Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

रिच डॅड पुअर डॅड(मराठी)|अभिजित थिटे|best seller Marathi books| रॉबर्ट टी कियोसाकी


      मूळ इंग्रजी भाषेतील मराठीमध्ये अनुवादित केलेले हे पुस्तक. पुस्तके अनेक प्रकारची असतात. कोणी ऐतिहासिक लेखन करतं तर कोणाला अध्यात्मिक लेखनात रस असतो. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे अनेक भाषेत अनुवाद झालेले आहेत. मायबोली मराठी  ही त्यातलीच एक म्हणता येईल. लाखो लोकांना त्यांच्या पैशाप्रती असणारे विचार बदलण्यास भाग पाडणारे, माईंड सेट बदलवणारे विचार माणसांच्या मनात बिंबवणारे हे पुस्तक म्हणता येईल.

*लेखक परिचय*
      नाव : रॉबर्ट टोरू कियोसाकी
• जन्म : 8 एप्रील 1947, हिलो, हवाई, यू.एस.
• वडील : राल्फ एच. कियोसाकी
• आई : मरजोरी ओ. कियोसाकी


अनुवाद:--- *अभिजित थिटे*

*अभिजीत थिटे यांनी अनुवादित केलेले इतर प्रकाशित पुस्तके*

मुक्ती

आय टू हेड अ लव्ह स्टोरी

तेजशलाका

मनःपूर्वक खुशवंत


रिच डॅड पुअर डॅड:---

                  पुस्तकाचे मुखपृष्ठ उघडल्यावर सुरुवातीला नेहमीच्या पुस्तकांप्रमाणेच अनुक्रमणिका दिसली. यात एकूण दहा प्रकरण आहेत.  धड्यांवरून नजर फिरवताना पुस्तकाचे स्वरूप लक्षात येते. मुखपृष्ठ आकर्षक आहे.

हे पुस्तक काय करेल ?याबद्दलचे काही मुद्दे यावर मांडले आहेत. ते असे---

*श्रीमंत होण्यासाठी खूप उत्पन्न मिळवावं लागतं हा समज उधळून लावेल.

*तुमचं घरही तुमची मालमत्ता आहे या समाजाला आव्हान देईल.

*मुलांना त्यांच्या भावी आर्थिक यशासाठी पैशाबद्दल काय शिकवावं लागेल ते तुम्हाला शिकवेल.

या काही बाबी वाचताच पुस्तकाबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली.


          रॉबर्ट टी कियोसाकी यांचे दोन वडील होते.एक जन्मदाता वडील आणि दूसरे ज्यांना रॉबर्ट यांनी आपले वडील मानले. जे 
त्यांच्या मित्राचे mike चे वडील होते. श्रीमंत आणि गरीब या दोन्ही वडिलांकडून लेखकाने खूप काही शिकले. एक वडील शिक्षित असूनही गरीब तर दुसऱ्या वडिलांनी फारसं शिक्षण घेतलेलं नाही तरीही आपापल्या क्षेत्रात त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व यशस्वी ही झाले."पैसा" या शब्दाविषयी मात्र दोन्ही वडिलांमध्ये विचार भिन्नता होती.

     एखादी व्यक्ती जेव्हा विचार करते की आपण कोणतीच वस्तू खरेदी करू शकत नाही तेव्हा त्या व्यक्तीचे डोकं काम करणं बंद होतं. पण जेव्हा तीच व्यक्ती आपल्या डोक्यात प्रश्न निर्माण करते तेव्हा त्याचं डोकं काम करायला सुरु करत... प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम करतं. म्हणजेच डोक्याला नकारात्मक गोष्टीपासून दूर ठेवून त्याला त्याचं काम करू दिलं की डोकं सक्रिय राहतं आणि जीवनात बदल घडत जातात.

    रॉबर्ट च्या पहिल्या वडिलांच्या मते एखाद्या गोष्टीत धोका न पत्करता उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन सेफ सुरक्षित नोकरी करता आल पाहिजे.तर दुसऱ्या वडिलांच्या मते धोका पत्करून अभ्यास करून आपण पैशाला कामाला लावायला हवं. संपत्ती आणि जबाबदारी यात अंतर आहे. ते समजावून घेता आले पाहिजे. हे अंतर माहित असायला हवं. संपत्तीने पैशात वाढ होते. जबाबदारीने पैसे कमी होतात. रॉबर्टच्या दुसऱ्या वडिलांचे मत असे होते की आपल्या उत्पन्नातील कमाईचा एक भाग स्वतःसाठी ठेवायला हवा त्यातून अशी संपत्ती घ्यायला हवी त्यातून आपल्याला उत्तम उत्पन्न मिळाले पाहिजे.

     रॉबर्टच्या दोन्ही वडिलांनी त्याला एक गुण शिकवला तो म्हणजे--- "आपल्याकडून एकच चूक वारंवार होता कामा नये." झालेल्या चुकीमधून आपण शिकलं पाहिजे आणि त्यात सुधारणा करून पुढे चाललं पाहिजे आपण पैशाचा मागे न धावता पैशाने आपल्यासाठी काम करावे असे रॉबर्टच्या दुसऱ्या वडिलांचे म्हणणे होते.

     पैसे साठवणे ही मनुष्याची प्रवृत्ती आहे पण साठवणे म्हणजे घरात न ठेवता ते योग्य जागी गुंतवले पाहिजेत जेणेकरून त्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल. या पुस्तकात अनेक उदाहरणातून पैशाची मोल स्पष्ट करण्यात आले आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य वापर करता आला पाहिजे ती संधी योग्य की अयोग्य हे ओळखता आले पाहिजे हे जर आपल्याला जमले नाही तर आपण कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही.

      रिच आणि पुअर या दोन्हीही डेडच्या शिकवणीतूनच रॉबर्टच्या जीवनाची जडणघडण होत गेली. स्वतःच्या वडिलांना टिपू वर बॅड म्हणत तर मित्राच्या वडिलांना रीचे डॅड. उच्चशिक्षित असूनही केवळ आर्थिक ज्ञानाच्या कमतरतेमुळे त्यांना नेहमी पैशाची चणचण भासत असे. याउलट रिच डॅड हे केवळ आठवी पास असूनही आर्थिक ज्ञानाच्या जोरावर शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. यारीचे डॅडमी रॉबर्ट यांना जीवनाच्या वळणावर उपयोगी पडणाऱ्या गोष्टी (श्रीमंत होण्यासाठी ) सांगितल्या ज्यामुळे रॉबर्ट जीवनात यशस्वी होत गेले.

      पुस्तकातील संवाद अतिशय सुंदर रित्या लिहिले गेले आहेत ते वाचकाच्या मनाला भिडतात विचार करण्यास प्रवृत्त करतात... जसे..

"शिक्षण हे पैशापेक्षा अधिक मौल्यवान आहे"

"बऱ्याच हुशार  लोकांचे गरीब होण्याचे कारण म्हणजे ते चांगले हॅमबर्गर बनण्यावर भर देतात आणि व्यवसाय प्रणाली बद्दल त्यांना अधिक माहिती नसतं"

"अपयश विजय त्यांना प्रेरणा देते. अपयश पराभूत झालेल्यांना पराभूत करते".

"एक चांगला प्रॉपर्टी मॅनेजर रियल इस्टेट मधील यशाची गुरुकिल्ली आहे".

     थोडक्यात सांगायचं तर लेखकाने म्हणजेच रॉबर्टी कियोसाकी यांनी आर्थिक साक्षरता आणि संपत्ती निर्मितीचे महत्त्व यात सांगितले आहे आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी दोन महत्त्वाच्या व्यक्तींची दाखले दिले ज्यांना रीच डॅड व पुअर डॅड संबोधले आहे ज्यांनी रॉबर्टला पैशाचे महत्व उलगडून सांगितले व्यक्तिरेखा किती वास्तव आहेत यापेक्षा रॉबर्ट यांनी पुस्तकात पैशासंबंधीच्या सांगितलेल्या गोष्टी त्याचे महत्त्व माणसांच्या जीवनात अधिक उपयोगी पडणारे आहे आर्थिक नियोजनाची घडी बसवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करणारे आहे नक्की वाचावे असे हे.."रीच डॅड पुअर डॅड".

©® मैथिली कुलकर्णी

ठिकरी (Thikari)|व. पु. काळे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges