Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

सांजधुन (उज्वला केळकर)|Ujwala Kelkar

प्रस्तावना--

                उज्ज्वला केळकर यांची पुस्तके अतिशय वाचनीय असतात. सांजधुनही त्यातलाच एक अनुवादित कथा संग्रह आहे.
माणसाच्या मनोवृत्तीच्या वेगवेगळ्या रूपांचे वर्णन त्यांनी आपल्या  कथांमध्ये मांडले आहे.


परिचय:---

नाव.... उज्वला केळकर

शिक्षण -  एम्.ए एम् एड्

 व्यवसाय - 
       अध्यापन - कस्तुरबा ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे ३० वर्ष अध्यापन.----- १ वर्ष बळवंतराव झेले हायस्कुल - जयसिंगपूर येथे मुख्याध्यापिका. सध्या निवृत्त.

 लेखन : - 
        विविध नियतकालिके, मासिके, साप्ताहिके इ.मधे कविता, कथा, ललित-वैचारिक लेख, पुस्तक-परिक्षणे, परिचय लेख, अनुवादित कथा इ. प्रकाशीत










पुस्तकाचे नांव----- सांजधुन

मूळ लेखक---- श्री मोहनलाल गुप्ता

अनुवाद---    उज्ज्वला केळकर 


उज्ज्वला केळकर यांची इतर प्रकाशित पुस्तके:-

           उज्ज्वला केळकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील काही पुस्तकांची नावे खालील प्रमाणे आहेत------

१) गरगर गिरकी
२) गर्विष्ठ सूर्यफूल आणि गंमत गोष्टी
३) कृष्णस्पर्श
४) फास्ट फूड
५) बदकाचे बूट आणि गंमत गोष्टी
६) इये साहित्यिचिये नगरी
७) मौल्यवान चीज
८) स्वामी विवेकानंद (अनुवाद)
९) ज्ञानयोग (अनुवाद)
१०) जादूचा आरसा
११) शोध ( अनुवाद)
१२) गाणारे पीस
१३) संवेदना (अनुवाद)
१४) धुक्यातील वार
१५) सांजधुन
१६) गोष्टी तिच्या आणि तिच्याही (अनुवाद)
१७) विविधा 

सांजधुन--

सांजधुन  हा उज्ज्वला केळकर यांचा अनुवादित कथासंग्रह आहे. तो दिवस, तुझ्यासाठी, नाटक, अचानक, जैपडॉल, मोरिया, सांजधून, निळा ठिपका, सरदार पूर्णसिंह, व्हिटॅमिन डी, ऑपरेशन,कुत्री, वाटणी, आजोळ घरी अशी नाविन्यपूर्ण शीर्षक असणाऱ्या चौदा कथा या कथासंग्रहात आहेत.  हिंदी भाषेतील श्री.मोहनलाल गुप्ता यांनी लिहीलेल्या कथांचे अनुवाद उज्वला केळकर यांनी मराठी भाषेत केले आहे.जीवनातील सार यात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कथांमधून मानवी जीवनाशी निगडीत असलेले वेगवेगळे विषय हाताळले गेले आहेत.

          श्रीनगर आणि जम्मू कश्मीर या भागामध्ये आतंकवाद्यांची  दहशत आणि त्या परिस्थितीत तेथे येणारे प्रवासी कुटुंब प्रिया, तिचा लहानगा कनु व तीचे पती यांच्या भोवती कथा गुंफली आहे. त्यांच्या मनाच्या अवस्थेचा उलगडा तो दिवस या कथेतून केला गेला आहे.

 तुझ्यासाठी या कथेमध्ये प्रियकर प्रेयसीवर प्रेम करतो पण तरीही तो तिला नकार देतो. नकार देण्याची कारणे तो तिला पत्र लिहून कळवतो.. तो म्हणतो....

"माणसाकडे माणूस म्हणून बघावे..माणसाला देव मानण्यामुळेच सगळ्या अडचणी आणि सगळे वाद निर्माण होतात."

जैपडॉल ही एक  वेगळ्याच पठडीतील कथा म्हणता येईल.नायक एका पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतो. त्याला श्रोत्यांच्या रांगेत एक  व्यक्ती दिसते.त्या व्यक्तीस पाहताच नायकाच्या स्मृती चाळवतात. भूतकाळातील गोष्टी त्यांच्या मनात भराभर येऊ लागतात. शेवटी एक प्रश्न येतो की, ती कोण..? तर...जैपडॉल म्हणजे जपानी बाहुली. आणि जैपडॉल सारखी दिसणारी ती म्हणजे नायकाच्या काॉलेजजीवनातील प्रेयसी असते.

                   मोरिया ही कथा काहीशी  वेगळी आहे. ही कथा दोन भावांच्या सखोल निरोगी नात्यांची..पण नात्यांची सूत्र लोभापायी कशी तुटतात याचा अनुभव देणारी ह्रदय स्पर्शी कथा आहे.

       सांजधुन ही शीर्षक कथा म्हणजे सुगंधा या संगीत शिक्षीकेची आहे.तिच्या विद्यार्थ्याशी असलेल्या प्रेमभावनेची कथा आहे.

                 कुत्रा ही कथा मनाला स्पर्शून जाते.एका झोपडीत,कुत्र्याच्या मानसिकतेनं आणि झुरळासारखी जगणारी ,एकाच कुटुंबातल्या माणसांच्या जीवनाची कहाणी वाचतांना मन सुन्न होऊन जातं...पण जीवनाची ही गलिच्छ बाजू नाकारता येत नाही..अखेर तेही एक वास्तव च आहे... हे मान्य करावेच लागेल.कथा  मनावर परिणाम करणाऱ्या आहेत. त्या वाचताना वाचकाचे मन हताश, व्याकुळ होऊन जाते.

सर्वच कथा वाचनीय आशा आहेत.उज्ज्वला केळकर यांच्या पुस्तकातील शब्दांची मांडणी  मनाला भावणारी असते. पुस्तक वाचताना ते अनुवादित आहे हे कोठेही जाणवत नाही. हे त्यांच्या लेखन कौशल्याचे यशच म्हणावे लागेल.

*नक्की वाचा*

Wachan katta with Maithili


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges