Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
प्रस्तावना:--
काही साहित्यिक असे असतात, ज्यांच साहित्य अंतर्मनाला हेलावून टाकतं.त्यांच्यातील लेखनकौशल्य वाचून मन आतृप्त होतं आणि त्यांनी लिहिलेला शब्द न शब्द मनाला छेदून तर जातोच पण तो वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. हा शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो, प्रश्न विचारत असल्याचा भास होतो आणि त्यामुळेच की काय वाचक प्रचंड अस्वस्थ होतो. त्या शब्दांची संवेदनशीलता, प्रखरता, स्पष्टताच एवढी असते की वाचक आतून-बाहेरून हेलावून जातो. असेच काहीसे "आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या " हा काव्यसंग्रह वाचताना झाले.
आपल्या लेखन प्रतिभेने सर्वसामान्य वाचकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी कवयित्री,लेखिका सौ. माधुरी चौधरी यांचा काव्यसंग्रह वाचताना डोळ्यात पाणी तरळले नाही तरच नवल.. भयान वास्तव दर्शन काव्यातून झालेले आहे आणि येथेच कवयित्रींनी वाचकास जिंकून घेतले आहे.
आज आपला भारत देश अमृतमहोत्सव साजरा करतो आहे.आजची नारी ही निश्चितच खूप बदललेली आहे. ती स्वावलंबी झालेली आहे. पण ज्या जखमा ,रेघोट्या, स्त्री म्हणून तिच्या मनावर कोरल्या गेल्या... त्याची वेदना खूप खोलवर आहे. ती वेदनाच मनाला अस्वस्थ करून जाणारी आहे. काळ बदलला..परिस्थितीनुरूप स्त्रियांनी स्वतःमध्ये बदल करून घेतला...पण तरीही स्त्री मनाची उद्विग्नता, सतत वाटणारी अस्थिरता,असुरक्षितता आजही जशीच्या तशीच आहे.
कवयित्री--- माधुरी चौधरी
प्रकाशन--- काव्याग्रह प्रकाशन
किंमत--- ₹ १५०/-
मूळ गाव : पाडळसे
हल्ली मुक्काम : औरंगाबाद
शिक्षण : M.Sc. (Physics)
मोबइल: ९४२१८६०८७३
ई-मेल. madhurimchaudhari@gmail.com
व्यवसाय : शिक्षण क्षेत्रात कार्य .स्वतःच्या शिकवणी वर्ग चालवतात.
🌏 माय मराठी साहित्य परीषदेच्या संस्थापक
2)आम्ही लेखिकाची मराठवाडा विभागप्रमुख,
कार्यकारिणी सदस्य,
3)भाषा साहित्य-संस्कृती व अभ्यासक मंडळ
याची सहसचिव
4) तिफण या साहित्यिक संस्थेची समन्वयक
5)स्वातीताई मोराळे ओबीसी संस्थेची साहित्य प्रमुख.
प्रकाशित साहित्य
1) " मधुज मेलॉडी" काव्यसंग्रह (आयडीया
प्रकाशन)
2)" माह्या जगन्याची ताकद” काव्यसंग्रह
( गोदा प्रकाशन)
3)" वेध अंधाराचा घेऊन आली पहाट"
काव्यसंग्रह (गोदा प्रकाशन)
4) "आयुष्याच्या कॅनव्हास वरील अस्वस्थ रेघोट्या "कविता संग्रह (काव्याग्रह प्रकाशन"
५)" बेरकी नाम्या "कथा संग्रह (परीस प्रकाशन)
3)15 प्रातिनिधिक काव्यसंग्रह
काव्यगंध, अक्षरबाग,रंग प्रीतिचे, हिरकणींच्या बाळासाठी, बालकवींच्या बुरुज, माय मराठी, माझा बाप,पडद्याआड जातांना,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,मनातला पाऊस , पंढरीची वारी,आई...
१) कुबेर (कथा मंजुळा)
२)ग्रामसेवा संदेश(मातृत्व कथा)
३)भुमिका (फाशी अन्नदात्याची कविता )
४)थिंक पाॅझिटिव्ह ( लेख ...सखी लेखणी)
५)श्री श्रृंगारदेवी( लेख ... बाप एवढा सीमित असतो का?)
६)प्रसाद ( कविता ..बाजार)
७) साप्ताहिक आष्टी वार्ताहर ( कविता... दिवाई)
८) कलाविष्कार ( कविता. . स्वप्न फुलोरा)
९) देशोन्नती ( कविता... दिवायी)
१०)स्टार प्रहार ( कविता ...माहेर)
११)सखी संवादिका ( कथा ती)
१२)सह्याद्री टाईम्स ( कविता..खुन स्रीत्वाचा)
१३)आत्मनाभार्त ( कथा.. बिनबापाची लेक)
१४)लोकसंकेत (कथा.देवमाणुस )
१५)चिरांगन ( कविता...माय व-हाडी) पुण्यनगरी, मराठवाडा साथी,श्री श्रृंगेरी देवी दिपावली अंक,मैफल,साहित्य संपदा,जलसंपत्ती,जलसंध्या, द्विदल
4)मराठवाड़ा केसरी मध्ये तीन वर्ष काव्यरंग सदर .
5)मराठवाडा साथी मध्ये "बेरकी नाम्या " हे साप्ताहिक सदर सुरू.
7)दिव्य मराठी, लोकमत, मराठवाड़ा केसरी, मराठवाड़ा साथी, देशदूत , पुढारी ,युवा छत्रपती ,देशोन्नती,दैनिक सुफा ,लेवा जगत ,दैनिक सांगोला नगरी,लेवा शक्ती ,जीवन गौरव मासिक ,मावळ मासिक अश्या अनेक वृत्तपत्रात लिखाण प्रकाशित होत असते .
अनेक वृत्तपत्रामधुन जवळ जवळ 300 हिंदी व मराठी कविता प्रकाशित
8)श्रावणधारा काव्यमंच औरंगाबाद 2016 च्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची प्रथम क्रमांकाने विजेती
🌏 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन2020 उस्मानाबाद येथे निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित
🌏41 व्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या संमेलनात२०२१ निमंत्रित कवयित्री म्हणून
आमंत्रित
🌏2020च्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या महिला कविसंमेलनात निमंत्रित कवयित्री
🌍आकाशवाणी औरंगाबाद ला ५ वेळा साहित्यिक कार्यक्रम प्रसारीत
1) 1डिसेंबर 2018ला जळगाव येथे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलनाचे आयोजन
2)औरंगाबाद येथे आम्ही लेखिका तर्फे 22 आक्टोबर 2019 ला महिला संमेलनाचे आयोजन
3)म . युवा साहित्य मंडळ जालना तर्फे2018ला घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय संमेलनाची निवेदिका व आयोजक म्हणून काम .
4) आम्ही लेखिका औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष नात्याने दोन कविसंमेलनांचे आयोजन
5) लेवा गनबोलीच्या कविसंमेलनाचे राज्यस्तरीय ऑनलाइन आयोजन
1)2018 मध्ये ठाणे येथे झालेल्या विश्वविक्रमी साहित्य संमेलनात एका कविसंमेलनात अध्यक्ष .
2)जालना येथे 8 मार्च 2018 व 9 मार्च 2019 ला महिला दिनानिमित्त झालेल्या कविसंमेलनाची अध्यक्ष .
2020 काव्यगंध मंच औरंगाबाद च्या महिला दिनानिमित्त झालेल्या कविसंमेलनाची अध्यक्ष
3)8 मार्च 2019 ला औरंगाबाद येथे महिला दिनानिमित्त काव्यगंध समुह. आयोजित कविसंमेलनाची अध्यक्ष तर 2020च्या कविसंमेलनाची परीक्षक म्हणून काम पाहिले.
4)श्रावणधारा कविसंमेलन औरंगाबाद 2019
घे भरारी कविसंमेलन 2018
हिरकणी कविसंमेलन धुळे 2019
नक्षत्र काव्यमंच पुणे 2019
डाॅ राज रणधीर आयोजित कविसंमेलन 2017 जालना
येथे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित
6)अनेक online कविसंमेलनाची अध्यक्ष अथवा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानीत.
7)अनेक online स्पर्धांची परीक्षक म्हणून काम केले.
9)औरंगाबाद ,जालना ,नाशिक ,पुणे , पाचोरा ,सिल्लोड,श्रीरामपूर ,शेगाव,नांदुरा,
अकोला,अमरावती ,डोंबिवली,नगर,कन्नड,जळगाव,ठाणे,निगडी, अश्या अनेक ठिकाणी झालेल्या काव्यसंमेलनात व काव्यसंध्येत सहभाग
1)गुरूनाथ फाउंडेशन जळगाव चा 2019 चा “बहिणाबाई” पुरस्कार
2)कवि मित्र संस्था पुणे चा 2019 “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार
3)हिरकणी संस्था जालना चा 2018 चा “हिरकणी” पुरस्कार
4)प्रेरणा फाउंडेशन बदलापूरचा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार 2018
5)मातोश्री फाउंडेशन तर्फे “कर्तबगार महिला” 2017 साठीचा सन्मान.
6)विश्वशांति संस्थेचा शिक्षण क्षेत्रासाठी विशेष
पुरस्कार 2017
8) सेवक सेवाभावी संस्था जळगावचा “हिरकणी” पुरस्कार 2018
9)लेवा पाटीदार बहुउद्देशीय मंडळ जालना चा 2019 “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार
10)लेवा पाटीदार मित्र मंडळ औरंगाबाद चा लेवा भुषण पुरस्कार 2020
11) लेवा सम्राज्ञी फाऊंडेशन जळगाव चा अखिल भारतीय लेवा महिला समाज भुषण पुरस्कार 2020
12)समृध्दी फाऊंडेशन नाशिकचा साहित्य पुरस्कार 2020
13)आम्ही लेखिका चा नवदुर्गा पुरस्कार 2020
14)साहित्यसंपदा गृपचा समाज संजीवनी पुरस्कार 2020
१५) राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचा " क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले" पुरस्कार
१६) सुर्योदय सर्वसमावेशक साहित्य मंडळ जळगाव "शब्दमाउली "पुरस्कार
17) आयष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या या काव्यसंग्रहाला शांताबाई शेळके पुरस्कार अक्षरमंच प्रतिष्ठान कल्याणचा राज्यस्तरीय पुरस्कार
* आजपर्यंत सहा दिव्यांग व्यक्तींना सायकल
दिल्यात.
* पाच अंध व्यक्तीना काठ्या दिल्यात.
*अनेक शालेय कार्यक्रमांना मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित.
* लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद तर्फे अनेक वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन,तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेत.
*अनेक सामाजिक कार्यक्रमात विशेष सहभाग.
1) Lions Club Of Aurangabad
2020 ची सचिव म्हणून काम बघतेय
2)पोलीस बॉइज असोसिएशन ची प्रवक्ता
या संस्थेशी अनेक दिवसांपासून निगडित आहे
सध्या या संस्थेची प्रवक्ता म्हणून काम बघते
या संस्थेतर्फे राज्यभर रक्तदान शिबीर ,वृक्ष लागवड , पोलिसांसाठी
अधिकारांसाठी लढणे ,गणपती ,दिवाळी अश्यावेळी त्यांना डबे पोहचवणे अशी
अनेक कामे करतो
३)OBC फाउंडेशन जळगाव या ओ बी सी साठी काम करणाऱ्या संस्थेच्या औरंगाबाद शहर अध्यक्ष
ओबिसी संघटनेची साहित्य प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
4)लेवा भातृमंडळ औरंगाबाद ची कार्यकारणी सदस्य.
6)२५ वर्ष्याच्या शिक्षण दानाच्या कार्यात अनेक गरीब व गरजू मुलांना विनामूल्य ज्ञानदानाचे व मार्गदर्शनाचे कार्य केले .
अजूनही गरीब मुलांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात.
प्रारंभीचे पान उघडले आणि पहिल्या चार ओळी वाचुनच निशब्द झाले. गाव शहराच्या वेशीवरील अस्वस्थ तारुण्य व निराधार म्हातारपणास समर्पित केलेला हा काव्यसंग्रह. समाजातील नाती, भावना, जाणीव, भूक सार काही यात वाचण्यास मिळेल.
गरीब,कष्टकरी आपल्या आसवांना लपवत हातावरचं पोट भरण्यासाठी आणि आपल्या संसाराला हातभार लावत भविष्याकडे उमेदीने पाहणारी, धडपडणारी माळरानावरील महिला , तीचे चरितार्थ वर्णन या पहिल्याच कवितेमध्ये उत्कटतेने दर्शवले आहे.तो लिहितो, वारणी, अमृतकुंभ याही कविता तेवढ्याच समर्पक.
" चाळिशीनंतर " ही कविता थोडीशी वेगळी पण वास्तव. अगदी खर आहे.... संसाराचा गाडा चालवताना एक वेळ अशी येते की तेथे तिला आपले भूतकाळ आठवते. ती आपल्या जीवनाचा मागोवा घेते ...त्यात तिला तिचे सौंदर्य , त्याग, कष्ट, यातनांची आठवण होते. मातृत्वाचा स्वर्गसुख मिळाल्यावर ती त्यासाठी हसत हसत आपल्या स्वप्नांवर चादर ओढते.
स्त्री मनाचा ठाव घेणाऱ्या सर्व कवितांची शीर्षकही तेवढीच बोलकी आहेत. आठवांच्या हिंदोळ्यावर, कराग्रे वसते लक्ष्मी, नदीकाठी याची उत्तम उदाहरणे म्हणता येतील.
"आयुष्य त्याचही" ही एक सुंदर काव्य रचना मनाला भावली. खरंच स्त्री आणि पुरुष यांच्या भावनांमध्ये किती तो विरोधाभास असतो नाही का? कुटुंबातील प्रत्येक स्त्रीला ते जाणवत असतं. दोघांचेही कर्तव्य वेगवेगळे असतात. ही कर्तव्य स्वतः अनुभवलेली असल्याची जाणीव होते. प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावच जणू कवयित्रीने काव्यातून मांडले आहेत.
शहर... सरोगेट मदर सारखी गर्भार राहतात हा विचारच खूप काही सांगून जातो. विचार करण्यास प्रवृत्त करणारी ही कविता. वास्तवता यातून जाणवते. अस्वस्थ झालेले हे मन विसावते ते "परस माहेरचा" या काव्य ओळींवर .. पण त्याही शेवटी आठवणीच..
समाजातील एक भयाण वास्तव म्हणजे रेड लाईट एरियातील "ती". स्त्री ही एक जात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याला दिसते आणि त्या परिस्थितीचा सामना करत,त्यातून वाट काढत ती धडपडत असते जगण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. ही धडपड करत असतानाना नैराश्य येतं, दुःख वाट्याला येतात..म्हणून बऱ्याच वेळा माहीला खचून जातात आणि याच वेदनांना अचूक टिपत कवयित्रीने त्यांना काव्यरूपात गुंफले आहे.
स्त्रीच्या विविध रूपांचे वर्णन सतत केले जाते पण तिच्या कपाळावरील चिंता खूप कमी लोकांना दिसते. सहसा कोणी त्या दृष्टीने विचार करत नाही. स्वतःच्या सौभाग्याचा अलंकार कपाळी कुंकू लावून मिरवणारी हीच सौभाग्यवती जेव्हा विधवा होते तेव्हा तिच्या व्यथा लिहिण्यासाठी कोणालाही उसंत मिळत नाही हे वास्तव आहे. नानाविध शीर्षकाखाली रचलेल्या एकूण सर्वच कविता विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आहेत. स्त्रीच्या भोवती फिरणारा हा धागा वाचकास शेवटपर्यंत काव्यात गुंडाळत जातो आणि त्याची अस्वस्थ अशी गोधडी विणून तयार होते. समाजातील वेगवेगळ्या स्तरांवरील स्त्रीच्या वेगवेगळ्या व्यथांची ठिगळं त्याला जोडल्याचे जाणवते.
माधुरी चौधरी यांचा काव्यसंग्रह संवेदनशील मनाला हेलावणारा आहे. एकदा तरी नक्की वाचायलाच हवा असा हा काव्यसंग्रह आहे. वाचकांचा भ्रमनिरास होणार नाही याची खात्री एक वाचक म्हणून देता येईल. अप्रतिम काव्य लेखनाने मोहिनी घालणाऱ्या कवयित्री माधुरी चौधरी यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा..!!
©® मैथिली कुलकर्णी
*अवश्य वाचा*
नटसम्राट(वी. वा.शिरवाडकर)|Natsamrat-Kusumagraj
टिप्पण्या