Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
माणूस हा सतत सुखाच्या शोधात असतो. हे सुख शोधत असताना त्याचे स्वच्छंदी मन सर्वत्र भटकत असते.
समाजात वावरणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी त्याचा संपर्क येतो. आणि नकळतच या लोकांच्या वागण्याचा परिणाम या मनावर होत जातो. समाजात भेटत जाणारी ही लोकं प्रत्येक वेळी चांगल्या स्वरूपात भेटतीलच असे नाही. प्रत्येकाच्या वागण्याचा, बोलण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. पृथ्वी तलवार स्त्री आणि पुरुष या दोन जाती अस्तित्वात आल्या. स्त्री वर्गाकडे पुरुषांचा पाहण्याचा दृष्टिकोण हा प्रत्येक वेळी चांगलाच असतो असे नव्हे. अपवादात्मक असणाऱ्या आणि स्वतःला पुरुष म्हणून वावरणाऱ्या या नराधमाकडून स्त्री वर्गाची होणारी अवहेलना आणि त्यातून स्वतः सावरणाऱ्या स्त्रीचे वर्णन व. पु. काळे यांनी आपल्या " ठिकरी"या पुस्तकातून मांडले आहे.
"ठिकरी" या शब्दाचा शब्दशहा अर्थ घ्यावयाचा झाल्यास असे म्हणता येईल की,
बालपणीचा हा एक खेळ प्रकार आहे. खडूने चौकोन करून या चौकोनात फरशीचा किंवा दगडाचा एखादा तुकडा टाकला जायचा आणि लंगडी घालून तो फरशीचा तुकडा उचलायचा. असा तो एक खेळ आहे. हा फरशीचा तुकडा, फेकताना कोणत्या चौकोनात जाईल? हे तो तुकडा फेकणाऱ्यांना माहीत नसते. हा फरशीचा तुकडा म्हणजे कथेतील नायिका आहे.
पुस्तकं--- ठिकरी
लेखक--- व.पु.काळे
प्रकशन--- मेहता पब्लिकेशन हाऊस
किंमत--- ₹८०/-
नाव:- व.पु. काळे म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे.
जन्म:- २५मार्च १९३२
मृत्यु:- २६ जून २००१
साहित्य लेखन:- ललित, कथासंग्रह, कादंबरी, व्यक्ती चित्र, वैचारिक लेखन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन करणाऱ्या या लेखकाचे जवळजवळ 45 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित आहेत. लेखन क्षेत्रातील " पु.भा.भावे" हा पुरस्कार यांच्या नावे आहे.
व.पु.काळे हे व्यवसायाने "वास्तुविशारद" होते.
व.पु.काळे यांच्या अनेक पुस्तकांपैकी ठिकरी ही एक. मनाला स्पर्शून जाणारी ही कथा आहे.
पितृ समान व्यक्ती जाने तिला मोठं केलं,ज्ञानाचा मार्ग दाखवला त्याच व्यक्तीकडून आयुष्याची बरबादी होते तेव्हा एखाद्या स्त्री ची काय मानसिकता असेल?? हे भयानक सत्य पचवताना तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल?
नियतीने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जीच्यासाठी संघर्षच उभा केला ती कथेतील नायीका म्हणजेच "सोना".
प्रत्येक वळणावर येणाऱ्या संघर्षातून वाट काढत ही सोना जगत असते. पुढे चालत असते आणि त्यातूनच तिचे मनस्वी व्यक्तिमत्त्व घडत जाते. सतत ठोकर खात जगणारी सोना तिच्यासारख्याच असाह्य अशा अनेकांना मदत करण्याचे ठरवते आणि त्यासाठी ती प्रयत्नशील राहते.
आपले जीवन ठिकरी प्रमाणे आहे का? की आपण स्वतः एक ठिकरी आहोत? हा प्रश्न तिच्या मनात सतत येत असतो.
स्वतःला पुरुषार्थ म्हणवणाऱ्या या समाजातील पुरुषांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीवच नसते. स्त्रीला समान दर्जा देणे, तिचे अस्तित्व जोपासणं, तिच्या कर्तुत्वाची शान सांभाळणं म्हणजे पुरुषार्थ. दुर्दैवाने तसे होत नाही. अहंकार, मत्सर या भावनांचा उद्रेक होतो आणि मग पुरुषांची गिधाडं होतात. अशाच वासनेची कथेतील नायिका "सोना" ही शिकार होते. आणि मग तिच्यासमोर उरतो तो फक्त अंधार...
सोनाच्या जीवन प्रवासात महेश नावाचा एक व्यक्ती येतो. पण शेवटी तो ही एक पुरुषच. हे सगळं तिला असह्य होते म्हणून ती महेश पासून वेगळी होते व एकटी राहते. पासपोर्ट चा व्यवसाय करते. दुसरं लग्न करण्याचा विचार तिच्या मनात येतो पण... नव्या अनोळखी चौकोनात जाऊन पडण्यापेक्षा परिचयाचा जुना चौकोन काय वाईट आहे? असे तिला वाटते. तिच्या मनाची घालमेल होत असली तरीही इतर ठीकऱ्यांना ती ऊब देऊ शकते ह्यातच तिला कृतज्ञता वाटते. समाजातील वासनेने लडबडलेल्या गिधाडांच्या पासून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा एखादी कोंबडी ज्या प्रेमाने सगळ्या पिलांना पंखाखाली घेऊन वाचवते त्याच प्रमाणे सोनाही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. अतिशय आव्हानात्मक आणि विचाराच्या वेगळ्या पठडीवर वाचकाला नेणारी ही कथा आहे.
©® मैथिली कुलकर्णी
Wachan katta with Maithili Kulkarni
टिप्पण्या