पोस्ट्स

Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

दत्त लहरी (अनुवादक- प्रा. रमेश भारदे)|Datta Lahari

इमेज
प्रस्तावना- धर्म,श्रद्धा, अध्यात्म, या विषयावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. आपण ते वाचतो. आकलनही करतो. "दत्तलहरी" हा असाच एक. अध्यात्मावर  श्रद्धा, विश्वास असणाऱ्या लोकांबरोबरच  प्रॅ क्टिकल लाईफ जगणाऱ्या आजच्या पिढीलाही बोध देणारा हा ग्रंथ आहे. पुस्तकाचे नाव--- दत्तलहरी (स्तोत्राचे मराठी ओवीबद्ध भाषांतर) मूळ ग्रंथ---- महायोगी दलादन अनुवादक---- प्रा. रमेश भारदे प्रकाशन---- गीतामाई प्रकाशन मूल्य---- ₹६०/- लेखक परिचय---- जन्म---- २१ जून १९४४ शिक्षण--- एम. ए.( संस्कृत )                एम. ए. ( मराठी )          प्रा. रमेश भारदे सरांचे प्राथमिक शिक्षण शेवगाव येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले. व्यवसायाने ते प्राचार्य होते. बाळासाहेब भारदे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव येथे  त्यांनी प्राचार्य म्हणून अध्यापनाचे कार्य केले आहे. प्रकाशित साहित्य---                        गीतामाई                   ...

ठिकरी(Thikari)| व. पु. काळे

इमेज
प्रस्तावना--        माणूस हा सतत सुखाच्या शोधात असतो. हे सुख शोधत असताना त्याचे स्वच्छंदी मन सर्वत्र भटकत असते. समाजात वावरणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी त्याचा संपर्क येतो. आणि नकळतच या लोकांच्या वागण्याचा परिणाम या मनावर होत जातो. समाजात भेटत जाणारी ही लोकं प्रत्येक वेळी चांगल्या स्वरूपात भेटतीलच असे नाही. प्रत्येकाच्या वागण्याचा, बोलण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. पृथ्वी तलवार स्त्री आणि पुरुष या दोन जाती अस्तित्वात आल्या. स्त्री वर्गाकडे पुरुषांचा पाहण्याचा दृष्टिकोण हा प्रत्येक वेळी चांगलाच असतो असे नव्हे. अपवादात्मक असणाऱ्या आणि स्वतःला पुरुष म्हणून वावरणाऱ्या या नराधमाकडून स्त्री वर्गाची होणारी अवहेलना आणि त्यातून स्वतः सावरणाऱ्या स्त्रीचे वर्णन व. पु. काळे यांनी आपल्या " ठिकरी"या पुस्तकातून मांडले आहे.     "ठिकरी" या शब्दाचा शब्दशहा अर्थ घ्यावयाचा झाल्यास असे म्हणता येईल की, बालपणीचा हा एक खेळ प्रकार आहे. खडूने चौकोन  करून या चौकोनात फरशीचा किंवा दगडाचा एखादा तुकडा टाकला जायचा आणि लंगडी घालून तो फरशीचा तुकडा उचलायचा. असा तो एक खेळ आहे. हा फरशीचा तुक...

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

इमेज
प्रस्तावना-             जीवन ही एक रंगभूमी आहे आणि आपण त्या रंगभूमीवर काम करणारे नाटककार. या रंगभूमीवर येणे आणि जाणे हे दोन्ही आपल्या हातात नसते. ही जबाबदारी पार पाडणारा परमेश्वरच. जन्म आणि मृत्यू या दोन्हीतील अंतर म्हणजेच जीवन. ते कसे जगायचे हे प्रत्येकाच्या जीवनशैली वर, आयुष्यात त्या जीवावर घडलेल्या संस्कारावर अवलंबून असते. असाच एक जीव मराठी मातीत जन्मला ज्याने मराठी साहित्याला आपल्या लेखणीने समृद्ध केले आहे. मराठी भाषेसाठी चे त्यांचे योगदान हे अनमोल आहे. अनेक पारितोषिकांचे मानकरी असणारे हे महान व्यक्ती कोण ?? ते आहेत... वि.वा. शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचे संपूर्ण नाव. कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांनी आपले लेखन केले आहे. पुस्तकाचे नाव: नटसम्राट (नाटक) लेखक: वि. वा.शिरवाडकर प्रकाशन: पॉप्युलर प्रकाशन लेखक परिचय:-        * वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी नाशिक येथे झाला.  त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.  लहान असतांनाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव बदलून व...

माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर | पुस्तक परिक्षण|Mazi Janmthep Book review in Marathi

इमेज
प्रस्तावना:   वि. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झटणारा आणि आपल्या आयुष्याची आहुती देण्यास तयार असणारा प्रत्येक क्रांतिकारक हा तेवढाच मौल्यवान. या क्रांतिकारकांच्या रक्ताच्या थेंबा थेंबात राष्ट्रभक्ती होती आणि त्यांनी आपले रक्त आणि  देह या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी वाहिला. या महान क्रांतिकारकांचा व त्यांच्या देशाप्रती  अखंड निस्वार्थ कार्याचा प्रत्यय स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात   देशाने घेतला आहे आणि याचाच परिणाम म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला . देशाच्या स्वातंत्र्यासाठी वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेऊन आपले संपूर्ण जीवन देशाच्या हितासाठी वाहणाऱ्या मौल्यवान हिऱ्यांपैकी  एक मौल्यवान हिरा म्हणजे सावरकर असे म्हटल्यास वावगे ठरू नये.            राष्ट्र रक्षणासारखे कोणतेच पुण्य नाही.. कोणतेच व्रत नाही.. कोणताच यज्ञ नाही, म्हणूनच मग देशाला पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी.. रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारे  स्वातंत्र्यवीर सावरकर. बलाढ्य इंग्रजांना न घाबरता जेलमधील यातनांन...

यश तुमच्या हातात-- शिव खेरा

इमेज
यश तुमच्या हातात .                                                        ( सौजन्य: गुगल इमेेेजेस ) पुस्तक -- यश तुमच्या हातात लेखक- शिव खेरा जन्म- २३ ऑगस्ट १९६१ भाषा- मराठी प्रकाशन- मॅकमिलन पब्लिशर्स इंडिया लिमिटेड किंमत- ₹ ३१०/-  परीक्षण :-             मॅकमिलन पब्लिशर्स इंडिया लिमिटेड प्रकाशन असलेले "यश तुमच्या हातात"  हे शिव खेरा यांचे पुस्तक म्हणजे "You can win" या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. एकुण आठ प्रकरणात  हे पुस्तक विभागले गेले आहे. यशस्वी होण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. पण ते सहज मिळत नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. घरात निवांत बसून ते सहजासहजी मिळेल का?? तर नाही. कष्ट घेतल्याशिवाय हे शक्य नाही. पण हे कष्ट, ही मेहनत योग्य दिशेने व्हायला हवी. तर आणि तरच आपल्याला यश मिळू शकेल. यश तुमच्या हातात हे पुस्तक म्हणजे .... मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाला दिशा दाखवणारा वाटसरू आहे.  चोखंदळपण...

Sane Guruji Books|श्यामची आई - साने गुरुजी| Shyamchi Aai book review in Marathi

इमेज
प्रस्तावना:                     माणूस किती ही मोठा झाला तरी तो आपल्या आईवडिलांसाठी लहानच. त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन आपण मार्गक्रम करत असतो.लहानपण हे निष्पाप असते. दिसेल ते पाहणे आणि येईल तो अनुभव मग तो बरा वाईट कसाही असो हे बालमन आत्मसात करत असते. त्यामुळे आईवडिलांनी मुलांसमोर  चांगलेच वागायला हवे. त्यांच्या समोर भांडणे झाली तर संस्कारक्षम मनावर त्याचा उलट परिणाम होतो. दुर्दैवाने आपण हे सहज विसरतो. आणि त्यामुळे मुलांचे जीवन बिघडते. मुलांच्या जडणघडणीत आईवडिलांचा मोठा हात असतो.  आपण काय बोलतो, वागतो याचे बारीक निरीक्षण मुलं करत असतात. आपणच आदळआपट केली, भांडण करत राहिलो तर त्याचा विपरीत परिणाम मुलांवर होतो.मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे दुर्दैव नाही. पुस्तक- श्यामची आई लेखक- साने गुरूजी प्रकाशक- रिया पब्लिकेशन्स किंमत- ₹१००/- लेखक परिचय:   नाव:- पांडुरंग सदाशिव साने      जन्म:- २४ डिसेंबर १८९९  जन्मगाव:- रत्नागिरी जिल्ह्यातील "पालगड"  प्रकाशित साहित्य:- साने गुरुजी यांचे सुमारे 80 पेक्षा ...

सारे काही शंतातेसाठी- सौ. सुहासिनी पांडे

इमेज
प्रस्तावना:-                   जेष्ठ साहित्यप्रेमी, लेखिका सौ. सुहासिनी ताई पांडे यांची सहज भेट झाली आणि त्यांचा कथासंग्रह  हातात पडला. वाचन पूर्ण झाले आणि परीक्षण लिहिण्याचा मोह  आवरला नाही. प्रत्येक साहित्यिकाचं लेखन हे त्या साहित्यिकाच्या दृष्टीने उत्तम दर्जाचं च असतं. कारण ते शब्द हृदयातून भ्रमण करत पुस्तकं रूपातील कागदांवर उमटलेले असतात. हेच शब्द जेव्हा वाचक प्रेमींच्या हृदयात उतरतात तेव्हा त्यास प्रसिद्धी मिळते. लेखिकेचा परिचय--- सौ. सुहासिनी सुरेश पांडे पत्ता - काबरा नगर, नांदेड जन्मतारीख - 1ऑगस्ट  "संस्कार बालवाडी" बालकेंद्राच्या सर्वेसर्वा (१५ वर्षे अविरत कार्य) लोकमत"सखी".. सकाळ प्रजावाणि.. दिव्या मराठी ईत्यादी वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध "सारे कांही शांततेसाठी" हा कथासंग्रह परीक्षण---             सुहासिनी पांडे यांचा हा प्रथमच कथासंग्रह आहे. या कथासंग्रहात एकूण १९ कथांचा समावेश आहे. प्रसिद्ध दिवंगत लेखिका अनुराधा वैद्य यांची प्रस्तावना लाभलेले हे कथासंग्रह वाचताना शेवटापर्यंत कधी पोहोचले ...