Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
रणांगणावर कर्तृत्व गाजवणाऱ्या प्रत्येक पराक्रमी , शुर, धैर्यवान योध्याचे आयुष्य अनेक रोमहर्षक प्रसंगांनी भरलेलं असतं. थोरले बाजीराव पेशवे ही त्यापैकीच एक. तो ऐतिहासिक कालखंड, त्या वेळची परिस्थिती आणि राजकीय तसेच सामाजिक जीवन पद्धती यांचा अभ्यास करता ब्राह्मणी आणि यवनी संस्कारांची देवाण-घेवाण करावं इतपत पुढारलेला समाज त्या वेळेचा निश्चितच नव्हता. तरीही अप्रतिम सौंदर्याची खाण असणाऱ्या मस्तानीवर बाजीरावाने उत्कट प्रेम केलं. विरह यातनेत मृत्युला कवटाळून समाजविरोधी केलेल्या धाडसाची यथोचित किंमतही चुकवली.
अप्रतिम कल्पनाविलास , सुरेख लेखन शैली यामुळे राऊ वाचतांना वाचक सहज सुलभ त्या दृश्यांच्या अवतीभवती असल्याचा भास होतो. थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या मधील भावनविश्व रेखाटताना कोठेही अतिरेक झाला नाही आणि त्यामुळेच राऊ वाचकांच्या पसंतीस उतरली.
राऊ
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
ना. स. इनामदार म्हणजेच नागनाथ संतराम इनामदार यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२३ रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव येथे झाला. व्यवसायाने ते शासनाच्या भुमीअभिलेख (मोजणी खाते) विभागात कार्यरत होते. याच विभागाच्या संचालक पदावरून ते निवृत्त झाले. त्यांचे ऐतिहासिक लेखन उत्कृष्ट दर्जाचे आहे. त्यांची लेखन शैली वाचकांना इतिहासाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देते. "बंड" ही त्यांची स्वतंत्रसंग्रामावर लिहिलेली पहिली कादंबरी. त्यांच्या दुसऱ्या कादंबरीनंतर ती प्रकाशित झाली.
ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या ना स इनामदार यांना १६ ऑक्टोबर २०२० मध्ये देवाज्ञा झाली. त्यांच्या अजरामर साहित्यकृती मुळे ते वाचक प्रेमींच्या मनात सतत विराजमान राहतील.
थोरला बाजीराव पेशवा म्हटलं की मस्तानी हे नाव सहज सर्वांच्या ओठावर येते. या प्रेम कहाणी व्यतिरिक्त लढवय्या बाजीराव वाचकांपर्यंत खूप कमी पोहोचला. कोण हा थोरला बाजीराव पेशवा?
चाळीस लढाया अजिंक्य राहिलेला, संपूर्ण जगात असे सेनापती असणारा विश्वविख्यात म्हणजे बाजीराव...
आपल्या दोन्ही हातात दोन दांडपट्टे घेऊन पायांच्या लकबिने घोडा पुढे वळवीत एका घावात १५ मुंडकी उडवणारा हा वीर... ज्याने संपूर्ण भारतात मराठ्यांचे नाव झळकवले आणि आपल्या कर्तुत्व विजयाने सारा हिंदुस्तान एक केला, असा हा पराक्रमी वीर. काळभैरव होऊन रौद्ररूप घेऊन रणांगण गाजवणारा योध्दा ..... राऊ या कादंबरीच्या निमित्ताने समोर आला.
राऊ या कादंबरीत थोरले बाजीराव पेशवे यांचे जीवन अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. प्रत्येक पात्र साजेसे असे रेखाटले आहे. यावरून पेशवेकालीन वंशावळीची माहिती आपल्याला मिळते. थोरले बाजीराव पेशवे यांच्या आईचे नाव राधाबाई. यांना मुले होती. एक बाजीराव आणि दुसरे चीमाजी पंत.
बाजीराव यांच्या पत्नीचे नाव काशीबाई होते. त्यांच्या मुलाचे नाव नानासाहेब. शाहू महाराजांच्या आज्ञेनुसार बाजीरावांनी पुण्यात राहण्यासाठी शनिवारवाडा बांधला. कोथरूड बाग कलावंतांच्या राहण्यासाठी नेमून दिली. राधाबाई यांच्या दोन कन्या होत्या. मोठी भिऊबाई बारामतीच्या बाबाजी नाईकांना दिली होती त्यांची पेठी पुण्यातच होती. धाकटी अनुबाई इचलकरंजीच्या व्यंकटराव घोरपडे यांना दिली होती घोरपडे आपला पागा घेऊन पेशव्यांबरोबर असत त्यामुळे अनुबाई पुण्यातच असत. नानासाहेबांच्या पत्नीचे नाव गोपिका होते.
असंख्य लढायांनी आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या बाजीरावांचे मस्तानीवर प्रेम जडले आणि इथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. मस्तानीला एक मुलगा झाला त्याचे नाव समशेरबहाद्दर ठेवण्यात आले. मस्तानी त्यास कृष्ण सिंग म्हणत असे. बाजीरावांनी शनिवार वाड्यात दोन महाल बांधून घेतले. एक नाना साहेबांसाठी आणि दुसरा मस्तानी साठी. पण मस्तानीला शनिवार वाड्यात आणणे हे कुटुंबातील कोणालाही रूचण्यासारखं नव्हतं. धर्म कार्य करण्याची इच्छा राधाबाई यांच्या मनात असूनही त्यांना ते करता येत नव्हतं कारण ब्राह्मणवृंदाने त्यांना वाळीत टाकलं होतं. कुटुंबाच्या इच्छे खातिर बाजीराव मस्तानी ला न सांगता निघून गेले आणि मस्तानी च्या महाला भोवती चौक्या-पहारे बसवण्यात आल्या. त्यातूनही ती पळून जाण्यात यशस्वी ठरली. पण बाजीरावाने मस्तानीला समजाऊन पुन्हा पुण्यात आणले. त्यांचे कुटुंब मस्तानीला स्वीकारतील असी आशा त्यांना वाटत होती. पण त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला. मस्तानीला वाड्या ऐवजी पर्वतीच्या बागेत कैद करण्यात आले.
महाराजांची उत्तरेकडील मोहीम चालूच होती. रावेरी गावी असताना त्यांना ताप आला त्यातून ते सावरले नाहीत. काशीबाई त्यांच्याजवळ होत्या पण मस्तानीच्या वीरहातच बाजीराव पेशव्यांनी आपला देहत्याग केला. आपल्या लाडक्या मस्तानीच्या समशेरबहाद्दर ची मुंज करण्याचे त्यांचे स्वप्न तसेच राहिले. वैद्यांच्या औषधांचा गुण आला नाही शेवटी ज्वराची दाहकता बाजीरावांचे प्राण घेऊनच शमली.
ना. स. इनामदार यांचे अप्रतिम साहित्य लेखन..... थोरल्या बाजीराव पेशवे यांना जाणून घेण्यासाठी एकदा अवश्य वाचा.... राऊ!
©® मैथिली कुलकर्णी
*नक्की वाचा*
नटसम्राट(वी. वा.शिरवाडकर)|Natsamrat-Kusumagraj
टिप्पण्या
😊👍