Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
माणूस म्हटला की, व्यक्त होणे हे ओघाने आलेच. स्वतःला जे म्हणायचे आहे, सांगायचे आहे ते कोणी बोलून तर कोणी हातवारे करून व्यक्त करतो. चित्र ,कविता ,लेख, निबंध, कथा ,कादंबऱ्या ही सगळी व्यक्त होण्यासाठीची मानव निर्मित साधने आहेत. मनातील भावना काव्यरूपात कागदावर उतरल्या की त्याची कविता होते. त्याच कवितेला सुरांची जोड लागली की ते काव्य होतं. आणि आता याच काव्याला सुमधुर आवाज मिळाला की ते गीत माणसाच्या मुखातून गुणगुणन्या इतपत लोकप्रिय होऊन जातं. एकाच व्यक्तीमध्ये हे सर्व गुण असणारी माणसे दुर्मिळच म्हणावी लागतील.
"रोहिणी पांडे" या अशाच एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची भेट योगायोगाने झाली आणि या बहू गुणसंपन्न अशा व्यक्तीतील नानाविध पैलूंची ओळख होत गेली. कविता, लेख ,कथा ,गझल , अलक अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील त्यांचे लेखन वाखाणण्याजोगे आहे. हा प्रवास करत असतानाच स्वनिर्मित काव्यप्रकाराची निर्माती बनलेली ही मराठमोळी सखी एवढ्यावरच न थांबता आपल्या स्वनिर्मित काव्यप्रकाराचा साहित्य रसिकास लाभ व्हावा, त्यांना त्याची गोडी चाखता यावी,हा नवीन काव्यप्रकार शिकता यावा या उदात्त हेतूने त्याचे लोकार्पण ही करते हे खरंच कौतुकास्पद आहे!!
नक्षत्रावली
परीस प्रकाशन
₹ १२०/-
रोहिणी पांडे यांचे शिक्षण नांदेड येथून झाले. संस्कृत विषयात एम.ए. , बी.एड. पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. व्यवसायाने त्या खाजगी शिक्षिका आहेत.५ सप्टेंबर हा दिवस आपण "शिक्षक दीन" म्हणुन साजरा करतो. हाच दिवस रोहिणी पांडे यांचा जन्मदिवस आहे. हा ही एक योगायोगच म्हणावा लागेल.
सर्व काव्य प्रकारात लेखन, ललित लेखन,प्रासंगिक लेखन, वैचारिक लेख,कथा, समीक्षण इत्यादि प्रातिनिधिक कथा संग्रहाचे सह संपादक म्हणून त्यांचं काम चालू आहे.
*"नक्षत्रावली " काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे.
एक कथा संग्रह आणि ललित संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर
"कलाविष्कार " कडून "कविवर्य ग्रेस साहित्य रत्न पुरस्कार"
शब्द अंतरीचे समूहाचा "कोहिनूर" हा पुरस्कार
अनेक कथांना स्पर्धांना राज्यस्तरीय पुरस्कार
*सोशल मिडिया फेसबुक, प्रतिलिपी,कू सारख्या साहित्यिक एपवर आणि ब्लॉगवर असंख्य वाचक.अनेक साहित्यिक स्पर्धांचे आयोजन, नियोजन आणि परिक्षण.
*महाराष्ट्रातील अनेक वृत्त पत्रातून, पोर्टल,ई-बुक यातून लेख, सदर,आणि स्तंभ लेखन.
* "रोही पंचाक्षरी" हा नव काव्य प्रकार
निर्माण केला आणि त्याचा लोकार्पण
सोहळा सुप्रसिद्ध गझलकार ए.के.शेख सर यांच्या हस्ते झाला. सर्वांनी तो फक्त स्विकारलाच नाही तर
आत्मसात ही केला आहे.
*अखिल भारतीय साहित्य संमेलनात अनेक वेळा
कविकट्टा मध्ये सादरीकरण.
*मराठवाडा साहित्य परिषद आयोजित औरंगाबाद येथील संमेलनात निमंत्रित कवी, अनेक ठिकाणी
निमंत्रित कवी म्हणून बोलावले जाते.
*आकाशवाणीवर नियमीतपणे अनेक
प्रकारचे सादरीकरण
*अभिवाचन, अनेक कार्यक्रमांचे सूत्र संचालन.
*सामाजिक - गरजू मुलांना विनामूल्य शिकवणी.
रोहिणी पांडे यांचा हा प्रथम काव्यसंग्रह आहे. वेगवेगळ्या काव्यप्रकारात लिहिलेल्या एकूण ८० कवितांचा यात समावेश आहे. सर्व कविता खूप सुंदर रचलेल्या आहेत. नक्षत्रावली वाचता वाचता अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. कवयित्रीच्या अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या या सर्व कवितांमधून त्यांची प्रगल्भता तीव्रतेने जाणवते.
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे पार पडले होते. या अधिवेशनाचे अध्यक्षपद श्रेष्ठ साहित्यिक माननीय "श्रीपाल सबनीस " यांनी भूषविले होते.याच श्रेष्ठ साहित्यिकाने नक्षत्रावली या काव्यसंग्रहा बद्दल त्यांच्या शब्दात आपले मत मांडले आणि कविता संग्रह व कवयित्री चे भरभरून कौतुक केले. कवितेतील लयबद्धता, काळजात घर करणारे नाविन्यपूर्ण विषय यामुळे नक्षत्रावली संपूर्ण साहित्य रसिकांच्या मनात नक्षत्रा प्रमाणे चमचमते आहे.
रोही पंचाक्षरी हा एक काव्य लेखनाचा नव्याने निर्मिती झालेला आणि अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झालेला काव्यप्रकार आहे.
" रोही पंचाक्षरी ची निर्मिती कशी झाली? हा प्रश्न जेव्हा रोहिणी पांडे यांना विचारला, तेव्हा अतिशय प्रामाणिक आणि प्रांजळ पणे त्या म्हणाल्या की याची निर्मिती मुद्दाम ठरवून केली गेली नाही. एक सारख्या फॉरमॅटमध्ये झालेल्या लेखनातून ही कल्पना सुचली आणि मग त्या काव्यातील साधर्म्य शोधून एक नियमावली तयार केली गेली."
अर्थपूर्ण काव्य व यमकबद्धता हा या काव्यप्रकाराचा गाभा आहे. सुप्रसिद्ध गझलकार ए.के.शेख यांच्या हस्ते रोही पंचाक्षरी या काव्यप्रकाराचा लोकार्पण सोहळा पार पडला.
प्रत्येक माणसाच्या मनात एक कवी दडलेला असतो. तो आपल्या भावना कागदावर लिहितो पण त्याला आपल्या रचनेतील लयबद्धता, त्यातील व्याकरण याची माहिती नसते. या सर्व गोष्टींपासून तो अनभिज्ञ असतो. अशा रसिकांना लयबद्ध लेखन करता यावे, साहित्यातील दर्जेदार लेखन प्राधान्यक्रम मिळावा, त्याचबरोबर नवनवीन प्रयोगशीलता साहित्यात यावी या उदात्त हेतूने हा काव्यप्रकार निर्माण करण्यात आला. या निर्मिती मागच्या दृष्टी कोणाबद्दल रोहिणी पांडे यांचे विचार अतिशय बोलके आहेत त्या म्हणतात....
पारंपरिक साहित्य तर आपण स्वीकारतोच... पण नवीन काही निर्माण करण्याची आणि त्याचा स्वीकार करण्याची मनोवृत्ती साहित्यविश्वात निर्माण व्हायला हवी."
*(१) प्रत्येक ओळीत पाच अक्षरे
*(२) चार ओळींची रचना*
*(३) पहिल्या,दुसऱ्या नि चौथ्या ओळीत यमक,तिसऱ्या ओळीत - तिसरी ओळ मात्र समर्पक हवी .यमक नको
*(४)कमी वर्णाची रचना असल्यामुळे दर्जेदार शब्दांची निवड आवश्यक
*(५)लय, नाद या यमकांद्वारे साधली जातात.
*(६)अंत्य यमकापूर्वी स्वर यमक
आवश्यक
शोभे शब्दात
पंचाक्षरात
हृद्य संदेश
काव्य गर्भात..
अशीच एक रोही पंचाक्षरी मी लिहिण्याचा प्रयत्न केला...
शोभे अवनी
हिरव्या वनी
दिसते जणू
लावण्यखणी
पाणी नदीचे
याच भूमीचे
दुःख भोगते
प्रदूषणाचे
वृक्ष तोडणे
त्यास जाळणे
येई जीवनी
होरपळणे
मनात ध्यास
पृथ्वी विकास
त्यासाठी नको
झाडाचा ऱ्हास
जपुया सदा
वनसंपदा
वृक्षारोपण
होई फायदा
वचनबद्ध
हो!कटिबद्ध
पर्यावरण
सदा समृद्ध
©® मैथिली कुलकर्णी, नांदेड
अश्विनी निवर्गी(AshwiniNiwargi)|कथारंग
टिप्पण्या
...शिरीष
अभिनंदन रोहिणी