Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

पार्टनर--- व. पु. काळे

पुस्तक-पार्टनर

लेखक-व.पु.काळे


             व. पु .काळे सर  माहीत नाहीत असा मराठी साहित्यप्रेमी सापडणार नाही. व पु म्हणजे मराठी मातीला मिळालेला अनमोल हिरा.त्यांनी रचलेल्या साहित्य सागरातील मोती वेचत मी लहानाची मोठी झाले. त्यांच्याबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल लिहावं एवढी पात्रताच नाही खरं तर.तरीही या थोर लेखकावर आणि त्यांच्या साहित्यावर लिहिण्याचा मोह होतो कारण व पु खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या अनेक पुस्तकप्रेमी वाचकांचे"पार्टनर"आहेत.



                व. पु. काळे यांनी कमी शब्दात अतिशय प्रभावीपणे नात्यांवर केलेले लिखाण आहे-पार्टनर. त्यांच्या वाक्याची जोडणी च इतकी योग्य असते की, ती सरळ मनाला जाऊन भिडते. 

"कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होता येणं टाळता येत"

"तुला मी कशी हाक मारू?पार्टनर या नावाने. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं"अशी अनेक वाक्य वाचताना थेट ह्रदयात जातात. माणूस अनुभवाने शिकतो म्हणतात. या पुस्तकातील काही गोष्टींचा अर्थ लग्नानंतर उलगडला. किंबहुना तो अनुभवला.

   "As you write more and more personal, it becomes more and more universal"

किती सुरेख वाक्य आहे. खरच आपण जेवढं पर्सनल लिहितो तेवढ ते युनिव्हर्सल होत जातं.हाच या पुस्तकाचा मुख्य गाभा मला वाटतो. आणि त्यामुळेच प्रत्येकाला पार्टनर ही आपलीच गोष्ट आहे असे वाटते. मध्यम वर्गीयांची सुख दुःख अचूक टिपणे यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.

      व पु काळे यांचे पार्टनर म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याची खान आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ बरंच काही सांगून जाते. याचा अर्थ पार्टनर म्हणजे पती पत्नी नात्यातील वीण आहे का? तर तसं नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला घडवताना जो आपल्या सोबत असतो त्या प्रत्येक पार्टनर ची ही गोष्ट आहे. जगण्याला जो अर्थ देतो तो पार्टनर.

     स्त्री पुरुष संबंधामध्ये न अडकता हा पार्टनर त्यापलीकडे पोचतो. मुंबईच्या चाळीत राहणारा श्री. त्याच्या समस्या, अडचणी, कथेच्या निमित्ताने येणारे प्रसंग, त्याचे कुटुंब आणि त्याच्या या जीवनप्रवासात त्याला गवसलेला वाटाड्या याची ही कथा. आयुष्याला वाट देण्याचे काम हा वाटाड्या करतो. प्रत्येक नात्यातील गुंफण अगदी अलगद मांडली आहे.


"समुद्राची ताकद टिटविला समजत नाही. अकाशाचीव्याप्ती गरूडालासमजत नाही. सुगंधाच कोड फुलला उकलत नाही. दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर"चव".खाली उतरला की"घास".सुगंधाच नात नाकाशी. घशातून आत गेल्यावर ती फक्त हवा. सगळ्या पंचेंद्रियांच नातं रसिकतेशी नसून तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की, रसिकता संपली-

          किती आणि काय घ्याव या अशा वाक्यातून.त्यांच्या शब्दात मतितार्थ दडलेला असतो. एकदा का समजला की जीवन सुकर होऊन जाते. माणसाने  आयुष्यात एकदा तरी नक्की वाचाव असं पुस्तकं - पार्टनर.


©®मैथिली कुलकर्णी, नांदेड

*नक्की वाचा*

डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व


टिप्पण्या

Unknown म्हणाले…
अगदी अचुक शब्द..खूप छान 👌👌

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges