Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
पुस्तक -- यश तुमच्या हातात
लेखक- शिव खेरा
जन्म- २३ ऑगस्ट १९६१
भाषा- मराठी
प्रकाशन- मॅकमिलन पब्लिशर्स इंडिया लिमिटेड
किंमत- ₹ ३१०/-
मॅकमिलन पब्लिशर्स इंडिया लिमिटेड प्रकाशन असलेले "यश तुमच्या हातात" हे शिव खेरा यांचे पुस्तक म्हणजे "You can win" या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. एकुण आठ प्रकरणात हे पुस्तक विभागले गेले आहे.
यशस्वी होण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. पण ते सहज मिळत नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. घरात निवांत बसून ते सहजासहजी मिळेल का?? तर नाही. कष्ट घेतल्याशिवाय हे शक्य नाही. पण हे कष्ट, ही मेहनत योग्य दिशेने व्हायला हवी. तर आणि तरच आपल्याला यश मिळू शकेल. यश तुमच्या हातात हे पुस्तक म्हणजे .... मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाला दिशा दाखवणारा वाटसरू आहे. चोखंदळपणे निवडून मार्गस्थ कसे व्हायचे हे प्रत्येकाच्या आकलन क्षमतेवर आवलंबून आहे.
इतिहासाचा मागोवा घेतला आणि पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की, स्वराज्यासाठी छत्रपतींना किती कष्ट करावे लागले. भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेकांना प्राण त्याग करावे लागले. हे स्वराज्य टिकवण्यासठी फुले, आंबेडकर यांनी त्यात आपल्या कष्टाची, ज्ञानाची भर घातली.त्यांच्या साठी हे त्याकाळी अवघड आव्हान होतच की. पण त्यांनी त्यावर आपल्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने मत केली आणि यश मिळवले.
यशस्वी होण्याची इच्छा असणाऱ्या बऱ्याच जणांना त्याची व्याख्या सांगता येत नाही. प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी असते. एडबिन ब्लिस यांच्या मते-"यशस्वी होण म्हणजे ध्येय गाठणं".
सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी , त्या दृष्टीने जगणाऱ्या साठी हे पुस्तक आहे.
याचा अर्थ नकारात्मक विचार करणारे हे पुस्तक वाचू नये का??तर तसे नव्हे! उलट त्यांनी तर अवश्य वाचावे. आपल्या नाकारात्मक विचारांचे सकारात्मक परिवर्तन होत गेले की हेच या पुस्तकाचे यश ठरते.
आता हे यश म्हणजे नेमके काय? हे मिळवण्यासाठी काय करावे लागते? माणसाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा? त्यासाठी कोणत्या बाबी लागतात? माणसाला नेमकी प्रेरणा कशी मिळते?? याचे काम कशा प्रकारे चालते? या सर्व प्रश्नांचा सार या पुस्तकात आहे. शिव खेरा यांच्या मते-
प्रेरणा, सुप्त मन, दूरदृष्टी, धेयनिश्चिती या गोष्टी यशासाठी आवश्यक असतात. पुस्तक वाचताना आपल्यातील हे गुण आपण आपसूकच शोधू लागतो. निश्चित ध्येय ठरवले की यशाची वाट सुकर होते.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिले आहे-"विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करतात."हाच या पुस्तकाचा गाभा आहे असे मला वाटते.
दुःखापासून परावृत्त होऊन समृद्ध होण्यासाठी, यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही आपल्या ला अपल्यातूनच निर्माण करायची असते.किंबहुना ती आपल्यात असतेच. शिव खेरा यांनी मार्गस्थ होण्यासाठीचा मार्ग पुस्तक रूपाने दिला आहे. या मार्गावर निश्चित पाऊल टाकून त्यावर मार्गक्रम करणे हे आपले काम आहे. पुस्तकातील शब्द न शब्द प्रेरणा घेण्यासारखा आहे.
थोडकयात काय तर, सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्व, अपयशाची कारणे आणि यशस्वी होण्यासाठी चे नियम यात सांगितले आहेत.छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यासाठी दिलेली उदाहरणे वाचकाला पुस्तकाशी जुळवून ठेवतात.
मला वयक्तिक हे पुस्तक वाचताना मिळालेला बोध म्हणजे--
"आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अनमोल आहे. तो स्वच्छंदी जगत असताना आपले ध्येय साध्य करण्यासाठी स्वतः स्वतःची प्रेरणा होऊन प्रयत्नशील राहिले पाहिजे."
नक्की वाचावे आणि संग्रही ठेवावे असे-पुस्तक---यश तुमच्या हातात
©® मैथिली कुलकर्णी
जिजाऊसाहेब [मदन पाटील]|ऐतिहासिक कादंबरी
सारे काही शांततेसाठी- सुहासिनी पांडे
टिप्पण्या