मारुती
२१) स्त्री जीवन
२२) स्वदेशी समाज
२३) स्वप्न आणि सत्य
२४) स्वर्गातील माळ
२५) राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)
२६) हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
२७) अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)
२८) अस्पृश्योद्धार
२९) आपण सारे भाऊ
३०) आस्तिक
३१) इस्लामी संस्कृति
३२) पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर (चरित्र)
३३) उमाळा
३४) कलिंगडाच्या साली
३५) करुणादेवी
३६) कर्तव्याची हाक
३७) कला आणि इतर निबंध
३८) कला म्हणजे काय?
३९) कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
४०) कावळे
४१) 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
४२) क्रांति
४३) बापूजींच्या गोड गोष्टी (गांधींचे चरित्र)
४४) महात्मा गांधींचे दर्शन (चरित्र)
४५) गीताहृदय
४६) गुरुजींच्या गोष्टी
४७) गोड गोष्टी (कथामाला), भाग १ ते १०
* भाग १ - खरा मित्र
* भाग २ - घामाची फुले
* भाग ३ - मनूबाबा
* भाग ४ - फुलाचा प्रयोग
* भाग ५ - दुःखी
* भाग ६ - सोराब आणि रुस्तुम
* भाग ७ - बेबी सरोजा
* भाग ८ - करुणादेवी
* भाग ९ - यती की पती
* भाग १० - चित्रानी चारू
४८) नामदार गोखले (चरित्र)
४९) गोड निबंध भाग १, २, ३
५०) गोड शेवट
५१) गोप्या
५२) गोष्टीरूप विनोबाजी
५३) महात्मा गौतम बुद्ध (चरित्र)
५४) चित्रकार रंगा
५५) जयंता
५६) जीवनप्रकाश
५७) जीवनाचे शिल्पकार (राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र, शिशिरकुमार आणि काही इतर चरित्रे)
५८) तीन मुले
५९) ते आपले घर
६०) त्यागातील वैभव
६१) त्रिवेणी
६२) दारुबंदीच्या कथा
६३) दिगंबर राय
६४) दिल्ली डायरी
६५) दुर्दैवी
६६) देशबंधु दास (चरित्र)
६७) धडपडणारी मुले
६८) नवजीवन
६९) नवा प्रयोग
७०) आपले नेहरू (चरित्र)
७१) पत्री
७२) बेंजामिन फ्रॅंकलिन (चरित्र)
७३) भारताचा शोध
७४) भारतीय नारी
७५) भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)
७६) माझी दैवते
७७) मानवजातीची कथा
७८)मिरी
७९) मुलांसाठी फुले
८०) मेंग चियांग आणि इतर गोष्टी
८१) गाय
८२) मृगाजिन
८३) यश
८४) इतिहासाचार्य राजवाडे (चरित्र)
८५) रामाचा शेला
श्याम ची आई : परिक्षण:----
"खरा तो एकची धर्म... जगाला प्रेम अर्पावे...".
भारतीय संस्कृतीचे द्योतक असणाऱ्या या कवितेचे बोल कानी पडले की डोळ्यासमोर येतात ते साने गुरुजी. भारतीय संस्कृती ही कुटुंब प्रधान संस्कृती आहे. आपल्या कुटुंबाचा, समाजाचा प्रत्येक मानवी जीवनावर प्रभाव पडलेला असतो.
साने गुरुजी यांच्या जीवनावर ही त्यांच्या आईवडिलांचा खूप मोठा प्रभाव पाडला आणि त्यांनी दिलेल्या संस्कारातून ते घडत गेले.साने गुरुजी यांनी लिहिलेले " श्यामची आई" पुस्तक म्हणजे त्यांच्या आईने त्यांना दिलेले संस्कार... चांगले संस्कार होत. साने गुरुजी यांनी हे पुस्तक तुरुंगात लिहिले. यातील ४२ रात्री मधील ३६
रात्री त्यांनी नाशिक येथील तुरुंगात लिहिल्या आहेत आणि ६ रात्री या तुरुंगातून बाहेर आल्यावर लिहिल्या. या 42 रात्री म्हणजे गुरुजींच्या महान विचारांची माळ आहे. सदर विचाराने गुंफलेल्या माळेतील प्रत्येक फूल सुगंध देऊन जाते. त्यांच्या अमृततुल्य विचाराने माणसाचे मन अंतर्बाह्य न्हाऊन निघते.
साने गुरुजी यांना त्यांची आई "श्याम" म्हणत असे. श्यामच्या आईने त्यांना दिलेली अमूल्य देणगी म्हणजे शाम चे जीवन. त्याचे चरित्र, स्वभाव, वागणूक ,माणूस म्हणून घडण्यात या माऊलीचा मोठा वाटा. याचेच वर्णन साने गुरुजी यांच्या " शाम ची आई " या पुस्तकात आहे.कधी बोलून, कधी रागाने सांगून त्यांनी शाम ला घडविले.याचे अनेक गोष्टी रूपात वर्णन साने गुरुजी यांनी केले आहे..
प्रत्येक रात्री म्हणजे संस्काराचा एक सुंदर ठेवा आहे.
सावित्रीचे व्रत या पहिल्या रात्रीत त्यांनी आपल्या कुटुंबाबद्दल सांगितले आहे . प्रेम ,ज्ञान, शक्ती या गोष्टी माणसाच्या विकासासाठी कशा आवश्यक आहेत हे त्यांनी सुंदर आणि स्पष्टपणे सांगितले आहे. गुरुजी म्हणजेच शाम जेव्हा अंघोळ आटोपून येतो तेव्हा त्याच्या पायाला घाण माती लागू नये म्हणून तो आईला साडीचा पदर पसरवण्यास सांगतो. आई त्याचा हा हट्ट पुरवते. पण जेव्हा तो देवापुढे पाया पडण्यास जातो तेव्हा आई त्याला म्हणते-
,"श्याम, बाळ, पायाला घाण लागू नये म्हणून तू जसा जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो..देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून."
एकदा गुरुजींचे केस वाढलेले पाहून त्यांच्या वडिलांना राग येतो आणि ते केस कापण्यास सांगतात. गुरुजी यास नकार देतात... तेव्हा त्यांची आई त्यांना समजवताना म्हणते,-
"त्यांच्या धर्मभावना दुखवू नयेत म्हणून तू इतके पण करू नयेस?यावर गुरुजी म्हणतात,"केसात कसलं धर्म?"यावर त्यांच्या आईचे उत्तर होते-
" केस तू कशासाठी वाढवतोस?मोह म्हणूनच ना?मग मोह सोडणे म्हणजेच धर्म!"
सुभाषितांचा उत्तम वापर यात करण्यात आलेला आहे.
साने गुरुजी यांच्या या पुस्तकातील प्रत्येक रात्र म्हणजे एक शिकवण आहे. अक्काचे लग्न, मुकी फुले, पर्णकुटी, श्रीखंडाच्या वड्या,...... सारी प्रेमाने नांदा, अशी एकूण सर्वच रात्री वाचण्याजोगी आहेत. पुस्तकातील शब्द न शब्द अंतर्मनावर कोरून जातो. साने गुरुजींचा जन्म कोकणातील असल्यामुळे या पुस्तकात कोकणात बोलण्यात येणाऱ्या बोलीभाषेतील काही शब्दांचा वापर करण्यात आला आहे. वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकाच्या शेवटी या शब्दांचा अर्थ देण्यात आलेला आहे.
मातृहृदयी साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकात प्रत्येकाला आपली आई अनुभवायला मिळते. आजच्या आईचे रूप बदलले असले तरीही मातृत्व मात्र तेच आहे. साने गुरुजींनी त्यांच्या आईकडून आत्मसात केलेले चांगुलपणा, सद्वर्तन असे सर्व गुण त्यांनी आपल्या गोष्टीरूपात वर्णन केले आहे. त्यांनी आपली लेखणी पुस्तक रुपात उतरवली आणि मातृऋण फेडले. त्याच बरोबर येणाऱ्या अनेक पिढ्यांना घडवण्यासाठी अनमोल अशी देण दिली आहे.
मोबाइल, टीव्ही च्या आजच्या युगात वावरताना मुलांना हे पुस्तक म्हणजे संस्काराची बहुमोल शिदोरी आहे. गुरुजींच्या महान विचारांनी मराठी मन पावन होईल आणि उद्याची उज्ज्वल पिढी नक्की घडेल असे हे मौलिक पुस्तक आहे. अतिशय उपयुक्त असे पुस्तक मुलांबरोबर च पालक म्हणून आपणही नक्कीच वाचलेच पाहिजे..
©® मैथिली कुलकर्णी, नांदेड
* नक्की वाचा*
टिप्पण्या