Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व Pustak parikshn(पुस्तक परीक्षण)

 

प्रस्तावना---


एखाद्या पुस्तकाचे सखोल वाचन करून त्यातील गुण आणि दोष दोन्ही बाजूंचा अभ्यास करून ती बाजू स्पष्टपणे मांडणे त्याचे मूल्यमापन करणे म्हणजे समीक्षा किंवा पुस्तकाची समिक्षण असे म्हणता येईल.
         समीक्षा या शब्दाचे अनेक अर्थ सांगता येतात. जसे क्रीडा क्षेत्रातील समीक्षेला आपण समालोचन असे म्हणतो. भूतकाळात किंवा इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा पाठपुरावा करणे किंवा त्यावर नजर टाकणे यास आपण सिंहावलोकन असे म्हणतो. तर एखाद्या पुस्तकातील गुणवत्ता विश्वसनीयता स्पष्ट करताना आपण त्यास परीक्षण म्हणतो. थोडक्यात काय तर... परीक्षण, समीक्षा, सिंहावलोकन, भाष्य, पुनरावलोकन, हे विविध क्षेत्राशी संबंधित वापरले जाणारे समान अर्थाचे शब्द आहेत असे म्हणता येईल.

        परीक्षण किंवा समीक्षा ही कोणत्याही प्रकारात करता येते.नाटक, कविता, कथा ,ग्रंथ, संगीत ,चित्रपट एवढेच काय आताच्या डिजिटल युगातील सर्वांच्या पसंतीस उतरलेले वेबसिरिज यावरही आपण परीक्षण लिहू शकतो. 
      माझ्या वाचनात आलेल्या  आणि माझ्या मनाला भावलेल्या प्रसिद्ध लेखक लेखिकांचे तसेच नवोदित लेखक लेखिकांच्या वेगवेगळ्या पुस्तकांचे परीक्षण  यात करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

पुस्तकाचे नाव--

डॉ.आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व

लेखिका---अंजली कीर्तने 

लेखन प्रकार-- चरित्र

प्रकाशन-- मॅजेस्टिक प्रकाशन



           आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.

यांच्या जीवनावर आलेल्या चित्रपटामुळे आपण आता त्यांना ओळखत असलो तरीही अंजली कीर्तने यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून त्यांचे जीवनपट आपल्याला सखोलपणे समजण्यास मदत होते.

         १९ वे शतक हे पुरुष प्रधान संस्कृती चे होते. त्या काळी मुलींना तेवढी मुभा नसे. भारतीय समाज, संस्कृती आणि त्याला न जुमानता एका भारतीय किंबहुना महाराष्ट्रीयन मराठमोळ्या स्त्री चे जागतिक पातळीवर जाऊन शिक्षणासाठी केलेले संघर्ष वर्णन यात अचूक टिपले आहे.

         १९व्या शतकात एक वेगळे धाडस करून आनंदी बाई यांनी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतले. त्यांच्या या धाडसाचे खरे  स्वप्नकार, साक्षिदार,साथीदार हे त्यांचे पती गोपाळराव गोविंदराव जोशी हे होते. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच आनंदीबाई भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होऊ शकल्या. आनंदी बाई यांच्यावर अनेक लेख प्रसिद्ध झाले.  हे पुस्तक लिहीत असताना लेखिकेने आनंदीबाई यांच्या गावास तसेच त्यांनी  अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या युनिव्हर्सिटीस व तेथे राहिलेल्या थिओडोसिया कार्पेनटर व बेंजामीम कार्पेन्तर यांच्या हेलेना या मुलीची नात नॅन्सी यांच्याशी संवाद साधला. पुस्तक लिहीत असताना आलेल्या सुरुवातीच्या अडचणीचे प्रामाणिक वर्णन अंजली कीर्तने यानी केले आहे.

            परदेशात जाणे आणि तेथे शिक्षण घेणे हे खूप मोठे आव्हान आनंदीबाई जोशी यांनी पेलले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. भारतात महिलांचे प्रश्न, दुःख त्यांच्या यातना सोडवण्यासाठी एकही महिला डॉक्टर त्या काळी नव्हती. त्यामुळे हा मोठा गंभीर पेच सोडवायलाच हवा. महिला डॉक्टर असेल तर महिलांना त्यांचे प्रश्न निःसंकोचपणे मांडता येतील. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन गोपाळराव यांनी आनंदीबाई याना शिकवले... आणि त्याचे फळ म्हणजे आनंदीबाई पहिल्या भारतीय महिला डॉक्टर झाल्या.. पण हे काही सहज घडलं नाही.अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. यासाठी त्यांना अनेक वाटा शोधाव्या लागल्या... धडपड करावी लागली... या संघर्षाचे वर्णन म्हणजेच हे पुस्तक...

           आनंदीबाई जोशी यांवर अंजली कीर्तने यानी एक लघुपट ही तयार केला. या लघुपटास महाराष्ट्र शासनाचा सर्वोकृष्ट लघुपट पुरस्कार मिळाला आहे.

    आजच्या पिढीला कष्ट. धडपड म्हणजे नकोसे झाले आहे. पण कोणतेही यश हे कष्टाशिवाय प्रयत्ना शिवाय मिळत नसते. आज सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या असूनही आपली कष्ट करण्याची तयारी नसते पण त्याकाळी मात्र आजच्या पिढीला सगळ्या सोयी उपलब्ध व्हाव्यात याच उदात्त हेतूने डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्यांचे संपूर्ण जीवन त्यांनी खडतर प्रवासात घालवले. त्यासाठी सोसलेल्या यातना काय असतील याचे वर्णन अंजली कीर्तने यांनी केले आहे. आपण यातून नक्कीच प्रेरणा घेऊन आपले जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीलाही यातून प्रेरणा देऊ शकतो त्यासाठी हे पुस्तक नक्की एकदा तरी वाचावे.

©® मैथिली कुलकर्णी


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges